AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WPL 2027 चा लिलाव संपला! 15 वर्षांच्या खेळाडूची एन्ट्री; कुणावर सर्वात मोठी बोली, कुणाला मिळाली पहिली संधी? पाचही संघांचं चित्र स्पष्ट!

WPL 2027 Team Squads: महिला प्रीमियर लीग २०२७ चा लिलाव संपन्न झाला आहे. सोफी मोलिनक्स ही सर्वाधिक किमतीची खेळाडू ठरली आहे.

WPL 2027 चा लिलाव संपला! 15 वर्षांच्या खेळाडूची एन्ट्री; कुणावर सर्वात मोठी बोली, कुणाला मिळाली पहिली संधी? पाचही संघांचं चित्र स्पष्ट!
| Updated on: Oct 28, 2026 | 9:31 PM
Share

महिला प्रीमियर लीग 2027 साठीचा मिनी लिलाव संपन्न झाला आहे. ऑस्ट्रेलियाची विश्वचषक विजेती कर्णधार सोफी मोलिन्यूक्सला उत्तर प्रदेश वॉरियर्स संघाने 1.1 कोटी रुपयांना विकत घेतले. तिची मूळ किंमत 50 लाख रुपये होती. ती लिलावातील सर्वात महागडी खेळाडू ठरली. आरसीबीनेही तिच्यासाठी मोठी बोली लावली होती. मात्र अखेरीस उत्तर प्रदेशने तिला करारबद्ध केले. हा लिलाव उत्तर प्रदेशसाठी सर्वोत्तम ठरला आहे. कारण त्यांनी स्नेह राणा आणि ग्रेस हॅरिस यांसारख्या खेळाडूंना त्यांच्या मूळ किमतीत संघात सामील करून घेतले. लिलावानंतर सर्व संघांची स्थिती आता स्पष्ट झाली आहे.

आरसीबी महिला संघाने 1.15 कोटी रुपयांच्या पर्ससह लिलावात प्रवेश केला होता. परंतु एक्सलेरेटेड फेरीपर्यंत एकाही खेळाडूची खरेदी केली नाही. त्यानंतर संघाने सोफी मोलिन्यूक्ससाठी बोली लावली होती. परंतु उत्तर प्रदेश संघाने तिला आपल्या संघात सामील करून घेतले. नंतर आरसीबीने तेजल हसबनीस आणि जेस जॉन्सनसारख्या खेळाडूंना संघात सामील करून घेतले.

संघाची स्थिती- फलंदाज : स्मृती मानधना, जॉर्जिया वॉल, तेजल हसबनीस यष्टिरक्षक: ऋचा घोष, प्रत्युषा कुमार, वृंदा दिनेश अष्टपैलू: श्रेयंका पाटील, सायली सातघरे, प्रेमा रावत, नदिन डी क्लर्क, एलिस पेरी, जेस जॉन्सन, क्लो ट्रॉयन गोलंदाज: राधा यादव, पूजा वस्त्राकर, लॉरेन बेल, अरुंधती रेड्डी

उत्तर प्रदेश संघाने या लिलावात सर्वात मोठ्या रकमेसह प्रवेश केला. अगदी सुरुवातीपासूनच काही प्रभावी खेळाडूंची खरेदी केली. लिलावातील सर्वोच्च बोली 1.1 कोटी रुपये होती आणि या संघाने सोफी मोलिन्यूक्सला संघात सामील करून घेतले. त्यानंतर त्यांनी ग्रेस हॅरिस आणि स्नेह राणा यांना 30 लाख रुपयांच्या मूळ किमतीत घेऊन संघ अधिक मजबूत केला. अखेरीस त्यांनी अनेक युवा खेळाडूंना संघात घेतले.

संघाची स्थिती- फलंदाज: प्रतिका रावल, फोबी लिचफिल्ड, मेग लॅनिंग, हरलीन देओल, सिमरन शेख. यष्टिरक्षक : सुषमा वर्मा, क्षिप्रा गिरी. अष्टपैलू: ग्रेस हॅरिस, स्नेह राणा, सोफी मोलिनक्स, दीप्ती शर्मा, कॅथरीन ब्राइस, सहाना पवार, मनाली दक्षिणी. गोलंदाज: शिखा पांडे, क्रांती गौड, सोफी एक्लेस्टन, आशा शोबाना.

गुजरातने या मिनी लिलावात कोणतीही मोठी खरेदी केली नाही. पण त्यांनी जी. कमलिनीला 40 लाख रुपयांच्या मूळ किमतीत संघात सामील करून घेतले. ती एक उत्कृष्ट राखीव यष्टीरक्षक-फलंदाज ठरू शकते. संघाने आयर्लंडच्या ओर्लालाही आपल्या संघात सामील करून संघ आणखी मजबूत केला आहे.

संघाची स्थिती- फलंदाज: जी. कमलिनी, भारती फुलमाली. यष्टीरक्षक: यास्तिका भाटिया, बेथ मूनी. अष्टपैलू: ओर्ला प्रेंडरगास्ट, सोफी डिव्हाईन, किम गार्थ, कनिका आहुजा, जॉर्जिया वेअरहॅम, ॲशले गार्डनर, अनुष्का शर्मा, समायरा राधव, ओर्ला प्रेंडरगास्ट. गोलंदाज: तनुजा कंवर, रेणुका सिंग ठाकूर, राजेश्वरी गायकवाड, काश्वी गौतम, जिंतमणी कलिता, हॅपी कुमारी.

दिल्ली कॅपिटल्सची पहिली बोली किरण नवगिरेवर होती. किरणवर 75 लाख खर्च करणे हा एक आश्चर्यकारक निर्णय होता. त्याच लिलावात स्नेह राणासारख्या खेळाडूला 30 लाखांना विकण्यात आले. दिल्लीचा संघ बराच संतुलित दिसतो. संघात आधीच अनेक उत्कृष्ट खेळाडू आहेत. या लिलावात काश्वी कंदिकुप्पा आणि नजमा खानसारख्या खेळाडूंचा संघात समावेश करण्यात आला.

संघाची स्थिती- फलंदाज: किरण नवगिरे, निकी प्रसाद, लॉरा वोल्फार्ट, जेमिमाह रॉड्रिग्स, दिया यादव. यष्टिरक्षक: ममता माडीवाला. अष्टपैलू: शेफाली वर्मा, मारिझान कॅप, लुसी हॅमिल्टन, सॅनेली हेन्री, ॲनाबेल सदरलँड, काश्वी कंदीकुप्पा, नजमा खान. गोलंदाज: नंदनी शर्मा, श्री चरणी, मिन्नू मणी, कर्स्टी गॉर्डन.

मुंबईच्या संघात आधीच 8-9 खेळाडू निश्चित आहेत. या लिलावात त्यांच्याकडे सर्वात कमी रक्कम होती. त्यामुळे काही निवडक जागा भरण्यासाठी खेळाडूंची आवश्यकता होती. परिणामी संघाने प्रथम तीन तरुण भारतीय खेळाडूंना प्रत्येकी 10 लाख रुपयांच्या मूळ किमतीत घेतले. किशा कासट, लतिका इनामदार आणि भारती रावल यांना संघात घेतल्यानंतर संघाने आपली स्थिती लक्षणीयरीत्या मजबूत केली.

संघाची स्थिती- फलंदाज: दिशा कासट, सानिका चाळके, श्वेता सेहरावत. यष्टीरक्षक: लतिका इनामदार, राहिला फिरदौस अष्टपैलू: संजीवन संजना, निकोला कॅरी, नॅट सायव्हर ब्रंट, हेली मॅथ्यूज, हरमनप्रीत कौर, अमेलिया केर, अमनजोत कौर आणि अक्षिता भगत. गोलंदाज: भारती रावल, तारा नॉरिस, वैष्णवी शर्मा, शबनिम इस्माईल आणि संस्कृती गुप्ता.

Follow Us
राज ठाकरेंचा महाराष्ट्राला गंभीर इशारा: 50 खोके एकदम ok घोषणेवर सडकून
राज ठाकरेंचा महाराष्ट्राला गंभीर इशारा: 50 खोके एकदम ok घोषणेवर सडकून टीका
तुम्ही Gen Z कधी उठणार? वृक्षतोडीवर राज ठाकरेंचं तरुणांना आवाहन
Raj Thackeray : तुम्ही Gen Z कधी उठणार? वृक्षतोडीवर राज ठाकरेंचं तरुणांना मोठं आवाहन
राज्यातील शिक्षक, पदवीधरच्या निकालावरून काँग्रेसला डिवचलं; PM मोदी...
राज्यातील शिक्षक, पदवीधरच्या निकालावरून काँग्रेसला डिवचलं; PM मोदींची पोस्ट चर्चेत!
भाजपच्या बंडखोरांना धक्का देत किरण सरनाईक यांचा विजय; कुटुंबीयांनी...
भाजपच्या बंडखोरांना धक्का देत किरण सरनाईक यांचा विजय; कुटुंबीयांनी व्यक्त केला आनंद, म्हणाले…
शिवसेना पक्षचिन्ह-आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी संपली; कोर्टात नेमकं
शिवसेना पक्षचिन्ह-आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी संपली; कोर्टात नेमकं काय घडलं?
विधान परिषद निकाल; कोण विजयी? कोण पराभूत? A to Z माहिती
Maharashtra MLC Election Result 2026 : विधान परिषद निकाल; कोण विजयी? कोण पराभूत? A to Z माहिती
शिवसेना कुणाची? शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद, व्हीप आणि पक्षांतर्गत...
शिवसेना कुणाची? शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद, व्हीप आणि पक्षांतर्गत निवडणुकांवर उपस्थित केले सवाल
सह्याद्रीतील वृक्षतोडीवरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मोदींचा...
सह्याद्रीतील वृक्षतोडीवरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मोदींचा कार्यक्रम रद्द करण्याची मागणी!
संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश,
संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश, 17 नोव्हेंबरला प्रत्यक्ष हजर राहावे लागणार!
आज माझ्या भावाला जाऊन 9 महिने झाले अन् त्यासोबतच...
आज माझ्या भावाला जाऊन 9 महिने झाले अन् त्यासोबतच... सुप्रिया सुळेंचं भावनिक विधान