AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Javed Akhtar : प्रभू रामाचं कौतुक करताच जावेद अख्तर रडारावर, मौलवीने दिलेल्या सल्लाने खळबळ

Javed Akhtar : अभिनेता रणबीर कपूर स्टारर 'रामायण' सिनेमाचं कौतुक केल्यानंतर संगीतकार जावेद अख्तर रडारवर आले आहेत. त्यांच्या वक्तव्यानंतर मौलवीने त्यांना मोठा सल्ला दिला आहे, ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे.

Javed Akhtar : प्रभू रामाचं कौतुक करताच जावेद अख्तर रडारावर, मौलवीने दिलेल्या सल्लाने खळबळ
| Updated on: Nov 18, 2026 | 12:30 PM
Share

Javed Akhtar : बॉलिवूडचे प्रसिद्ध आणि लोकप्रिय संगीतकार जावेद अख्तर कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. नुकताच झालेल्या एका कार्यक्रमात त्यांना विचारण्यात आलं की, ‘रामायण’ सिनेमाबद्दल तुम्हाला काय बोलायचं आहे. यावर जावेद अख्तर म्हणाले, सिनेमा पाहिलेला नाही. पण पाहण्याची इच्छा नक्कीच आहे.. राम फक्त एक व्यक्ती नाही तर, एक आदर्श आहेत, जीवन जगण्याचा एक मार्ग आहे. कोणत्याही धर्माचा असो, पण भारतातील प्रत्येक व्यक्तीच्या रक्तात राम आहेत…’, जावेद अख्तर यांनी असं वक्तव्य केलं. पण त्यावर मौलवीने संताप व्यक्त केला आहे. शिवाय जावेद अख्तर यांनी मोठा सल्ला दिला, ज्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

‘रामायण’ सिनेमाचं समर्थन केल्यानंतर ऑल इंडिया इमाम असोसिएशनचे मौलाना साजिद रशीदी यांनी त्यांना लक्ष्य केलं आहे. मौलाना साजिद रशीदी म्हणाले, ‘जावेद अख्तर आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब हे एक व्यावसायिक कुटुंब आहे. बॉलिवूडमध्ये त्यांची गाणी विकली जातात. अशात जर त्यांनी अशा गोष्टी केल्या नाहीत, तर त्यांची गाणी कोण विकत घेणार? ते सार्वजनिक मंचावर अनेकदा बोलले आहेत की मी नास्तिक आहे. एका मोठ्या चर्चेदरम्यान त्यांनी म्हटलं होतं की मी कोणत्याही धर्माला मानत नाही.

‘मी अल्लाह किंवा रामाला मानत नाही. म्हणजेच, ते मानतातच की ईश्वर अस्तित्वात नाहीच. जे नास्तिक आहेत ते रामावर एवढी श्रद्धा दाखवत असतील, तर माझा त्यांना एक सल्ला आहे की त्यांनी घरवापसी करावी आणि स्वतःचं नाव जावेद अख्तर ऐवजी ‘रामपाल’ ठेवावं. त्यांना हे नाव छान वाटेल. कमीत कमी 80 टक्के हिंदू तुम्हाला पूर्ण मान आणि सन्मान देतील. आता तर तुम्ही कुंपणावरचे झाला आहात, कधी इकडे तर कधी तिकडे, त्यामुळे तुम्ही एका बाजूला आलं पाहिजे जेणेकरून हिंदू तुमचा पूर्ण सन्मान करतील. कैफी आझमीसुद्धा गाणी लिहायचे, त्यांनी कधीही पैशासाठी आपला इमान विकला नाही…’, मौलवी असं संतापात म्हणाले.

सांगायचं झालं तर, जावेद अख्तर यांनी याआधी एकदा धर्माबद्दल मोठं वक्तव्य केलं होतं. ते म्हणालेले, ‘मी धार्मिक लोकांचा आदर करतो… माझा जन्म मुस्लिम कुटुंबात झाला आहे आणि माझ्यावर संस्कार देखील तसेच झाले आहेत. पण तरुण वयात मी नास्तिक झालो. मी मुस्लिम कुटुंबात जन्मलोय, त्यामुळे मी ते पाळत आहे.” एका धार्मिक मुद्द्यावरील वक्तव्यानंतर झालेल्या ट्रोलिंगबद्दल बोलताना ते म्हणाले होते, “जेव्हा मला धर्माच्या नावाखाली ट्रोल केलं जाते, तेव्हा मला हसू येतं. बरेच जण मला ‘जिहादी’ म्हणतात, तर अनेक जण मला पाकिस्तानात जाण्याचा सल्ला देतात. मी या गोष्टींकडे एक विनोद म्हणून पाहतो.’, असं देखील जावेद अख्तर म्हणालेले.

Follow Us
भारताची मोठी झेप! बर्ड फ्लूला रोखण्यासाठी देशाची पहिली स्वदेशी H5N1 लस
भारताची मोठी झेप! बर्ड फ्लूला रोखण्यासाठी देशाची पहिली स्वदेशी H5N1 लस विकसित
राहुल गांधींचा अमेरिका दौरा चर्चेत; कोलंबिया विद्यापीठातील भाषणातून...
राहुल गांधींचा अमेरिका दौरा चर्चेत; कोलंबिया विद्यापीठातील भाषणातून दिले महत्त्वाचे संकेत!
प्रदिप पूर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर; कुटुंबियांचा लढा कायम, आता...
Pradip Purnekar Case : प्रदिप पूर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर; पुर्णेकर कुटुंबियांचा लढा कायम, आता थेट...
राष्ट्रवादीच्या सतीश पाटलांची जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीतून माघार;
NCP : राष्ट्रवादीच्या सतीश पाटलांची जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीतून माघार; म्हणाले, जेव्हा स्वतःच्याच पक्षाकडून फसवणूक...
साताऱ्यातील तारळी प्रकल्पाचे काम थांबवले; अदानी एनर्जीचे अधिकारी...
साताऱ्यातील तारळी प्रकल्पाचे काम थांबवले; अदानी एनर्जीचे अधिकारी मंत्रालयात...
सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा आज फैसला; कोण कोण आहे रिंगणात?
Satara Bank Election : सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा आज फैसला; कोण कोण आहे रिंगणात?
श्रद्धांजली वाहीली नाही, तर बाळासाहेबांचं महत्त्व कमी होत नाही; - राऊत
श्रद्धांजली वाहीली नाही, तर बाळासाहेबांचं महत्त्व कमी होत नाही; संजय राऊतांचा भाजपवर पटलवार
बाळासाहेबांचा वारसा हवा, पण हिंदुत्व नको? राहुल गांधींच्या मुद्द्यावरू
बाळासाहेबांचा वारसा हवा, पण हिंदुत्व नको? राहुल गांधींच्या मुद्द्यावरून नवनाथ बनांचा ठाकरे गटाला टोला!
अमित शहा अन् एकनाथ शिंदे यांच्यात महत्त्वाची बैठक; महाराष्ट्राच्या...
अमित शहा अन् एकनाथ शिंदे यांच्यात महत्त्वाची बैठक; महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण!
गोकुळ दूध महागणार! ग्राहकांना प्रति लिटर 4 रुपये अधिक मोजावे लागणार?
गोकुळ दूध महागणार! ग्राहकांना प्रति लिटर 4 रुपये अधिक मोजावे लागणार? शेतकऱ्यांनाही...