AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tipu Sultan: मालेगावावरून राज्यात पुन्हा राडा? टिपू सुलतानचा फोटो लावणार? उपमहापौरांच्या त्या निर्णयाने खळबळ

Shaan-E-Hind on Tipu Sultan: गेल्या आठवड्याच्या अखेरीस टिपू सुलतानची तसबीर आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या वक्तव्याने मोठा राडा झाला. मालेगाव महानगरपालिकेच्या उपमहापौर शान-ए-हिंद यांनी आता पुन्हा मोठा निर्णय घेतला आहे. पडद्याआड मोठी घडामोड घडत आहे, काय आहे अपडेट?

Tipu Sultan: मालेगावावरून राज्यात पुन्हा राडा? टिपू सुलतानचा फोटो लावणार? उपमहापौरांच्या त्या निर्णयाने खळबळ
टिपू सुलतानImage Credit source: गुगल
| Edited By: | Updated on: Feb 17, 2026 | 10:33 AM
Share

Shaan-E-Hind on Tipu Sultan: गेल्या आठवड्याच्या अखेरीस मालेगाव महानगरपालिकेच्या उपमहापौरांच्या दालनात टिपू सुलतानचा फोटो आणि त्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याने मोठा राडा झाला. काँग्रेस आणि भाजप राज्यात अनेक ठिकाणी आमने-सामने आली. मालेगावमधून या वादाची ठिणगी पडली. तिथंच आता मोठी घडामोड घडली आहे. उपमहापौर शान-ए-हिंद यांनी पुन्हा टिपू सुलतानचा फोटो दालनात बसवण्याचे जाहीर केले आहे. त्यावरून मालेगावसह राज्यात पुन्हा वाद पेटण्याची शक्यता आहे.

टिपू सुलतानचा फोटो पुन्हा लावणार

टिपू सुलतानचा फोटो पुन्हा दालनात लावणार असल्याचे मालेगावच्या उपमहापौर शान-ए-हिंद यांनी जाहीर केले. ज्या व्यक्तीचा फोटो आपल्या संविधानात आहे. ते काढण्यास कोणी सांगू शकत नाही. जे असं सांगतील ते संविधानाच्या विरोधात असतील. जे लोक बोलत असतील राजकारणाचा दृष्टिकोन निवडणूक ठेवून केलेलं काम असेल तर पुढील चार वर्षे कोणतीही निवडणूक नाही. चार वर्ष एकही मतदानाची आवश्यकता नाही. ही एक सोनेरी संधी होती. 2014 नंतर इतिहास बदलण्याचा प्रयत्न सुरू आहे. विशेष समुदायाच्या लोकांचा इतिहास संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे असे वक्तव्य उपमहापौरांनी केले.

टिपू सुलतानमुळे सामाजिक समता

मी जर टिपू सुलतान यांचा फोटो लावला नसता तर लोकांना कळलच नसते की त्यांचा फोटो ही संविधानामध्ये आहे. जे इतिहास जाणून आहेत ते सांगत आहेत त्यांनी समाजात समता आणण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्रातील नवीन पिढीला टिपू सुलतान यामुळे कळेल. राष्ट्रपिता महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांचे सर्वात प्रथम फोटो लागतील आणि टिपू सुलतान यांचे देखील फोटो लागणे आवश्यक आहे. एक बाब लक्षात आली की राज्यातील राजकारण हे हर्षवर्धन सपकाळ हे असे का बोलले यावर आले. भाजप तोच मुद्दा उठवत आहेत त्यांना माहिती होतं की फोटो लावण्याचा मुद्दा चुकीचा आहे हे भाजपला माहिती आहे. रामनाथ कोविंद यांनी देखील याविषयी सांगितले आहे. हे संविधानातील सर्वात उत्तम पद असलेल्या राष्ट्रपती यांनी देखील सांगितले आहे, असे उपमहापौर म्हणाल्या.

आता फोटोचा वाद उरला नाही

आता वाद हा फोटोचा नसून सपकाळ असे का बोलले यावर आहे.फोटोचा वाद राहिला नाही. भाजपाला ना इतिहास समजतो ना संविधान, अशी टीका शान-ए-हिंद यांनी केली. त्यांना इतिहास माहितीअसता तर टिपू सुलतान यांचा फोटो लावण्यासंदर्भात त्यांनी वक्तव्य केलेच नसतं. आता त्यांना हे लक्षात आल्यानंतर त्यांनी आपलं दुसर्‍या दिशेला नेलं आहे असा आरोप त्यांनी केला.

मी तो फोटो काढणारी कोण आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व सरदार वल्लभाई पटेल यांनी यांच्या साह्याने संविधानातील पान नंबर 144 मध्ये लिहिलं आहे तर मी कोण सांगणार आहे. माझ्यासह कोणाचीही कुवत नाही की मी तो फोटो हटू शकतो. भाजपवाले एका ओबीसी महिलेवर वारंवार टीका करत आहेत. माझे नाव शान ए हिंद आहे. म्हणजे हिंदुस्तान की शान असं आहे. भाजपवाल्यांनी मला उत्तर द्यावे की आपले किती देश प्रेम आहे की कुटुंबातील मुलांचे नाव भारत ठेवले आहे, असा सवाल त्यांनी विचारला.

Follow Us
जुन्नरच्या अत्याचार प्रकरणावरून राऊतांचा फडणवीस, शिंदेंवर हल्लाबोल,
जुन्नरच्या अत्याचार प्रकरणावरून राऊतांचा फडणवीस, शिंदेंवर हल्लाबोल, अमृता फडणवीसांनाही म्हणाले...
उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार? अमित ठाकरे...
Pocket Money Scheme : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार? अमित ठाकरे म्हणाले..
श्रीमद्भागवत वाचल्यास अपघाती मृत्यू टळतो; अजित पवारांचा उल्लेख करत...
श्रीमद्भागवत वाचल्यास अपघाती मृत्यू टळतो; अजित पवारांचा उल्लेख करत डॉ. सूरदास यांनी काय काय सांगितलं?
'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही' आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा
आदित्य ठाकरे यांचा शिंदे गटावर हल्लाबोल; 'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही'
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
मोदी-शाह संपले; काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान
काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान; 'मोदी-शाह संपले'
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप; मुंबईकडे कूच करण्याचा इशारा
कंगनाने वर्षा निवासस्थानी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
कंगना रणौतची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी भेट
साठ्ये महाविद्यालयाबाहेर मनविसे-एबीविपी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
मुंबईतील साठ्ये कॉलेजमध्ये नोंदणी मोहिमेवरून मनविसे आणि एबीविपीत वाद