AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Winter Fashion Tips: थंडीत फॅशनला करू नका ‘बाय – बाय’, आजच वार्डरोबमध्ये सामिल करा ‘या’ गोष्टी

Winter Fashion Tips: थंडीच्या दिवसांची आता सुरुवात झाली आहे. अशात अनेक महिला फॅशनला 'बाय - बाय' करतात, पण आता असं करायची गरज नाही. हिवाळ्यात देखील तु्म्हाला फॅशन करता येईल, फक्त तुमच्या वार्डरोबमध्ये या गोष्टी सामिल करा.

Winter Fashion Tips: थंडीत फॅशनला करू नका 'बाय - बाय', आजच वार्डरोबमध्ये सामिल करा 'या' गोष्टी
| Updated on: Nov 18, 2026 | 1:44 PM
Share

Winter Fashion Tips: वेगवेगळ्या प्रकारचे कपडे घालायला महिलांना प्रचंड आवडतं. पण हिवाळ्यात काही कपड्यांमध्ये प्रचंड थंडी वाजते. अशात अनेक महिला थंडीच्या दिवसांमध्ये फॅशनला ‘बाय बाय करतात. तर काही महिलांसाठी सर्वात मोठं आव्हान असतं की, स्टाईल करायची तरी कशी? कारण आपल्याला थंडीपासून बचावाबरोबरच स्टायलिश सुद्धा दिसायचं असतं. हिवाळ्यात आपल्याला कपड्यांच्या भरपूर व्हरायटी मिळतात. पण या ऋतूत फॅशनेबल आणि स्टायलिश दिसणं थोडं आव्हानात्मक ठरतं. बदलत्या ऋतूनुसार आपल्याला आपल्या वॉर्डरोबमध्येही बदल करावे लागतात. आज आम्ही तुम्हाला काही सोप्या विंटर हॅक्सबद्दल सांगणार आहोत, ज्यांचा अवलंब करून तुम्ही थंडीपासून बचाव करण्यासोबतच स्टायलिशही दिसू शकाल.

या हॅक्समुळे तुम्ही दिसाल स्टायलिश

कोट्स आणि जॅकेट्स : लॉन्ग कोट्स कधीही फॅशनसाठी बेस्ट आहेत. थंडीपासून वाचण्यासाठी प्रत्येकजण कोट आणि जॅकेट नक्कीच परिधान करतो. बाजारात अनेक प्रकारचे कोट्स आणि जॅकेट्स उपलब्ध असतात, ज्यांना तुम्ही तुमच्या पद्धतीने स्टाईल करून परिधान करू शकता. हे जिन्स, स्वेटर ड्रेस किंवा शॉर्ट्सवर देखील स्टाईल केले जाऊ शकतात.

लेयर्ड क्लोदिंग : फॅशनबाबत प्रयोग करण्यासाठी हिवाळा हा उत्तम ऋतू असतो. हिवाळ्यात वेगवेगळे कपडे एकत्र करून परिधान करता येतात. लेयरिंगचा अर्थ एकावर एक कपडे घालणे असा होतो. हिवाळ्याच्या दिवसांत जुन्या स्वेटरवर एक छान जॅकेट किंवा कोट घाला, यामुळे तुम्ही स्टायलिश दिसण्यासोबतच थंडीपासूनही सुरक्षित राहाल.

बूट्स : स्टायलिश दिसण्यासाठी तुम्ही विंटर बूट्स कॅरी करू शकता. उत्तम बूट्स केवळ तुमचे पाय ताजेतवाने आणि गरम ठेवत नाहीत, तर ते तुमचा संपूर्ण लुक देखील खुलवतात. विंटर बूट्सचे अनेक प्रकार असतात – जसे की चेल्सी बूट्स, एंकल बूट्स आणि ओव्हर-द-नी बूट्स. तुम्ही तुमचे लॉन्ग कोट्स किंवा स्कर्ट्ससोबत हे बूट्स पेअर करू शकता.

स्कार्फ आणि स्टोल : स्कार्फ आणि स्टोलची फॅशन कधीही संपत नाही. आजकाल यांची क्रेझ खूप वेगाने वाढत आहे. हे कॅरी केल्यामुळे लुक आणखी जास्त आकर्षक वाटतो. हिवाळ्यात तुम्ही कोणत्याही आउटफिटसोबत स्टोल कॅरी करू शकता, ज्यामुळे तुमचा लुक अधिक खुलून दिसेल.

Follow Us
शायना एनसी यांच्या हातून बाळासाहेब ठाकरेंचा फोटोही फाटला.....
Shivsena : सोनिया गांधींच्या पुस्तकाची प्रत फाडताना शायना एनसी यांच्या हातून बाळासाहेब ठाकरेंचा फोटोही फाटला
शिंदेंच्या शिवसेनेने सोनिया गांधींच्या पुस्तकाची प्रत फाडली....
Sonia Gandhi's Book : Shivsena : सावरकरांचा अपमान सहन करणार नाही...; शिंदेंच्या शिवसेनेने सोनिया गांधींच्या पुस्तकाची प्रत फाडली
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सुप्रिया सुळे आक्रमक; हेक्टरी 1 लाखांच्या
Supriya Sule : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सुप्रिया सुळे आक्रमक; हेक्टरी 1 लाखांच्या मदतीची मागणी!
भारताची मोठी झेप! बर्ड फ्लूला रोखण्यासाठी देशाची पहिली स्वदेशी H5N1 लस
भारताची मोठी झेप! बर्ड फ्लूला रोखण्यासाठी देशाची पहिली स्वदेशी H5N1 लस विकसित
राहुल गांधींचा अमेरिका दौरा चर्चेत; कोलंबिया विद्यापीठातील भाषणातून...
राहुल गांधींचा अमेरिका दौरा चर्चेत; कोलंबिया विद्यापीठातील भाषणातून दिले महत्त्वाचे संकेत!
प्रदिप पूर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर; कुटुंबियांचा लढा कायम, आता...
Pradip Purnekar Case : प्रदिप पूर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर; पुर्णेकर कुटुंबियांचा लढा कायम, आता थेट...
राष्ट्रवादीच्या सतीश पाटलांची जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीतून माघार;
NCP : राष्ट्रवादीच्या सतीश पाटलांची जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीतून माघार; म्हणाले, जेव्हा स्वतःच्याच पक्षाकडून फसवणूक...
साताऱ्यातील तारळी प्रकल्पाचे काम थांबवले; अदानी एनर्जीचे अधिकारी...
साताऱ्यातील तारळी प्रकल्पाचे काम थांबवले; अदानी एनर्जीचे अधिकारी मंत्रालयात...
सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा आज फैसला; कोण कोण आहे रिंगणात?
Satara Bank Election : सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा आज फैसला; कोण कोण आहे रिंगणात?
श्रद्धांजली वाहीली नाही, तर बाळासाहेबांचं महत्त्व कमी होत नाही; - राऊत
श्रद्धांजली वाहीली नाही, तर बाळासाहेबांचं महत्त्व कमी होत नाही; संजय राऊतांचा भाजपवर पटलवार