AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Success Story : गरीबीमुळे आदर्श कुमारचं IIT चं स्वप्न भंगलं, पण पठ्ठ्याने हार मानली नाही, वयाच्या 20 व्या वर्षी 25 हजार विद्यार्थ्यांचं भविष्य घडवलं

एकेकाळी स्वत:ची स्वप्न पुर्ण करण्यासाठी धडपडणारा मुलगा आज अवघ्या 20 व्या वर्षी लाखो मुलांचे स्वप्न पूर्ण करतोय. आदर्श कुमारच्या या कामाची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली असून त्याला ब्रिटनचा प्रतिष्ठित 'डायनां पुरस्कार' मिळाला आहे.

Success Story :  गरीबीमुळे आदर्श कुमारचं IIT चं स्वप्न भंगलं,  पण पठ्ठ्याने हार मानली नाही, वयाच्या 20 व्या वर्षी 25 हजार विद्यार्थ्यांचं भविष्य घडवलं
| Updated on: Nov 16, 2026 | 2:18 PM
Share

वयाच्या अवघ्या 14 व्या वर्षी खिशात फक्त 1 हजार रूपये घेऊन हा मुलगा घराबाहेर पडला. स्वप्न होतं ते IIT मध्ये शिकण्याचं; पण महागड्या कोचिंगसाठी पैसे नसल्याने त्याला प्रवेश घेता आला नाही. अशा वेळी अनेक जण निराश होऊन माघारी फिरले असते. पण बिहारच्या आदर्श कुमारने वेगळाच मार्ग निवडला. स्वत:साठी संधी शोधताना त्याने इतर विद्यार्थ्यांनाही मार्ग दाखवण्याचे काम सुरू केले. आज त्याच्या याच कामाची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली असून त्याला ब्रिटनचा प्रतिष्ठित ‘डायनां पुरस्कार’ मिळाला आहे.

आदर्श कुमार हा बिहारमधील चंपारण परिसरातील रहिवासी आहे. त्याच्या आईने घरकाम करून त्याच्या शिक्षणाचा खर्च भागवला. आर्थिक परिस्थिती बेतची असतानाही आईने आपल्या बचतीतून त्याला लॅपटॉप घेऊन दिला. याच लॅपटॉपच्या मदतीने आदर्शने कोंडिग, तंत्रज्ञान आणि व्यवसायाबद्दल शिकायला सुरूवात केली.

IIT ची तयारी करण्यासाठी वयाच्या 14 व्या वर्षी तो अवघ्या 1, 000 रुपये घेऊन कोटा येथे गेला.मात्र महागड्या कोचिंग क्लासची फी परवडत नसल्याने त्याला प्रवेश घेता आला नाही. त्यानंतर त्याने हार न मानता सार्वजनिक वाचनालय आणि मोफत WIFI चा वापर केला. इंटरनेटच्या माध्यमातून मार्गदर्शकांशी संपर्क साधला. इंटर्नशिपच्या संधी शोधल्या आणि उद्योजकांकडून शिकण्याचा प्रयत्न केला. आदर्शने वयाच्या 13 व्या वर्षी ‘ मिशन बदलाव’ या सामाजिक उपक्रमाची सहस्थापना केली होती. शिक्षण, आरोग्य आणि पर्यावरणाशी संबंधित प्रश्नांवर काम करणं हा या उपक्रमाचा उद्देश होता. त्यानंतर 2023 मध्ये अवघ्या 16 व्या वर्षी त्याने ‘स्किल्झो’ हे शैक्षिणिक व्यासपीठ सुरू केलं. या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, कौशल्य विकास, उद्योजकतेचं प्रशिक्षण आणि करिअरच्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जातो.

आज स्किल्झोच्या माध्यमातून 25, हजारांहून अधिक विदर्थ्यांना शैक्षणिक आणि व्यावसायिक संधीही जोडण्यात आल्याची माहिती आहे. विशेषत: मोठ्या शहरांपासून दूर असलेल्या विदर्थ्यांनाही योग्य मार्गदर्शन मिळावं, यावर या उपक्रमाचा भर आहे.

आदर्शला मिळालेला डायना पुरस्कार हा त्याचा पहिलाच मोठा सन्मान नाही. 2025 मध्ये तो ‘चेग डॉट ऑर्ग ग्लोबल स्टुडंट प्राईज’ मिळवणारा पहिला भारतीय ठरला होता. या पुरस्कारासोबत त्याला एक लाख डॉलरचा पुरस्कार मिळाला. सध्या तो कतारमधील जॉर्जटाऊन विद्यापीठात शिक्षण घेत आहे.

Follow Us
पुण्यात अजितदादांच्या पुतळ्याचे अनावरण; सुनेत्रा पवार भावुक...
Sunetra Pawar : पुण्यात अजितदादांच्या पुतळ्याचे अनावरण; सुनेत्रा पवार भावुक
लातूर बँक निवडणुकीत धीरज देशमुखांचा दबदबा! 19 पैकी 19 जागांचा निकाल पह
लातूर बँक निवडणुकीत धीरज देशमुखांचा दबदबा! 19 पैकी 19 जागांचा निकाल पहा...
मुलगी नताशाच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड ठाम भूमिका; शरद पवारांचा...
मुलगी नताशाच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड ठाम भूमिका; शरद पवारांचा उल्लेख करत म्हणाले...
बिनविरोध निवडीचा मान कायम! जय शाह पुन्हा सांभाळणार आयसीसीची धुरा
Jay Shah : बिनविरोध निवडीचा मान कायम! जय शाह पुन्हा सांभाळणार आयसीसीची धुरा
अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर गोळीबाराचा कट उधळला; बिश्नोई
अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर गोळीबाराचा कट उधळला; बिश्नोई गँगशी कनेक्शन उघड
पुण्यात दिवंगत नेते अजित पवारांच्या पुतळ्याचे अनावरण; अमित शाहांसह...
पुण्यात दिवंगत नेते अजित पवारांच्या पुतळ्याचे अनावरण; अमित शाहांसह अनेक नेत्यांची उपस्थिती!
जिल्हा बँक निवडणुकीच्या 15 पैकी 4 जागांचा निकाल जाहीर
Latur Bank Election : जिल्हा बँक निवडणुकीच्या 15 पैकी 4 जागांचा निकाल जाहीर
डिलिमिटेशन विधेयकावर नताशा आव्हाड आक्रमक; स्वतःच्याच पक्षाच्या विरुद्ध
मोठी बातमी! डिलिमिटेशन विधेयकावर नताशा आव्हाड आक्रमक; स्वतःच्याच पक्षाच्या विरुद्ध...
मुंबईतील 300 हून अधिक SRA प्रकल्पांत घोटाळा? 30 हजार कोटीचा नुकसान...
Sanjay Raut : मुंबईतील 300 हून अधिक SRA प्रकल्पांत घोटाळा? 30 हजार कोटीचा नुकसान, राऊतांच्या दाव्याने खळबळ
अमित शहांच्या स्वागतासाठी पुण्यात शिंदेसेनेची जोरदार बॅनरबाजी; भाजप...
अमित शहांच्या स्वागतासाठी पुण्यात शिंदेसेनेची जोरदार बॅनरबाजी; भाजपलाही टाकलं मागे!