AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PAK vs NAM Live Streaming : सुपर 8 साठी टफ फाईट, नामिबिया पाकिस्तानचा बाजार उठवणार?

Pakistan vs Namibia T20 World Cup 2026 Live Match Score : पाकिस्तानने टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत तिन्ही सामने जिंकलेत. मात्र त्यानंतरही पाकिस्तानचं सुपर 8 फेरीसाठीचं तिकीट वेटिंगवर आहे.

PAK vs NAM Live Streaming : सुपर 8 साठी टफ फाईट, नामिबिया पाकिस्तानचा बाजार उठवणार?
Pakistan Cricket TeamImage Credit source: PTI
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Feb 18, 2026 | 3:16 AM
Share

आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील 35 व्या सामन्यात पाकिस्तान विरुद्ध नामिबिया आमनेसामने असणार आहेत. पाकिस्तान आणि नामिबिया या दोन्ही संघांचा हा साखळी फेरीतील चौथा आणि शेवटचा सामना असणार आहे. दोन्ही टीम ए ग्रुपमधील आहेत. ए ग्रुपमधून सुपर 8 फेरीत गतविजेत्या टीम इंडियाने धडक दिली आहे. तर उर्वरित एका जागेसाठी यूएसए, पाकिस्तान आणि नेदरलँड्स या 3 संघांमध्ये चुरस आहे. त्यामुळे पाकिस्तान विरुद्ध नामिबिया हा सामना निर्णायक ठरणार आहे. नामिबियाचं साखळी फेरीतच आव्हान संपुष्टात आलं आहे. मात्र नामिबिया साखळी फेरीतील आपला शेवटचा सामना जिंकून पाकिस्तानचा बाजार उठवणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या निमित्ताने पाकिस्तान विरुद्ध नामिबिया सामन्याबाबत जाणून घेऊयात.

पाकिस्तान विरुद्ध नामिबिया सामना कधी?

पाकिस्तान विरुद्ध नामिबिया सामना बुधवारी 18 फेब्रुवारीला खेळवण्यात येणार आहे.

पाकिस्तान विरुद्ध नामिबिया सामना कुठे?

पाकिस्तान विरुद्ध नामिबिया सामना कोलंबोतील सिंहली स्पोर्ट्स क्लबमध्ये आयोजित करण्यात आला आहे.

पाकिस्तान विरुद्ध नामिबिया सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

पाकिस्तान विरुद्ध नामिबिया सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता सुरुवात होणार आहे. तर 2 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे.

पाकिस्तान विरुद्ध नामिबिया सामना टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?

पाकिस्तान विरुद्ध नामिबिया सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तर लाईव्ह मॅच जिओहॉटस्टार एपद्वारे मोबाईलवर पाहायला मिळेल.

एका जागेसाठी 3 संघांमध्ये चुरस

टीम इंडियाने 15 फेब्रुवारीला कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये पाकिस्तानला पराभूत करत सलग तिसरा सामना जिंकला. टीम इंडियाने या विजयी हॅट्रिकसह सुपर 8 मध्ये प्रवेश केला. इंडिया ए ग्रुपमधून सुपर 8 मध्ये पोहचणारी पहिली टीम ठरली.

त्यानंतर आता पाकिस्तान विरुद्ध नामिबिया या सामन्याचा निकाल सुपर 8 च्या हिशोबाने निर्णायक ठरणार आहे. पाकिस्तनाने नामिबियावर विजय मिळवल्यास ते सुपर 8 मध्ये पोहचतील. मात्र नामिबियाने उलटफेर करत विजय मिळवला तर पाकिस्तानचं पॅकअप होईल. तर नेदरलँड्सने भारताला पराभूत केलं तर त्यांच्या खात्यात 4 गुण होतील. तसेच यूएसएच्या खात्यातही 4 गुण आहेत. त्यामुळे अशा स्थितीत नेदरलँड्स आणि यूएसएपैकी सुपर 8 मध्ये कोण पोहचणार? हे नेट रनरेटच्या आधारे निश्चित केलं जाईल.

Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...