Supriya Sule: मफलर मॅन प्रकरणात मोठा ट्विस्ट, रोहित पवारांच्या भूमिकेशी राष्ट्रवादीची फारकत? सुप्रिया सुळे म्हणाल्या काय?
Supriya Sule on Rohit Pawar: आमदार रोहित पवार यांनी सोमवारी मफलर मॅन बॉम्ब टाकला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे याप्रकरणातील आरोपांना वाचवत असल्याचा आरोप केला. आता ही राष्ट्रवादीची अधिकृत भूमिका आहे का? असा सवाल भाजपकडून करण्यात आला. त्यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठा दावा केला आहे.

Supriya Sule on Rohit Pawar: आमदार रोहित पवार यांनी सोमवारी मफलर मॅन म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो दाखवला. ते आरोपींना वाचवत असल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यांनी व्ही. एस. आर कंपनीच्या मालकाची मालमत्ता आणि गुन्हेगारी जगताशी त्यांचा संबंध यावरून मोठे आरोप केले होते. या दाव्यानंतर भाजपच्या गोटाकडून ही राष्ट्रवादीची अधिकृत भूमिका आहे का? असा सवाल करण्यात आला. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी यावर भाष्य करण्याची मागणी करण्यात येत होती. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी यावर मोठे वक्तव्य केले.
रोहित पवारांच्या भूमिकेशी फारकत?
मुख्यमंत्र्यांवर रोहित पवार यांनी केलेले आरोप मान्य आहेत का, असा सवाल भाजपच्या गोटातून करण्यात येत होता. त्यावर आज खासदार सुप्रिया सुळे यांनी भूमिका मांडली. ज्या व्हिडिओमध्ये त्याने जे काय पाहिलं ते मला माहिती नाही आणि पक्षाची काय भूमिका आहे हे मी काल पुण्यामध्ये सविस्तर म्हटले आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. त्यांनी स्वतः सांगितलं आहे. यात पाठिंबासारखं काय आहे हे काय एक पॉलिसी नाही आहे. मी पूर्ण पत्रकार परिषद पाहिलेले नाही, मी जे वर्तमानपत्रात आलेले आहे ते वाचलं आहे. याविषयात मला विचारण्यापेक्षा या देशांमध्ये खूप सारे एक्सपर्ट आहेत. मला यात काय माहित नाही टेक्निकली मी यामध्ये उत्तर देऊ शकत नाही. रोहित पवार यांनी पक्ष म्हणून पत्रकार परिषद घेतलेली नाही, रोहित पवार यांनी स्वत: वैयक्तिक हे मत मांडलेले आहे, असे मोठे वक्तव्य खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.
व्हीएसआर कंपनी आणि अपघाताविषयावर बोलताना यामध्ये मला नाही सांगता येणार मी सिव्हिल एविएशन एक्सपर्ट नाही . रोहित पवार आणि उमेश पाटील या दोघांचा तुम्ही उल्लेख करत आहात. उमेश पाटील यांचा पक्ष सरकारमध्ये आहे. मी काही पुण्यामध्येही बोलले आहे रोहित निकाल एक मागणी केली आहे देशाच्या गृहमंत्राकडे मागणी केली आहे त्या रिपोर्टची आपण सगळेजण वाट बघूयात, अशी भूमिका खासदार सुळे यांनी मांडली.
मतदारसंघ पुनर्रचना काय भूमिका?
डी लिमिटेशनची भूमिका मांडली आहे. ती राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. ज्यांनी पब्लिकली विरोध केला. त्यांनी सुप्रिया सुळे यांना फोन केला, किती लोकांनी बिल वाचले आहे, असा सवाल त्यांनी विचारला. नताशा आव्हाड लंडनला आहेत, असे जितेंद्र आव्हाड यांनी मला सांगितलं. जितेंद्र आव्हाड हे पक्षाचे नेते आहेत. जितेंद्र आव्हाड यांचं याबाबतचे मत याआधीही घेतलेले आहे, उद्याही घेतला जाईल. जितेंद्र आव्हाड यांचा प्रचंड योगदान राहिलेला आहे त्यामुळे प्रत्येक जडणघडण मध्ये त्यांचं मत घेतलं जाईल, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी माहिती दिली.
शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपयांची मदत द्या
राज्यात मोठा दुष्काळ आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना याविषयी दोन पत्रं दिली आहेत. आमची सरकारला सहकार्याची भूमिका आहे. आज अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे. त्याच बरोबर पाणी वाटप योग्य झालं पाहिजे. मुलांच्या शाळा, महाविद्यालयाचे शुल्क माफ झाले पाहिजे. ही राजकारण करण्याची वेळ नाही. आम्ही हेक्टरी एक लाख रुपये देण्यासाठी मागणी केली आहे. सरकारने अतिशय संवेदनशीलपणे वागावं. शेतकरी आत्महत्या आमच्या किंवा त्यांच्या कळत झाल्या त्यावर त्यांनी आरोप केले त्यावेळी त्यावर मी आता त्यांच्यावर बोलणार नाही. काल मी बारामती लोकसभा मतदार संघाचा आढावा घेतला, जे शेतकरी वंचित राहिले आहेत, त्यावर कलेक्टर निकाले ही सांगितला आहे की जो कोणी शेतकरी तुमच्या निदर्शनास येईल त्यांना तातडीने मदत केली जाईल, अशी माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली.
