Video : ‘तुझ्या अंगातून खूप घाणेरडा वास येतोय!’ ब्रिटन ऑक्सफर्डमध्ये भारतीय विद्यार्थिनीचा गोऱ्या महिलेकडून अपमान, विद्यार्थिनी म्हणाली…
ऑक्सफोर्ड विद्यापीठात शिकणाऱ्या एका भारतीय विद्यार्थीनीला परदेशात एका गोऱ्या महिलेकडून तुझ्या अंगातून खूप घाणेरडा वास येतोय.... अशी अपमानास्पद वागणूक मिळाली. तिने संबंधित व्हिडिओ तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे.

परदेशात शिक्षणासाठी जायचं , मोठ्या विद्यापीठात शिकायचं आणि आपलं स्वप्न पूर्ण करायचं. असं अनेक भारतीय विद्यार्थ्यांच स्वप्न असतं. पण परदेशात गेल्यानंतर काहींना अशा अनुभवांना सामोरं जावं लागत. ज्याची त्यांनी कल्पनाही केलेली नसते. ऑक्सफोर्ड विद्यापीठाच पीएचडीचं शिक्षण घेणाऱ्या कामाक्षी या भारतीय विद्यार्थींनीसोबत असाच एक प्रकार घडल्याचा दावा तिने केला. ब्रिटनमधील एका दुकानात खरेदी करत असताना एका अनोळखी महिलेने तिच्या शरीराच्या वासावरून अपमानास्पद टिप्पणी केली. कामाक्षीने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत हा अनुभव सांगितला आहे.
दुकानात महिला सतत तिच्या आसपास फिरत होती
कामाक्षीने 21 नोव्हेंबर रोजी इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर केला. तिने सांगितलं की, ती एका दुकानात आनंदाने खरेदी करत होती. त्याचवेळी एक गोरी महिला वारंवार तिच्या आसपास फिरत होती. ती महिला असं का करत आहे. हे कामाक्षीला काही वेळ कळतचं नव्हतं. मात्र तिने त्या महिलेला काही न बोलता आपली खरेदी सुरू ठेवली.
काही वेळाने ती महिला थेट कामाक्षीजवळ आली आणी म्हणाली, मला हे सांगायचं नव्हतं, पण मला सांगावचं लागेल… तुझ्या अंगातून खूप, खूप घाणेरडा वास येतोय. ‘ हे ऐकताच कामाक्षी पूर्णपणे गोंधळून गेली. तिला काय बोलावं हेच सुचलं नाही, ती महिला बोलून लगेच तिथून निघून गेली. त्यामुळे कामाक्षीला उत्तर देण्याचीही संधी मिळाली नाही.
View this post on Instagram
वडिलांचा आवडता परफ्यूम लावला होता.
या घटनेमुळे कामाक्षीला खूप वाईट वाटलं. विशेष म्हणजे त्या दिवशी तिने आपल्या वडिलांचा आवडता परफ्यूम लावला होता. त्यामुळे तिला त्या महिलेची टिप्पणी मनाला खूप लागली. या प्रसंगानंतर संपूर्ण दिवस ती अस्वस्थ होती. लोकांच आपल्याकडे लक्ष जाऊ नये, यासाठी ती स्वत:ला झाकण्याचा, लपण्याचा प्रयत्न करत होता. असं तिने सांगितले.
कामाक्षीच्या मते. ब्रिटनमध्ये राहताना तिला अशा सूक्ष्म भेदभावाच्या अनेक अनुभवांना सामोरं जावं लागलं आहे. हा एकच प्रसंग नसल्याचं तिने स्पष्ट केलं. मात्र या अनुभवामुळे ती आपली ओळख. आवड आणि संस्कृती सोडणार नसल्याचं तिने ठामपणे सांगितले .
सोशल मीडियावरून मिळतोय पाठिंबा
कामाक्षीचा व्हिडिओ समोर आल्यानंतर अनेकांनी तिच्या अनुभवाबद्दल सहवेदना व्यक्त केल्या. काही भारतीयांनी परदेशात त्यांनाही अशाच प्रकारच्या भेदभावाचा सामना करावा लागल्याचे अनुभव सांगितले. एका अनोळखी व्यक्तीच्या टिप्पणीमुळे स्वत:ची ओळख बदलण्याची गरज नाही. अशा शब्दांत स्वत:ची ओळख बदलण्याची गरज नाही. अशा शब्दांत अनेकांनी तिला प्रोत्साहन दिलं.
