AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मी पायाने गाठ मारली तर, ती… उदय सामंत यांचं सूचक विधान, इशारा कुणाला?

उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या 'मी पायाने गाठ मारली तर ती हातानेही सुटणार नाही' या विधानामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. 'ऑपरेशन टायगर'च्या सूचनेसह, सामंतांचा हा इशारा नेमका कुणाकडे आहे, राष्ट्रवादी की भाजप, याची चर्चा आहे. कार्यकर्ता मेळाव्यात दादागिरीला प्रत्युत्तर देताना, सामंत हतबल नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या विधानाने राजकीय भूकंपाचे संकेत मिळत आहेत.

मी पायाने गाठ मारली तर, ती... उदय सामंत यांचं सूचक विधान, इशारा कुणाला?
uday samantImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 18, 2026 | 12:59 PM
Share

गेल्या दोन दिवसांपासून राज्याचे उद्योगमंत्री आणि शिंदे गटाचे नेते उदय सामंत चांगलेच चर्चेत आहेत. शिंदे गटाचे नेते भास्कर जाधव आणि उदय सामंत यांच्या भेटीनंतर चर्चांना उधाण आलं आहे. त्यातच उदय सामंत यांनी ऑपरेशन टायगर होणार असल्याचं सूचक विधान केल्याने मोठा राजकीय भूकंप होण्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यातच आता सामंत यांचं आणखी एक विधान चर्चेत आलं आहे. मी पायाने गाठ मारली तर ती हातानेही सुटणार नाही, असं सूचक विधान उदय सामंत यांनी केलं आहे. सामंत यांच्या विधानाची चर्चा रंगली असून त्यांचा नेमका रोख कुणाकडे आहे? असा सवालही केला जात आहे.

चिपळूण येथील अलोरे येथे एका कार्यकर्त्याचा वाढदिवस होता. या कार्यक्रमाला उद्योगमंत्री उदय सामंत आले होते. यावेळी त्यांनी हे सूचक विधान केलं. सध्या निवडणुकांचा किंवा राजकारणाचा मोसम नाही. मात्र, दादागिरी करून मतदारसंघात काम करता येईल, असे जर कोणाला वाटत असेल तर अजिबात काळजी करू नका. मी संयमी आहे. मी जी पायाने गाठ मारेन, ती कोणाला हातानेही सुटणार नाही, अशा शब्दांत उदय सामंत यांनी सूचक इशारा दिला आहे. त्यामुळे सामंत यांचा इशारा कुणाकडे आहे? याची चर्चा आता रंगली आहे. सामंत यांचा रोख राष्ट्रवादी काँग्रेस की भाजपकडे? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

सामंत हतबल नाही

पक्ष जरी वेगळे असले, तरी माझ्या कार्यकर्त्यांना कोणी त्रास देण्याचा प्रयत्न करत असेल तर पालकमंत्री म्हणून उदय सामंत तेवढा हतबल नाही, याची नोंद काही लोकांनी घ्यावी, असा इशाराच उदय सामंत यांनी दिला आहे.

काय म्हणाले होते सामंत?

उदय सामंत यांनी ऑपरेशन टायगरवर प्रतिक्रिया दिली होती. चार वर्षापूर्वी राज्यात फार मोठं ऑपरेशन झालं आहे. तेव्हा तारीख आणि वेळ कुणाला माहीत नव्हती. त्यामुळे यावेळीही ऑपरेशन टायगर नक्की आहे. फक्त तारीख आणि वेळ सांगणार नाही? असं सूचक विधान उदय सामंत यांनी केलं होतं.

शिंदे योग्यवेळी निर्णय घेतील

सामंत यांनी ऑपरेशन टायगरवर सूचक विधान केल्यावर त्यावर शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी विधान केलं होतं. उदय सामंत यांच्या विधानामागचे कारण म्हणजे अनेकजण आमच्या संपर्कात आहेत. अनेकजण एकनाथ शिंदे यांना भेटतात. आमच्यासारख्यांना भेटतात. कधी पक्ष प्रवेश करायचा अशी त्यांची आमच्याकडे डिमांड असते. मात्र या सर्वांचा निर्णय एकनाथ शिंदे घेतील, योग्य वेळी, योग्य निर्णय एकनाथ शिंदे घेतात, असं संजय शिरसाट म्हणाले होते.

Follow Us
भारताची मोठी झेप! बर्ड फ्लूला रोखण्यासाठी देशाची पहिली स्वदेशी H5N1 लस
भारताची मोठी झेप! बर्ड फ्लूला रोखण्यासाठी देशाची पहिली स्वदेशी H5N1 लस विकसित
राहुल गांधींचा अमेरिका दौरा चर्चेत; कोलंबिया विद्यापीठातील भाषणातून...
राहुल गांधींचा अमेरिका दौरा चर्चेत; कोलंबिया विद्यापीठातील भाषणातून दिले महत्त्वाचे संकेत!
प्रदिप पूर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर; कुटुंबियांचा लढा कायम, आता...
Pradip Purnekar Case : प्रदिप पूर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर; पुर्णेकर कुटुंबियांचा लढा कायम, आता थेट...
राष्ट्रवादीच्या सतीश पाटलांची जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीतून माघार;
NCP : राष्ट्रवादीच्या सतीश पाटलांची जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीतून माघार; म्हणाले, जेव्हा स्वतःच्याच पक्षाकडून फसवणूक...
साताऱ्यातील तारळी प्रकल्पाचे काम थांबवले; अदानी एनर्जीचे अधिकारी...
साताऱ्यातील तारळी प्रकल्पाचे काम थांबवले; अदानी एनर्जीचे अधिकारी मंत्रालयात...
सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा आज फैसला; कोण कोण आहे रिंगणात?
Satara Bank Election : सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा आज फैसला; कोण कोण आहे रिंगणात?
श्रद्धांजली वाहीली नाही, तर बाळासाहेबांचं महत्त्व कमी होत नाही; - राऊत
श्रद्धांजली वाहीली नाही, तर बाळासाहेबांचं महत्त्व कमी होत नाही; संजय राऊतांचा भाजपवर पटलवार
बाळासाहेबांचा वारसा हवा, पण हिंदुत्व नको? राहुल गांधींच्या मुद्द्यावरू
बाळासाहेबांचा वारसा हवा, पण हिंदुत्व नको? राहुल गांधींच्या मुद्द्यावरून नवनाथ बन यांचा ठाकरे गटाला टोला!
अमित शहा अन् एकनाथ शिंदे यांच्यात महत्त्वाची बैठक; महाराष्ट्राच्या...
अमित शहा अन् एकनाथ शिंदे यांच्यात महत्त्वाची बैठक; महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण!
गोकुळ दूध महागणार! ग्राहकांना प्रति लिटर 4 रुपये अधिक मोजावे लागणार?
गोकुळ दूध महागणार! ग्राहकांना प्रति लिटर 4 रुपये अधिक मोजावे लागणार? शेतकऱ्यांनाही...