AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Adinath Kothare Movie Flop : ललित प्रभाकरच्या ‘प्रहार’ प्रमाणे, आदिनाथ कोठारेचा ‘नयी नवेली’ देखील बॉक्स ऑफिसवर प्लॉप होण्याच्या मार्गावर

ललित प्रभाकरचा सिनेमा 'प्रहार' हा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला. आता त्यापाठोपाठ आदिनाथ कोठारेचा 'नयी नवेली' हा सिनेमा देखील प्लॉप होण्याच्या मार्गावर आहे. सिनेमाची कमाई गेल्या काही दिवसांत प्रचंड ढासळली आहे.

Adinath Kothare Movie Flop : ललित प्रभाकरच्या 'प्रहार' प्रमाणे, आदिनाथ कोठारेचा 'नयी नवेली' देखील बॉक्स ऑफिसवर प्लॉप होण्याच्या मार्गावर
lalit prabhakar and adinath kothare flop movieImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 28, 2026 | 8:22 PM
Share

आदिनाथ कोठारेने नयी नवेली या सिनेमामुळे हिंदी सिनेसृष्टीत आपले पाऊल ठेवले. मराठी कथेच्या सिनेमांमध्ये तर तो उत्कृष्ट नायक आहेच पण हिंदीत एक वेगळ्या दुनियेत आपली छाप कशी पाडतो? याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली,पण प्रेक्षकांनी म्हणावा तसा या सिनेमाला प्रतिसाद दिलेला नाही. त्याामुळे हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर प्लॉप होण्याच्या मार्गावर आहे.

यामी गौतमीच्या चित्रपटांकडून प्रेक्षकांना नेहमीच वेगळं काहीतरी पाहायला मिळेल अशी अपेक्षा असते. यावेळी यामी गौतम आणि आदिनाथ कोठारे ‘नयी नवेली’ या हॉरर- कॉमे़डी चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आले. चित्रपटाची कथा, कलाकार आणि वेगळा विषय असल्याने सिनेमाची सर्वत्र चर्चा सुरू झाली. पण आता बॉक्स ऑफिसवर वेगळंच चित्र पाहायला मिळत आहे. पहिल्या आठवड्यानंतर चित्रपटाच्या कमाईत मोठी घसरण झाली असून, दुसऱ्या वीकेंडमध्येही त्याला फारशी कमाई करता आली नाही.

पिंकव्हिलाच्या बॉक्स ऑफिस अंदाजानुसार, ‘नयी नवेली’ ने दुसऱ्या वीकेंडमध्ये साधारण 2 ते 2.25 कोटी रूपयांची कमाई केली. पहिल्या वीकेंडच्या तुलनेत ही कमाई सुमारे 65% टक्क्यांनी कमी आहे. दुसऱ्या वीकेंडनंतर भारतातील एकूण कमाई जवळपास 22.50 कोटी रूपये झाली होती. या आकडेवारीच्या आधारे चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरील कामगिरी निराशाजनक असल्याचं म्हटलं जात आहे. सध्याच्या कमाईचा वेग पाहता थिएटरमधील प्रवास 30 कोटींपर्यंत थांबू शकतो. असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

काय आहे नयी नवेलीची कथा?

बालाजी मोहन यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाची कथा मेरठमधील एका कुटुंबाभोवती फिरते. या कुटुंबात नव्या नवरीचं आगमन होतं. तिच्या येण्याने घरातील परिस्थिती बदलू लागते, सुख समृद्धी येते. मात्र तिच्याकडे असलेल्या कथित अलौकिक शक्तींमुळे तिच्याबद्दल संशय निर्माण होतो. ती खरोखरचं चमत्कार करू शकते की काही रहस्य आहे. असा प्रश्न आणि त्याची उत्तरे याभोवती कथा फिरते.

या चित्रपटात आदिनाथ कोठारे, यामी गौतम, मीता वशिष्ठ, सोनल झा आणि सुनीता राजवर यांसारखे कलाकार महत्त्वांच्या भूमिकांमध्ये आहेत. चित्रपटाला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. आता उर्वरित दिवसांत चित्रपटाच्या कमाईत वाढ होते का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Follow Us
राज ठाकरेंचा महाराष्ट्राला गंभीर इशारा: 50 खोके एकदम ok घोषणेवर सडकून
राज ठाकरेंचा महाराष्ट्राला गंभीर इशारा: 50 खोके एकदम ok घोषणेवर सडकून टीका
तुम्ही Gen Z कधी उठणार? वृक्षतोडीवर राज ठाकरेंचं तरुणांना आवाहन
Raj Thackeray : तुम्ही Gen Z कधी उठणार? वृक्षतोडीवर राज ठाकरेंचं तरुणांना मोठं आवाहन
राज्यातील शिक्षक, पदवीधरच्या निकालावरून काँग्रेसला डिवचलं; PM मोदी...
राज्यातील शिक्षक, पदवीधरच्या निकालावरून काँग्रेसला डिवचलं; PM मोदींची पोस्ट चर्चेत!
भाजपच्या बंडखोरांना धक्का देत किरण सरनाईक यांचा विजय; कुटुंबीयांनी...
भाजपच्या बंडखोरांना धक्का देत किरण सरनाईक यांचा विजय; कुटुंबीयांनी व्यक्त केला आनंद, म्हणाले…
शिवसेना पक्षचिन्ह-आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी संपली; कोर्टात नेमकं
शिवसेना पक्षचिन्ह-आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी संपली; कोर्टात नेमकं काय घडलं?
विधान परिषद निकाल; कोण विजयी? कोण पराभूत? A to Z माहिती
Maharashtra MLC Election Result 2026 : विधान परिषद निकाल; कोण विजयी? कोण पराभूत? A to Z माहिती
शिवसेना कुणाची? शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद, व्हीप आणि पक्षांतर्गत...
शिवसेना कुणाची? शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद, व्हीप आणि पक्षांतर्गत निवडणुकांवर उपस्थित केले सवाल
सह्याद्रीतील वृक्षतोडीवरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मोदींचा...
सह्याद्रीतील वृक्षतोडीवरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मोदींचा कार्यक्रम रद्द करण्याची मागणी!
संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश,
संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश, 17 नोव्हेंबरला प्रत्यक्ष हजर राहावे लागणार!
आज माझ्या भावाला जाऊन 9 महिने झाले अन् त्यासोबतच...
आज माझ्या भावाला जाऊन 9 महिने झाले अन् त्यासोबतच... सुप्रिया सुळेंचं भावनिक विधान