NCP : राष्ट्रवादीच्या सतीश पाटलांची जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीतून माघार; म्हणाले, जेव्हा स्वतःच्याच पक्षाकडून फसवणूक…
जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीतून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सतीश पाटील यांनी माघार घेतली आहे. पक्षाने फसवणूक केल्याचा आणि ओबीसी प्रवर्गाची जागा भाजपने घेतल्याने अन्याय झाल्याचा आरोप त्यांनी केला. यावर माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी सतीश पाटलांना थेट आरोप न करण्याचा सल्ला दिला आहे.
जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीतून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सतीश पाटील यांनी माघार घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. स्वपक्षातील नेत्यांवर फसवणूक आणि अन्यायाचा आरोप करत त्यांनी ही भूमिका घेतली आहे. ओबीसी प्रवर्गाची जागा भाजपला देण्यात आल्याने आपल्यावर अन्याय झाल्याचे सतीश पाटील यांचे म्हणणे आहे, ज्यामुळे त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सतीश पाटील यांच्या या आरोपांना माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. सतीश पाटील हे पक्षाचे ज्येष्ठ नेते असून त्यांनी पक्षातील नेत्यांवर थेट आरोप करणे चुकीचे असल्याचे देवकर यांनी म्हटले आहे. माघार घेण्यामागचे कारण स्पष्ट करताना सतीश पाटील म्हणाले, “जेव्हा पक्षाकडूनच आपली फसवणूक केली जाते, असे लक्षात आले तेव्हा माघारीशिवाय दुसरा पर्याय नव्हता.
“सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेसने पाच किंवा चार जागांचा आग्रह धरला होता. तसेच, परवा झालेल्या बैठकीतही एक ओबीसी, एक इतर, एक अनिलदादा आणि एक संजय पवारांची जागा निश्चित झाली होती. मात्र, काल नेमके काय बदल झाले हे माहित नाही, असे ते म्हणाले. आजही पावणेतीन वाजेपर्यंत मला थांबायला सांगितले होते, पण ते झाले नाही आणि शेवटी तीन वाजता माघार घेण्याची वेळ आल्याने मी माघारीला आलो. या घटनेमुळे पक्षातली लोकं किती निष्ठावान आहेत, हे आज पाहायला मिळाल्याचे पाटील यांनी नमूद केले.
Published on: Nov 18, 2026 11:20 AM
राष्ट्रवादीच्या सतीश पाटलांची जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीतून माघार;
साताऱ्यातील तारळी प्रकल्पाचे काम थांबवले; अदानी एनर्जीचे अधिकारी...
सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा आज फैसला; कोण कोण आहे रिंगणात?
श्रद्धांजली वाहीली नाही, तर बाळासाहेबांचं महत्त्व कमी होत नाही; - राऊत

