AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 WC 2026: पाकिस्तान नामिबिया सामना पावसामुळे रद्द झाला तर…! सुपर 8 फेरीत कोणाला संधी? जाणून घ्या

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धा आता रंगतदार वळणावर आली आहे. या स्पर्धेतील सर्वात मोठा उलटफेर म्हणजे ऑस्ट्रेलिया संघ स्पर्धेतून आऊट झाला आहे. तर झिम्बाब्वेने पहिल्यांदाच सुपर 8 फेरी गाठली आहे. असं असताना पाकिस्तान की अमेरिका हे गणित थोडं किचकट झालं आहे. चला जाणून घेऊयात.

T20 WC 2026: पाकिस्तान नामिबिया सामना पावसामुळे रद्द झाला तर...! सुपर 8 फेरीत कोणाला संधी? जाणून घ्या
पाकिस्तान नामिबिया सामना पावसामुळे रद्द झाला तर...! सुपर 8 फेरीत कोणाला संधी? जाणून घ्या Image Credit source: Icc X account
| Updated on: Feb 17, 2026 | 6:11 PM
Share

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या सुपर 8 फेरीतील सात संघ ठरले आहेत. भारत, श्रीलंका, झिम्बाब्वे, न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, दक्षिण अफ्रिका, इंग्लंड या सात संघांनी सुपर 8 फेरीत जागा पक्की केली आहे. आता अ गटातून एका संघाची निवड होणं बाकी आहे. पाकिस्तान की अमेरिका या दोन पैकी एका संघाला संधी मिळेल. या दोन संघात जर तरची लढाई आहे. पाकिस्तान नामिबिया सामन्यावर सर्वकाही अवलंबून असणार आहे. या सामन्याचा निकाला सुपर 8 फेरीतील शेवटचा संघ ठरवणार आहे. त्यामुळे या सामन्याकडे क्रीडाप्रेमींच्या नजरा लागून आहेत. या सामन्याचा निकाल काय लागेल वगैरे याची चिंता क्रीडाप्रेमींना लागून आहे. दुसरीकडे, श्रीलंकेतील लहरी वातावरणाचा फटका ऑस्ट्रेलियाला बसल्याचं दिसलं. झिम्बाव्बे आयर्लंड सामन्यात पावसाने हजेरी लावली आणि सामना रद्द झाला. श्रीलंकेच्या पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये पावसाने हजेरी लावल्याने आयर्लंड झिम्बाब्वे सामना झाला नाही. त्यामुळे झिम्बाब्बेला 1 गुण मिळाला आणि ऑस्ट्रेलियाचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं. असाच पाऊस जर पाकिस्तान नामिबिया सामन्यात झाला तर… सर्व गणित समजून घेऊयात.

पाकिस्तानचे सर्व सामने हे श्रीलंकेत होत आहेत. पाकिस्तानचा साखळी फेरीतील शेवटचा सामना कोलंबोतील सिंहालीज स्पोर्ट्स क्लबवर होत आहे. या सामन्यात पावसाने हजेरी लावली आणि सामना रद्द करण्याची वेळ आली तर पाकिस्तानला फायदा होईल. कारण 5 गुणांसह पाकिस्तानचा संघ सुपर 8 फेरीत जागा मिळवेल. त्यामुळे या सामन्यात पाऊस पडू नये अशी प्रार्थना अमेरिकन संघ करत असावा. मागच्या पर्वात म्हणजेच टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेत अमेरिकेने सुपर 8 फेरीत जागा मिळवली होती. तर पाकिस्तानचं आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आलं होतं. हाच कित्ता गिरवला जाणार की नाही हे उद्याच्या सामन्यावर अवलंबून आहे.

पाकिस्तान नामिबिया सामन्याचा निकाल महत्त्वाचा आहे. या सामन्यात पाकिस्तानने विजय मिळवला तर थेट सुपर 8 फेरीचं तिकीट मिळेल. पण या सामन्यात पराभूत झाले तर अमेरिकेला संधी मिळेल. त्यामुळे या सामन्यात नामिबिया जिंकावी असंच अमेरिकन संघाला वाटत असावं. कारण दोन्ही संघांचे समान गुण असले तरी अमेरिकन संघ नेट रनरेटच्या बाबतीत पुढे आहे. दरम्यान, या स्पर्धेत क्रीडाप्रेमींना आधीच एक उलटफेर पाहायला मिळाला आहे. नामिबिया चमत्कार करणार का? याकडे लक्ष लागून आहे. नामिबियाची या स्पर्धेतील कामगिरी काही खास राहिली नाही. तीन पैकी तीन सामने गमावले. आता चौथा सामना जिंकून शेवट गोड करण्याचा प्रयत्न असेल. जर तसं झालं तर पाकिस्तानला गाशा गुंडाळावा लागेल.

Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...