AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs NED : नेदरलँड्स विरूद्धच्या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमधून कुणाला डच्चू? पाहा संभाव्य प्लेइंग ईलेव्हन

India Probable Playing 11 Against Netherlands : टीम इंडिया नेदरलँड्स विरुद्ध साखळी फेरीतील शेवटचा सामना हा अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळणार आहे.

IND vs NED : नेदरलँड्स विरूद्धच्या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमधून कुणाला डच्चू? पाहा संभाव्य प्लेइंग ईलेव्हन
Suryakumar Yadav Team India Huddle TalkImage Credit source: suryakumar yadav x account
| Updated on: Feb 18, 2026 | 3:47 AM
Share

टीम इंडिया आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत साखळी फेरीतील आपला चौथा आणि शेवटचा सामना खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. टीम इंडिया बुधवारी 18 फेब्रुवारीला नेदरलँड्स विरुद्ध भिडणार आहे. टीम इंडियाने याआधी सलग 3 सामने जिंकून सुपर 8 मध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे टीम इंडियासाठी नेदरलँड्स विरुद्धचा सामना हा औपचारिकता आहे. त्यामुळे टीम इंडियाच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी न मिळालेल्या खेळाडूंचा समावेश केला जाऊ शकतो. अशात टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग ईलेव्हन कशी असू शकते? हे जाणून घेऊयात.

2 बदल होणार?

टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत इतर खेळाडूंच्या तुलनेत वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंग या दोघांना संधी देण्यात येऊ शकते. तर या दोघांसाठी फिरकीपटू कुलदीप यादव आणि ऑलराउंडर हार्दिक पंड्या या दोघांना विश्रांती देण्यात येऊ शकते. मात्र हा अंदाज आहे. याबाबत कोणतीही अधिकृत माहिती नाही.

अभिषेक शर्माला डच्चू की पुन्हा संधी?

टीम इंडियाचा युवा आणि विस्फोटक फलंदाज अभिषेक शर्मा याने टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेसारख्या मोठ्या मंचावर घोर निराशा केली. अभिषेक यूएसए विरूद्धच्या सामन्यात पहिल्याच बॉलवर आऊट झाला. अभिषेकचा टी 20i वर्ल्ड कपमधील हा पहिलाच समना होता. अभिषेक गोल्डन डक ठरल्याने त्याच्या चाहत्यांची निराशा झाली .

अभिषेकऐवजी संजू सॅमसन याचा विचार होणार?

अभिषेकला या सामन्यानंतर पोटाचा आजार झाला. त्यामुळे अभिषेकला नामिबिया विरूद्धच्या सामन्याला मुकावं लागलं. त्यामुळे संजू सॅमसन याचा समावेश करण्यात आला. संजूने या सामन्यात भारताला वेगवान सुरुवात करुन देत सन्मानजनक धावा केल्या. संजूला आणखी मोठी खेळी करत अर्धशतक झळकावता आलं असतं. मात्र संजू फटेकबाजीच्या नादात आऊट झाला. त्यामुळे आता सलग 2 सामन्यांत झिरोवर आऊट झाल्यानंतरही टीम मॅनेजमेंट अभिषेकला संधी देणार की संजूकडे जाणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन : सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा/संजू सॅमसन, इशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, शिवम दुबे, रिंकू सिंग, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज/कुलदीप यादव, अर्शदीप सिंह/हार्दिक पंड्या, वरुण चक्रवर्ती आणि जसप्रीत बुमराह.

Follow Us
तटकरेंवर खरातचा दाबाव होता की... राष्ट्रवादीतील नेत्याचा मोठा दावा...
तटकरेंवर खरातचा दाबाव होता की... राष्ट्रवादीतील नेत्याचा मोठा दावा....
तटकरे-शरद पवार भेटीवरून बिनसलं, रोहित पवार आजोबांवर नाराज? बैठकीतच...
तटकरे-शरद पवार भेटीवरून बिनसलं, रोहित पवार आजोबांवर नाराज? बैठकीतच....
वांद्रे पूर्वेत रेल्वेची धडक कारवाई सुरूच; दुसऱ्या दिवशीही झोपड्यांवर
वांद्रे पूर्वेत रेल्वेची धडक कारवाई सुरूच; दुसऱ्या दिवशीही झोपड्यांवर.
मोठी बातमी! पुण्यात पुन्हा टोळी युद्ध भडकले; वनराज आंदेकर हत्या....
मोठी बातमी! पुण्यात पुन्हा टोळी युद्ध भडकले; वनराज आंदेकर हत्या.....
राजकारणात मोठी खळबळ! ठाकरेंचे तीन खासदार शिंदेंच्या नेत्यांच्या...
राजकारणात मोठी खळबळ! ठाकरेंचे तीन खासदार शिंदेंच्या नेत्यांच्या....
परभणीत भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
परभणीत भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू.
नाशिक विधान परिषद जागेवर महायुतीतच चुरस; भाजप-शिंदे सेना आमनेसामने
नाशिक विधान परिषद जागेवर महायुतीतच चुरस; भाजप-शिंदे सेना आमनेसामने.
वाल्मिक कराडची प्रकृती खालावली; अंबाजोगाईला हलवण्याच्या हालचाली सुरु..
वाल्मिक कराडची प्रकृती खालावली; अंबाजोगाईला हलवण्याच्या हालचाली सुरु...
देशभरातील औषध दुकानदारांचा आज बंद; ऑनलाईन औषध विक्रीविरोधात केमिस्ट...
देशभरातील औषध दुकानदारांचा आज बंद; ऑनलाईन औषध विक्रीविरोधात केमिस्ट....
प्रशांत किशोर राष्ट्रवादीसोबत काम करणार की नाहीत? पार्थ पवारांनी...
प्रशांत किशोर राष्ट्रवादीसोबत काम करणार की नाहीत? पार्थ पवारांनी....