Sunil Tatkare -Ravindra Chavan Meet | रवींद्र चव्हाण-सुनील तटकरे यांच्यात बैठक, नेमकं कारण काय? मोठी माहिती समोर!
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्यात आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली याबाबत तटकरे यांनी माध्यमांशी माहिती दिली. तटकरे म्हणाले की, राज्यभरात झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुती म्हणून पुढील वाटचाल कशी करायची, यावर चर्चा करण्यात आली.
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्यात आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली याबाबत तटकरे यांनी माध्यमांशी माहिती दिली. तटकरे म्हणाले की, राज्यभरात झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुती म्हणून पुढील वाटचाल कशी करायची, यावर चर्चा करण्यात आली. विविध जिल्हा परिषदांमध्ये कोणत्या पक्षाचे किती संख्याबळ आहे, याचा आढावाही बैठकीत घेण्यात आला. तसेच, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) या तिन्ही पक्षांची स्थानिक पातळीवरील भूमिका काय असावी, यावरही सविस्तर चर्चा झाल्याचे तटकरे यांनी सांगितले. या सर्व मुद्द्यांवर अंतिम निर्णय महायुतीतील घटक पक्ष एकत्रितपणे घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
Published on: Feb 17, 2026 06:00 PM
उद्धव ठाकरेंच्या उपस्थित रामरक्षा पठणाला सुरुवात; पहा व्हिडीओ
उद्धव ठाकरेंच्या राम रक्षा आंदोलनासाठी महंत आणि पंडित दादरमध्ये दाखल
धो-धो पावसादरम्यानच गेले फिरायला अन् दोघं... पांडवकडा धबधब्यावर मोठी
खरंच काँग्रेसचा आमदार शिंदेंच्या संपर्कात? 20 कोटींची ऑफर...खुद्द नेता

