Abhijeet Dipke : अखेर अभिजीत दीपकेंची मोठी घोषणा, 1 नोव्हेंबरला CJP…एकमताने निर्णय घेऊन टाकला!
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी दोन दिवसांपूर्वी एक व्हिडीओ जारी केला होता. या व्हिडीओत त्यांनी 1 नोव्हेंबर रोजी दिल्लीच्या रामलीला मैदानात महारॅलीचे आयोजन केले जाईल, असे जाहीर केले होते.

CJP Supports Congress Protest : निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे. येत्या 1 नोव्हेंबर रोजी काँग्रेसकडून दिल्लीत आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनात जास्तीत जास्त संख्येने सामील व्हावे असे आवाहन काँग्रेसतर्फे करण्यात आले होते. आता काँग्रेसच्या याच आंदोलनाला नवे बळ मिळाले आहे. कॉकरोच जनता पार्टी अर्थात सीजेपीने या आंदोलनाला आपला पाठिंबा दिलाय. दीपके यांनी तशी पोस्ट केली आहे.
सीजेपीचा काँग्रेसला पाठिंबा
काँग्रेसने येत्या 1 नोव्हेंबर रोजी महारॅलीचे आयोजन केले आहे. या महारॅलीत इंडिया आघाडीचे इतरही पक्ष सामील होणार आहेत. सीजेपीनेही ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी नव्याने लढा उभारलेला आहे. त्यामुळे या महारॅलीत सीजेपी सामील होणार का? असे विचारले जात होते. आता याबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सीजेपीने या महारॅलीला पाठिंबा दिलाय.
GYANU MUST GO!
The Cockroach Janta Party extends its support to the INDIA Bloc’s November 1 rally.
Nation above all!
#JaiBhim #JaiHind https://t.co/jbSsRQeHEw
— Abhijeet Dipke (@abhijeet_dipke) October 28, 2026
सीजेपीने खुले पत्र जारी केले आहे. यात इंडिया आघाडीच्या महारॅरीला आमचा पाठिंबा असेल, असे CJP चे संस्थापक अभिजीत दिपके यांनी सांगितले आहे. म्हणजेच सीजेपीने विरोधकांच्या महारॅरीला जाहीर पाठिंबा दिला आहे. ‘ज्ञानेश कुमार यांना जावेच लागणार’ अस म्हणत अभिजीत दिपके यांनी पाठिंब्याची पोस्ट केली आहे.
मल्लिकार्जुन खरगे यांनी केली होती महारॅलीची घोषणा
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी दोन दिवसांपूर्वी एक व्हिडीओ जारी केला होता. या व्हिडीओत त्यांनी 1 नोव्हेंबर रोजी दिल्लीच्या रामलीला मैदानात महारॅलीचे आयोजन केले जाईल, असे जाहीर केले होते. तसेच या महारॅरीला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहनही त्यांनी केले होते. संविधान वाचवण्यासाठी, लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी या आंदोलनात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असेही ते म्हणाले होते. दरम्यान, सीजेपीने या आंदोलनाला पाठिंबा दिल्याने रामलीला मैदानात किती संख्येने लोक येणार, या आंदोलनाला यश येणार का? सरकार यावर काय भूमिका घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
