AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hair Fall: केस गळतीमुळे हैराण? महागड्या तेलांवर पैसे खर्च करण्याआधी ट्राय करा हे घरगुती हेअर ऑइल

Homemade Hair Oil: सततच्या केस गळतीमुळे अनेक जण त्रस्त असतात. हे कमी करण्यासाठी प्रत्येक वेळी बाजारात मिळणारे महागडे अँटी हेअर फॉल ऑईल घेण्याची गरज नाही. तुम्ही घरीच हे तेल बनवू शकता.

Hair Fall: केस गळतीमुळे हैराण? महागड्या तेलांवर पैसे खर्च करण्याआधी ट्राय करा हे घरगुती हेअर ऑइल
| Edited By: | Updated on: Oct 28, 2026 | 8:33 PM
Share

मुली असो वा मुले सगळेच केस गळतीने त्रस्त असतात. पण यापासून सुटका मिळवण्यासाठी जर तुम्ही दरवेळी बाजारातून महागडे प्रॉडक्ट्स विकत घेत असाल तर यावेळी हे अँटी हेअर फॉल ऑइल घरीच बनवून पाहा. हे तेल लावल्याने हेअर ग्रोथ तर वाढेलच पण तुमचे केस सुद्धा मजबूत होतील. यामुळे केस गळती थांबेल. इतकंच नाही तर केस रेशमी आणि चमकदार देखील दिसतील. या तेलाचे इतके फायदे असतील तर एकदा घरी नक्की बनवा. चला तर मग घरी अँटी हेअर फॉल तेल कसे बनवावे ते जाणून घ्या.

अँटी हेअर फॉल ऑईल बनवण्याची पद्धत

– सर्वप्रथम एक ते दोन कप खोबरेल तेल घ्या. – हे तेल एका भांड्यात शिजवण्यासाठी गॅसवर ठेवा. – त्यात दोन चमचे कलौंजीच्या बिया घाला. – आता त्यात मूठभर कढीपत्ता घाला. – या तीनही गोष्टी नीट शिजवून घ्या. – जेव्हा हे शिजायला लागेल तेव्हा त्यात सुमारे आठ ते दहा जास्वंदाचे फुले घाला. – जेव्हा हे तेल शिजते आणि कमी होऊ लागते तेव्हा गॅस बंद करा आणि त्यात एलोवेरा जेल मिक्स करा. – यात ताज्या कोरफडचा गर किंवा ताजे एलोवेरा जेल मिक्स करा. – नीट ढवळून थोडा वेळ तसेच बाजूला ठेवा. जेणेकरून कोरफडीचे सर्व घटक या तेलात येतील. – तेल थंड करून गाळीच्या माध्यमातून गाळून घ्या. आणि हे स्प्रे बॉटलमध्ये भरून घ्या.

अँटी हेअर फॉल ऑइल कसे लावावे

घरी तयार केलेले हे अँटी हेअर फॉल ऑइल केसांना लावण्यासाठी आधी हे तेल मुळांमध्ये स्प्रे करा. साधारण दोन तास केसावर तसेच ठेवावे. त्यानंतर एखाद्या माइल्ड शॅम्पूने केस धुवून घ्या. आठवड्यातून कमीत कमी दोन ते तीन वेळा हे हेअर ऑईल लावा. काही महिन्यांतच केसांच्या वाढीवर आणि केस गळतीवर त्याचा परिणाम दिसेल.

Follow Us
राज ठाकरेंचा महाराष्ट्राला गंभीर इशारा: 50 खोके एकदम ok घोषणेवर सडकून
राज ठाकरेंचा महाराष्ट्राला गंभीर इशारा: 50 खोके एकदम ok घोषणेवर सडकून टीका
तुम्ही Gen Z कधी उठणार? वृक्षतोडीवर राज ठाकरेंचं तरुणांना आवाहन
Raj Thackeray : तुम्ही Gen Z कधी उठणार? वृक्षतोडीवर राज ठाकरेंचं तरुणांना मोठं आवाहन
राज्यातील शिक्षक, पदवीधरच्या निकालावरून काँग्रेसला डिवचलं; PM मोदी...
राज्यातील शिक्षक, पदवीधरच्या निकालावरून काँग्रेसला डिवचलं; PM मोदींची पोस्ट चर्चेत!
भाजपच्या बंडखोरांना धक्का देत किरण सरनाईक यांचा विजय; कुटुंबीयांनी...
भाजपच्या बंडखोरांना धक्का देत किरण सरनाईक यांचा विजय; कुटुंबीयांनी व्यक्त केला आनंद, म्हणाले…
शिवसेना पक्षचिन्ह-आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी संपली; कोर्टात नेमकं
शिवसेना पक्षचिन्ह-आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी संपली; कोर्टात नेमकं काय घडलं?
विधान परिषद निकाल; कोण विजयी? कोण पराभूत? A to Z माहिती
Maharashtra MLC Election Result 2026 : विधान परिषद निकाल; कोण विजयी? कोण पराभूत? A to Z माहिती
शिवसेना कुणाची? शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद, व्हीप आणि पक्षांतर्गत...
शिवसेना कुणाची? शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद, व्हीप आणि पक्षांतर्गत निवडणुकांवर उपस्थित केले सवाल
सह्याद्रीतील वृक्षतोडीवरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मोदींचा...
सह्याद्रीतील वृक्षतोडीवरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मोदींचा कार्यक्रम रद्द करण्याची मागणी!
संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश,
संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश, 17 नोव्हेंबरला प्रत्यक्ष हजर राहावे लागणार!
आज माझ्या भावाला जाऊन 9 महिने झाले अन् त्यासोबतच...
आज माझ्या भावाला जाऊन 9 महिने झाले अन् त्यासोबतच... सुप्रिया सुळेंचं भावनिक विधान