AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Lal Ambadi: दुष्काळातही लाल अंबाडीचा दिलासा, शेतकरी मालामाल होणार, लागवड कशी करणार?

Lal Ambadi Red Sorrel: दुष्काळाचे संकट असतानाही काही शेतकरी शेतीत अभिनव प्रयोग करत आहे. कमी पाण्यात येणाऱ्या पिकांची लागवड करून उत्पन्नाचा नवीन मार्ग शोधत आहेत. लाल अंबाडी लागवड हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.

Lal Ambadi: दुष्काळातही लाल अंबाडीचा दिलासा, शेतकरी मालामाल होणार, लागवड कशी करणार?
दुष्काळातही लाल अंबाडीचा दिलासा, शेतकरी मालामाल होणार
| Updated on: Nov 27, 2026 | 2:40 PM
Share

Lal Ambadi Red Sorrel: दुष्काळाचे संकट आणि पाणटंचाईच्या परिस्थितीतही काही शेतकरी अभिनव प्रयोग करून पाहत आहेत. कमी पाण्यात आणि कडक उन्हाशी सामान करू शकणारी पीकं घेण्याचे हिम्मत दाखवत आहेत. लाल अंबाडी हे पीक शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचा एक नवीन मार्ग ठरत आहे. अत्यंत कमी पाण्यात आणि प्रतिकूल हवामानात तग धरणाऱ्या भाजीपाल्यामध्ये लाल अंबाडी हा चांगला पर्याय आहे. विशेष म्हणजे लोहसत्वाचे भरपूर प्रमाण असलेल्या लाल अंबाडीला बाजारातही मागणी आहे. राज्यातील काही शेतकरी लाल अंबाडीचा प्रयोग करून कमाई करत आहेत.

पाणी कमी, खर्चही कमी

लाल अंबाडी हे प्रतिकूल परिस्थितीत तग धरणारे काटक पीक म्हणून ओळखले जाते. मध्यमच नाही तर हलक्या जमिनीत लाल अंबाडी तरारते. कमी पाण्यात आणि कमी खर्चात हे पीक आहे. विशेष म्हणजे या पिकाला रासायनिक खते अथवा महागड्या कीटकनाशकांचा फारसा वापर होत नाही. सध्या राज्यातील अनेक जिल्हे दुष्काळाने होरपळत आहे. कमी पाण्यात येणारी लाल अंबाडी आंतरपीक अथवा मुख्य पीक म्हणून घेतल्यास चांगले उत्पन्न मिळवता येऊ शकते.

केवळ भाजीच नाही तर अशीही मोठी कमाई

लाल अंबाडीची कोवळी पानं पालेभाजी, चटणी आणि आमटीसाठी वापरतात. स्थानिक बाजारपेठेत या भाजीला अधिक मागणी आहे. लाल अंबाडीत लोह, व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्सचे प्रमाण अधिक आहे. ही भाजी खाल्ल्यास हिमोग्लोबिन वाढवणे, पचन सुधारणे आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मदत होते. पण केवळ भाजीपाला म्हणूनच नाहीतर प्रक्रिया उद्योग म्हणूनही लाल अंबाडी शेतकऱ्यांना मालामाल करते. लाल अंबाडीच्या फुलांच्या पाकळ्या सुकवून त्यापासून हर्बल रेड टी, शरबत, जॅम, जेली आणि लोणचंही तयार होतं. त्याला बाजारपेठेत विशेष मागणी आहे. त्यातूनही शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फायदा होऊ शकतो.

लाल अंबाडी लागवड प्रक्रिया

लाल अंबाडी हे पीक हलक्या, मध्यम जमिनीत येते. उष्ण आणि दमट वातावरणातही हे पीक तग धरून राहते. चांगला निचरा होणारी आणि सेंद्रिय कर्ब असलेली जमीन योग्य ठरते.

हे पीक प्रामुख्याने खरीप हंगामात म्हणजे जून ते जुलै या दरम्यान येते. पण सिंचनाची सोय असेल तर रब्बी हंगामातच नाही तर उन्हाळ्यात लाल अंबाडी तरारते.

एकरी साधारण 3 ते 4 किलो बियाणे पुरेसे असते. लागवड करताना प्रत्येक ओळीतील अंतर 45 ते 60 सेंमी आणि रोपातील अंतर 15 ते 20 सेंमी ठेवत पेरणी करावी. या पिकात दुसरे अंतरपीकही घेता येते.

हे पीक कमी पाण्यावर तग धरते. सुरुवातीला आणि फुलोरा काळात जमिनीत पुरेसा ओलावा राहिल याची काळजी घ्यावी. मात्र पाणी साचणार नाही याकडेही लक्ष द्यावे.

Follow Us
वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर वाहनांवर दगडफेक
Washim : वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर वाहनांवर दगडफेक
पुण्यात 15 ऑगस्ट चौकात संशयित बॅग आढळली; तृप्ती देसाई काय म्हणाल्या?
Pune Bag Spoted : पुण्यात 15 ऑगस्ट चौकात संशयित बॅग आढळली; तृप्ती देसाई काय म्हणाल्या?
पुण्यातील गोळीबारानंतर पालकमंत्री सुनेत्रा पवार ॲक्शन मोडमध्ये....
Sunetra Pawar Meeting : पुण्यातील गोळीबारानंतर पालकमंत्री सुनेत्रा पवार ॲक्शन मोडमध्ये; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बोलवली तातडीची बैठक
क्या बोलती पब्लिक? अभिजीत दिपकेंच्या सीजेपीचं नवं अभियान सुरू; थेट....
Abhijeet Dipke : क्या बोलती पब्लिक? अभिजीत दिपकेंच्या सीजेपीचं नवं अभियान सुरू; थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन जाणून घेतल्या समस्या
माझं विधान पुणे शहरापुरतं होतं, जिल्ह्याबद्दल नव्हतं; सुप्रिया सुळे...
Supriya Sule : माझं विधान पुणे शहरापुरतं होतं, जिल्ह्याबद्दल नव्हतं; सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?
रोहित पवार यांचं सुनेत्रा पवार यांच्याबद्दल ते वक्तव्य; सुप्रिया सुळे
Supriya Sule : रोहित पवार यांचं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबद्दल ते वक्तव्य; सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया
ऑपरेशन 3.0 होणार की नाही? उदय सामंतांनी स्पष्टच सांगितलं; पक्षप्रवेश..
Uday Samant : Shivsena : ऑपरेशन 3.0 होणार की नाही? उदय सामंतांनी स्पष्टच सांगितलं; पक्षप्रवेशाच्या चर्चांवरही दिलं उत्तर, म्हणाले...
सोलापूर जिल्हा बँकेत भाजपचा एकहाती विजय; 19 पैकी 18 जागांवर सहकार....
Solapur DCC Bank Result : सोलापूर जिल्हा बँकेत भाजपचा एकहाती विजय; 19 पैकी 18 जागांवर भाजप प्रणित सहकार विकास पॅनलचा झेंडा
सोलापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मोहिते पाटील गटाचा पहिला विजय....
Solapur DCC Bank Result : सोलापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मोहिते पाटील गटाचा पहिला विजय; अर्जुनसिंह मोहिते पाटील यांची बाजी
संसद अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या NCP कडून व्हिप जारी..
NCP : संसद अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या NCP कडून व्हिप जारी; नेमका काय आहे पक्षाचा निर्देश?