AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Devendra Fadnavis : अजितदादांकडे दोनच शब्द होते, मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला अजितदादांच्या स्वभावातला खास गुण

Devendra Fadnavis : "दादांनी अनेक अर्थसंकल्प मांडले पण आर्थिकशिस्त मोडू दिली नाही. वेगवेगळ्या कामात पैसा लावताना त्याची गुणवत्ता, क्वालिटी असली पाहिजे याकडे दादांचा आग्रह असायचा"

Devendra Fadnavis : अजितदादांकडे दोनच शब्द होते, मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला अजितदादांच्या स्वभावातला खास गुण
Devendra Fadnavis
| Updated on: Nov 16, 2026 | 2:01 PM
Share

आज पुणे जिल्हा परिषद कार्यालयात महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण झालं. या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजितदादांच्या आठवणी जागवल्या. “आपण एखाद्या पुतळ्याच्या कार्यक्रमाच्या अनावरणाला जातो, तेव्हा त्या कार्यक्रमाचा मनात एक आनंद असतो. पण आजचा कार्यक्रम वेगळा आहे. ज्यांच्याकडून संपूर्ण आयुष्य जगण्याची अपेक्षा होती, त्यांच्याकडून खूप काम झालेल पण अजूनही जास्त कामाची अपेक्षा होती. महाराष्ट्रात त्यांचं नेतृत्व बहरत होतं, अशावेळी अजितदादा आपल्यातून निघून गेले. त्यांच्या पुतळ्याच्या अनावरणाच्यावेळी आपल्या सर्वांच्या मनात आठवणींच काहूर आहे” असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

“त्यांच्यासोबत जे क्षण घालवले त्याचा आनंद देखील आहे. पण ते आपल्यात नाही याचं मनस्वी दु:ख देखील आहे. अशा समिश्र भावना मनामध्ये असताना पुणे जिल्हा परिषदेने सर्वात पहिल्यांदा पुढाकार घेऊन दादांचा अधाकृती पुतळा बसवण्याचा निर्णय घेतला. प्रवेशद्वाराला त्यांचं नाव दिलं. त्या बद्दल त्यांचे आभार मानतो” असं फडणवीस यांनी सांगितलं.

ते कधीही विसरता येऊ शकत नाही

“जिल्हा परिषदा, पंचायत समित्या दादांच्या नेतृत्वात काम करत होत्या. पिंपरी-चिंचवड महानगर पालिका असेल, महाराष्ट्रात दादांचं नेतृत्व होतं. या सगळ्या भागाच्या विकासासाठी दादांनी जे योगदान दिलं ते कधीही विसरता येऊ शकत नाही. दादांशिवाय तो आलेख पूर्ण होऊ शकत नाही” असं फडणवीस म्हणाले.

जे पटलं त्याला हो म्हणणार

“एक कणखर, शिस्तबद्ध आणि दूरदृष्टी असलेला नेता अशा विविध विशेषण त्यांना देता येतील. कुठलीही गोष्ट थेट बोलणं राजकारणात कमी पहायला मिळते. राजकारणात कुणाला थेट बोलता येत नाही. दादांकडे हो आणि नाही असे दोनच शब्द होते. जे पटलं त्या हो म्हणणार आणि मगं ते काम करुन घेण्यासाठी त्याच्या पाठिमागे उभं राहणार. पण जे नाही पटलं ते नाही म्हणणार. असं सांगण्याची हिम्मत असलेले दादा होते” असं देवेद्र फडणवीस यांनी सांगितलं. “केलेल्या कामांची पाहणी करणं, त्याची गुणवत्ता तपासणं हे काम ते स्वत: करायचे. त्यांनी स्वत:ला एक शिस्त लावलेली होती. सकाळी 6 वाजता उठून कामाला सुरुवात करायचे. 8 वाजता मंत्रालयात असायचे” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Follow Us
लातूर बँक निवडणुकीत धीरज देशमुखांचा दबदबा! 19 पैकी 19 जागांचा निकाल पह
लातूर बँक निवडणुकीत धीरज देशमुखांचा दबदबा! 19 पैकी 19 जागांचा निकाल पहा...
मुलगी नताशाच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड ठाम भूमिका; शरद पवारांचा...
मुलगी नताशाच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड ठाम भूमिका; शरद पवारांचा उल्लेख करत म्हणाले...
बिनविरोध निवडीचा मान कायम! जय शाह पुन्हा सांभाळणार आयसीसीची धुरा
Jay Shah : बिनविरोध निवडीचा मान कायम! जय शाह पुन्हा सांभाळणार आयसीसीची धुरा
अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर गोळीबाराचा कट उधळला; बिश्नोई
अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर गोळीबाराचा कट उधळला; बिश्नोई गँगशी कनेक्शन उघड
पुण्यात दिवंगत नेते अजित पवारांच्या पुतळ्याचे अनावरण; अमित शाहांसह...
पुण्यात दिवंगत नेते अजित पवारांच्या पुतळ्याचे अनावरण; अमित शाहांसह अनेक नेत्यांची उपस्थिती!
जिल्हा बँक निवडणुकीच्या 15 पैकी 4 जागांचा निकाल जाहीर
Latur Bank Election : जिल्हा बँक निवडणुकीच्या 15 पैकी 4 जागांचा निकाल जाहीर
डिलिमिटेशन विधेयकावर नताशा आव्हाड आक्रमक; स्वतःच्याच पक्षाच्या विरुद्ध
मोठी बातमी! डिलिमिटेशन विधेयकावर नताशा आव्हाड आक्रमक; स्वतःच्याच पक्षाच्या विरुद्ध...
मुंबईतील 300 हून अधिक SRA प्रकल्पांत घोटाळा? 30 हजार कोटीचा नुकसान...
Sanjay Raut : मुंबईतील 300 हून अधिक SRA प्रकल्पांत घोटाळा? 30 हजार कोटीचा नुकसान, राऊतांच्या दाव्याने खळबळ
अमित शहांच्या स्वागतासाठी पुण्यात शिंदेसेनेची जोरदार बॅनरबाजी; भाजप...
अमित शहांच्या स्वागतासाठी पुण्यात शिंदेसेनेची जोरदार बॅनरबाजी; भाजपलाही टाकलं मागे!
आता कोकण मुंबईपासून आणखी जवळ! चिपी ते नवी मुंबई थेट विमानसेवा सुरू
आता कोकण मुंबईपासून आणखी जवळ! चिपी ते नवी मुंबई थेट विमानसेवा सुरू