AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इराण अमेरिका युद्धाचा सर्वात मोठा फटका भारतीय लोकांना, थेट एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत मोठी वाढ, तब्बल…

इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष टोकाला पोहोचला आहे. युद्धाला आठ दिवस पूर्ण झाली. मात्र, अमेरिकेकडून स्पष्ट सांगण्यात आले की, हे युद्ध पुढील काही आठवडे सुरू राहणार आहे. यामध्येच आता भारतीय लोकांना अत्यंत मोठा धक्का बसल्याचे बघायला मिळत आहे.

इराण अमेरिका युद्धाचा सर्वात मोठा फटका भारतीय लोकांना, थेट एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत मोठी वाढ, तब्बल...
LPG cylinder price
| Updated on: Mar 07, 2026 | 7:32 AM
Share

इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध पेटले आहे. गेल्या आठ दिवसांपासून युद्ध सुरू असून इस्त्रायल आणि अमेरिका मिळून इराणवर हल्ला करत आहे. इराणनेही अमेरिकेचे लष्कर तळ असलेल्या 13 ठिकाणांवर हल्ला केला. यासोबतच साैदी अरेबिया, दुबई, कतार, कुवेत, इराक यांच्यासह अनेक देशातील तेल प्रकल्पांवर हल्ला केला. महत्वाचा समुद्री मार्गही इराणने बंद केला. ज्यामुळे अर्ध्यापेक्षा अधिक देशांवर तेलाची आणि गॅसची आणीबाणी लागू झाली. गेल्या काही दिवसांपासून देशात आयात होणारा एलपीजी गॅस पुरवठा खंडित झाला. इराणकडून बंद करण्यात आलेल्या समुद्री मार्गाहूनच भारताला एलपीजीचा पुरवठा होतो. मात्र, तो मार्ग बंद असल्याने मोठा जाम लागला. हेच नाही तर यादरम्यान  इराणकडून करण्यात आलेल्या हल्ल्यात गॅसच्या प्रकल्पांवरही हल्ला करण्यात आला. ज्यामुळे अनेक देशांनी काही दिवसांकरिता प्रकल्प बंद करण्याचा निर्णय घेतला.

देशात पुढील काही दिवस एलपीजी गॅसचा तुटवडा होणार याचे मोठे संकेत असताना आता मोठा धक्कादायक निर्णय घेण्यात आला. मध्य पूर्वेतील युद्धाच्या काळात महागाईने चांगलेच थैमान घातल्याचे बघायला मिळत आहे. त्यामध्येच आता सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला मोठी झळ लागणार आहे. थेट घरगुती स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या किंमती 60 रूपयांनी वाढल्या आहेत. व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीत 115 रूपयांनी वाढ झाली आहे.

नवीन दर आजपासून लागू झाले आहेत, इंडियन ऑइल वेबसाइटवर देखील नवीन दर लागू करण्यात आले आहेत. इराण, इस्त्रायल आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष आखाती देशांमध्ये युद्धाचे ढग गडद झाले असून त्याचे पडसाद भारतीय बाजारपेठेतही उमटत आहेत. संभाव्य गॅस टंचाई लक्षात घेता केंद्र सरकारने औद्योगिक आणि व्यावसायिक वापराच्या गॅस सिलिंडरचा पुरवठा तात्पुरता थांबविण्याचा निर्णय घेतला आहे.

यामुळे अनेक गॅस प्लांटमधून नव्या ऑर्डर स्वीकारणे बंद केले असून, दोन दिवसांत व्यावसायिक गॅस पुरवठा पूर्णपणे ठप्प होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धाचा परिणाम भारतात दिसणार नाही, असे सांगितले जात होते. मात्र, आता या युद्धाचा थेट परिणाम भारतीय लोकांवरही होताना दिसत आहे.

Follow Us
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
Manoj Jarange | आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना... तायवाडेंचा जरांगेंना संदेश
Babanrao Taywade | गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना त्रास होऊ नये! बबनराव तायवाडेंचा जरांगेंना थेट संदेश; ओबीसी आरक्षणावरही मोठं वक्तव्य
मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
Manoj Jarange Hunger Strike | मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
गणेशोत्सवासाठी कोकण जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन रवाना
पोलिसांनी अडवलंच तर... मुंबईत होणाऱ्या निर्णायक मराठा आंदोलनाबाबत...
पोलिसांनी अडवलंच तर...  मुंबईत होणाऱ्या मराठा आंदोलनाबाबत मनोज जरांगेंचा मोठा इशारा
गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी! कोकणवासीयांचा...
Ganeshotsav 2026 | गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी! माणगावात 7-8 किमी वाहनांच्या रांगा; कोकणवासीयांचा प्रवास रखडला