AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

10 हजार रुपयांच्या रेंजमध्ये येतात हे 5 स्मार्टफोन्स, पुढच्या वर्षी वाढू शकते किंमत…

तुमचे बजेट जर 10 ते 11 हजार रुपये दरम्यान असेल तर ऑनलाईन मार्केटमध्ये काही बजेट फोन आहेत,जे दैनंदिन वापरासाठी ठिकठाक आहे. यात कॅमेरा, बॅटरी, डिस्प्ले अशी वैशिष्ट्ये आहेत.

10 हजार रुपयांच्या रेंजमध्ये येतात हे 5 स्मार्टफोन्स, पुढच्या वर्षी वाढू शकते किंमत...
Realme C63 5G
| Updated on: Nov 15, 2026 | 7:18 PM
Share

जर तुमचे बजेट 10 ते 11 हजार रुपये दरम्यान आहे. जर ऑनलाईन मार्केटमध्ये काही असे मोबाईल फोन आहेत जे दैनंदिन वापरासाठी चांगले फिचर्स देतात. यात 5G कनेक्टिव्हीटी, मोठा बॅटरी , 50MP पर्यंतचा कॅमरा आणि 128GB पर्यंतचे स्टोरेज वाले पर्याय देखील सामील आहेत.

मात्र, या बजेटमध्ये प्रत्येक फोन हा प्रत्येक बाबतीत चांगला असेल असे नाही. एखाद्या फोनमध्ये प्रोसेसर चांगला मिळेल तर एखाद्यात मोठी बॅटरी वा जास्त स्टोरेज मिळेल. आम्ही Amazon आणि Flipkart च्या लिस्टिंगसह स्मार्टफोनची किंमत, स्पेसिफिकेशन आणि युजर रेटिंगला पाहाता 5 पर्याय निवडले आहेत. याच्या किंमती ऑनलाईल ऑफर आणि उपलब्धता याच्या प्रमाणता बदलू शकतात.

1. Realme C63 5G: 5G आणि 6GB RAM वाला पर्याय

जर तुमचे प्राधान्य 5G कनेक्टिव्हीटी आणि जास्त RAM असेल तर Realme C63 5G फोनला पाहू शकता. याच्या 6GB RAM आणि 128GB स्टोरेजच्या व्हेरिएंटची ऑनलाईन किंमत सुमारे 10,999 रुपये दाखवण्यात आली आहे.या फोनमध्ये MediaTek Dimensity 6300 प्रोसेसर देण्यात आला आहे.यात 6.67 इंचाचा IPS LCD डिस्प्ले, 32MP चा रियर कॅमरा आणि 8MP चा फ्रंट कॅमेरा आहे. या फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी आहे.

मात्र, याची 10W चार्जिंग आजच्या काळानुसार हळू होते. जर तुम्हाला जास्त स्टोरेज आणि 5G हवे आणि फास्ट चार्जिंगला तुमचे प्राधान्य नसेल तर तुम्ही या फोनला पाहू शकता.

2. POCO C75 5G: कमी किंमतीत 5G फोन

POCO C75 5G त्या लोकांसाठी चांगला पर्याय आहे ज्यांनी कमी किंमतीत 5G फोन घ्यायचा आहे. याच्या 4GB RAM आणि 64GB स्टोरेज वाल्या व्हेरिएंटची किंमत सुमारे 10,999 रुपये आहे यात Qualcomm Snapdragon 4s Gen 2 प्रोसेसर देण्यात आला आहे. फोनमध्ये 6.88 इंचाचा HD+ IPS LCD डिस्प्ले मिळतो. यात 50MP चा रिअर कॅमेरा, 5MP चा फ्रंट कॅमरा आणि 5,160mAh ची बॅटरी क्षमता दिली आहे. हा फोन 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो.

3. Tecno Pop 9: 128GB स्टोरेज आणि 5G सपोर्ट

Tecno Pop 9 चा 4GB RAM आणि 128GB स्टोरेज वाला व्हेरिएंट सुमारे 9,799 रुपयांत Flipkart वर लिस्टेड आहे. हा फोन 5G कनेक्टिव्हीटीला सपोर्ट करतो. फोनमध्ये 6.67 इंचाचा IPS LCD डिस्प्ले, 48MP चा रिअर कॅमेरा आणि 8MP चा फ्रंट कॅमेरा दिला आहे. यात 5,000mAh ची बॅटरी आहे, जी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

4. Xiaomi Redmi 12: कॅमेरा आणि डिस्प्ले चांगला हवा त्यांच्यासाठी

Xiaomi Redmi 12 चा 6GB RAM आणि 128GB स्टोरेजवाले व्हेरिएंट सुमारे 9,995 रुपयांत Flipkart वर लिस्टेड आहे.

यात MediaTek Helio G88 प्रोसेसर देण्यात आला आहे. फोनमध्ये 6.79 इंचाचा IPS LCD डिस्प्ले, 50MP चा मेन कॅमेरा, 8MP चा अल्ट्रा-वाईड कॅमेरा आणि 2MP चा मायक्रो कॅमरा दिला आहे. सेल्फीसाठी यात 8MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी आणि 18W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट आहे.

याचा मोठा डिस्प्ले आणि अल्ट्रा-वाईड कॅमेरा या बजेटमध्ये याचे वैशिष्ट्ये आहे. मात्र, हा एक 4G फोन आणि तो ऑगस्ट 2023 मध्ये लाँच झाला होता. जर तुम्हाला 5G कनेक्टिव्हीटी हवी असेल तर अन्य पर्याय निवडणे योग्य असेल.

5. Ai+ Pulse 2 FE: कमी किंमतीत 50MP चा कॅमेरा

Ai+ Pulse 2 FE त्या लोकांसाठी एक चांगला पर्याय आहे, ज्यांचे बजेट 9,000 रुपयांच्या आसपास आहे. याच्या 4GB RAM आणि 64GB स्टोरेज वाल्या व्हेरिएंटची किंमत सुमारे 8,999 रुपये दाखवण्यात आली आहे. फोनमध्ये MediaTek Helio G81 प्रोसेसर, 6.67 इंचाचा LCD डिस्प्ले आणि 50MP + 2MP चा रिअर कॅमरा सेटअप मिळतो. सेल्फीसाठी यात 8MP चा फ्रंट कॅमेरा दिला आहे. यात 5,000mAh ची बॅटरी आहे आणि 18W चार्जिंगचा सपोर्ट मिळतो.

याची किंमत आणि कॅमेरा स्पेसिफिकेशन यास सामान्य वापरासाठी एक चांगला पर्याय बनवतात. मात्र, यात देखील 5G सपोर्ट नाही आणि 64GB स्टोरेज देखील मर्यादित वाटू शकतो. जर तुम्ही जास्त ऐप्स आणि फाईल ठेवत असाल तर खरेदी करण्याआधी स्टोरेजची माहिती आधी घ्या..

Follow Us
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना...
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा; संजय राऊतांचा इशारा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा खुलासा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा मोठा खुलासा, म्हणाले...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्सवरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपटावरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी अखेर मौन सोडलं, थेट केलं मोठं विधान...
अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी..
IND vs NZ: अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी सामना जिंकला
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? कारण काय?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? अजित पवारांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात शरद पवारांना निमंत्रण
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील...
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील, दुष्काळी परिस्थितीमुळे जीवन विस्कळीत
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इ
Manoj Jarange Patil : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इशारा
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले?
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले? अमरावतीतील राजकाणात मोठ्या घडामोडी
जीव गेला तरी जमीन देणार नाही! शक्तीपीठ महामार्गाविरोधात 22 गाव...
जीव गेला तरी जमीन देणार नाही! शक्तीपीठ महामार्गाविरोधात 22 गावांतील शेतकरी आक्रमक
श्रीवर्धन आमचा अभेद्य बालेकिल्ला! महेंद्र दळवींच्या टीकेवर तटकरे...
श्रीवर्धन आमचा अभेद्य बालेकिल्ला! महेंद्र दळवींच्या टीकेवर सुनील तटकरेंचं सूचक उत्तर