जमिनीतून बटाटा काढताच शेतकरी झाला करोडपती, शेतात असं सापडलं काय?
Crorepati Farmer: नशीब केव्हा पलटेल हे सांगता येत नाही. कधी कधी अचानक मोठी लॉटरी लागते, तसं या शेतकऱ्यासोबत घडलं. काम करत असताना त्याला आलू, बटाटासारखा एक दगड हाती लागला. तो पाहताच त्याचे डोळे चमकले. पुढे जे घडलं, ते त्याच्यासाठी स्वप्नवत प्रवास होता.

कोणाचं नशीब केव्हा उघडणार हे सांगता येत नाही. ऑस्ट्रेलियात एक शेतकरी सोन्याचा शोध घेत होता. तेव्हा त्याला शेतात असं काही मिळालं की, त्याचे डोळे चमकले. मेटल डिटेक्टरने तो बरड जागेवर सोन्याचा शोध घेत होता. तेव्हा त्याच्या हाती बटाट्यासारखा एक बेशकिंमती दगड हाती लागला. त्याने या व्यक्तीचे नशीब चमकवलं. सोन्याचा हा तुकडा बटाट्यासारखा होता. त्याचे वजन जवळपास 1.2 किलोग्राम इतके होते. त्याची किंमत एक कोटी इतकी आहे.
टिबूबुरा जवळ सापडला मोठा बटाटा
एबीसी वृत्तसंस्थेनुसार, ऑस्ट्रेलियातील न्यू साऊथ वेल्स येथील टिबूबुरा जवळ स्टर्ट स्टोनी डेजर्ट हा भाग आहे. या पट्ट्यात अनेकजण सोन्याचा शोध घेण्यासाठी येतात. या परिसरातील एक शेतकरी सुद्धा या परिसरात नशीब आजमावण्यासाठी पोहचला. तेव्हा एका बरड जमिनीवर त्याला एक वस्तू चमकली. त्याने ती वस्तू हातात घेतल्यावर ती बटाट्यासारखी दिसली. पण ही वस्तू वेगळी असल्याचे त्याच्या लक्षात आले.
मेटल डिटेक्टरच्या मदतीने ही व्यक्ती सोन्याचा शोध घेत होती. सुरुवातीला मशीनकडून काही खास सिग्नल मिळाले नाही. पण खोदकाम केल्यानंतर जवळपास 100 मिलीमीटर खोलवर मेटल डिटेक्टरवर सिग्नल मिळाले. त्याने माती दूर केली. तेव्हा चमकदार पिवळ्या रंगाचा बटाटा इतका तुकडा हाती लागला. तो सोन्याचा होता. त्याला टिबूबुरा स्पड असे नाव देण्यात आले. इंग्रजीत स्पड हा बटाट्यासाठी वापरला जातो.
1.2 किलो वजन, 940 ग्रॅम शुद्ध सोने
या सोन्याच्या तुकड्याचे एकूण वजन जवळपास 1.2 किलोग्रॅम होते. यामध्ये जवळपास 940 ग्रॅम शुद्ध सोने सापडले. जेव्हा हा तुकडा मिळाला, तेव्हा त्याची किंमत जवळपास 1.95 लाख ऑस्ट्रेलियन डॉलर इतकी नोंदवली गेली. पण बाजारात सोन्याचा भाव घसरला. यामुळे या सोन्याच्या तुकड्याची अंदाजित किंमत घसरून जवळपास 1.60 लाख ऑस्ट्रेलियन डॉलर इतकी झाली. भारतीय चलनात ही रक्कम एक कोटींच्या घरात पोहचते. या शेतकऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात आले आहे. अनेक दिवसांपासून तो या भागात सोन्याचा शोध घेत होता. अखेर त्याच्या हाती सोन्याचा तुकडा लागला.
