AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raj Thackeray : 2000 कोटी आले कुठून? 50 खोक्यांवरून राज ठाकरेंचं सर्वात मोठं विधान; शिवसेनेतील बंडाचा थेट हिशोब मांडला!

50 खोके म्हणजे 50 कोटी रुपये होतात. म्हणजेच शिवसेनेचे 40 आमदार फोडले असतील तर 2000 कोटी रुपये असा त्याचा अर्थ होतो. एवढे पैसे आले कुठून? महाराष्ट्रात नेमकं काय चाललंय? असा सवाल राज ठाकरेंनी केला.

Raj Thackeray : 2000 कोटी आले कुठून? 50 खोक्यांवरून राज ठाकरेंचं सर्वात मोठं विधान; शिवसेनेतील बंडाचा थेट हिशोब मांडला!
raj thackeray Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 28, 2026 | 7:58 PM
Share

Raj Thackeray On Eknath Shinde Shivsena : मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांची कर्जतमध्ये जाहीर सभा झाली. कर्जतमधील वृक्षतोडीविरोधात त्यांनी एल्गार पुकारला आहे. यावेळी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एकूण दहा प्रश्न विचारले. सोबतच त्यांनी वृक्षतोडीला विरोध करत महाराष्ट्राच्या राजकारणावरही भाष्य केलं. त्यांनी 50 खोक्यांवरही महत्त्वाचं भाष्य केलं. त्यांनी थेट 2000 कोटी रुपयांचा हिशोब मांडला आहे.

2000 कोटी रुपये आले कुठून?

यावेळी सभेत बोलताना, वृक्षतोडीचा विषय मी हातात घेतला आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांची शिवसेनाही आली आहे. शेतकरी कामगार पक्ष आलेला आहे. बाकीचे पक्ष कुठे आहेत, असा सवाल राज ठाकरेंनी यावेळी केला. तसेच, 50 खोके एकदम ओके असं म्हटलं जातं. पण 50 खोके बोलताना त्याचा अर्थ काय होतो, हेही माहिती असणे गरजेचे आहे. 50 खोके म्हणजे 50 कोटी रुपये होतात. म्हणजेच शिवसेनेचे 40 आमदार फोडले असतील तर 2000 कोटी रुपये असा त्याचा अर्थ होतो. एवढे पैसे आले कुठून? महाराष्ट्रात नेमकं काय चाललंय? असा प्रश्नही राज ठाकरेंनी विचारला.

तुमचीच पोरं उद्या तुम्हाला शिव्या घालतील

आपण सगळ्या गोष्टी हसण्यावर नेतो. पण मी तुम्हाला सांगतो की तुमची पोरंच उद्या तुमची लाज काढतील. माझा बाप बेसावध निघाला, असं तुमची पोरं म्हणतील. तुमचीच पोरं तुम्हाला शिव्या घालतील. जेव्हा महाराष्ट्राकडे लक्ष द्यायचं होतं, तेव्हा दिलं नाही, असं पोरं म्हणतील. पुढे काय होणार याचा अंदाज तुम्ही बांधला नाही, तर उद्या तुमचंच जीणं खराब होईल, असा महत्त्वाचा इशारा राज ठाकरेंनी दिला.

कोणतंही सरकार एकाच गोष्टीला घाबरतं

आपल्याकडे निवडणूक आयोग आहे, आम्ही वाट्टेल तसं वागू, असं त्यांना वाटतं. त्यांना मतदारांचा शून्य फरक पडतो. आम्ही असेच वागणार आहोत, आम्ही जंगलं तोडणार आहोत. आम्ही महाराष्ट्रात जे वाटेल ते करणार आहोत, असं ते म्हणतात. आमच्याकडे निवडणूक आयोग आहे, असं त्यांना वाटतं. निवडणूक आयोगाची हमी जोपर्यंत आहे, तोपर्यंत काहीही होणार नाही, असे त्यांना वाटते. पण जगातलं कोणतंही सरकार लोक जिवंत असण्याला घाबरतं, असंही यावेळी राज ठाकरेंनी सांगितलं.

Follow Us
तुम्ही Gen Z कधी उठणार? वृक्षतोडीवर राज ठाकरेंचं तरुणांना आवाहन
Raj Thackeray : तुम्ही Gen Z कधी उठणार? वृक्षतोडीवर राज ठाकरेंचं तरुणांना मोठं आवाहन
राज्यातील शिक्षक, पदवीधरच्या निकालावरून काँग्रेसला डिवचलं; PM मोदी...
राज्यातील शिक्षक, पदवीधरच्या निकालावरून काँग्रेसला डिवचलं; PM मोदींची पोस्ट चर्चेत!
भाजपच्या बंडखोरांना धक्का देत किरण सरनाईक यांचा विजय; कुटुंबीयांनी...
भाजपच्या बंडखोरांना धक्का देत किरण सरनाईक यांचा विजय; कुटुंबीयांनी व्यक्त केला आनंद, म्हणाले…
शिवसेना पक्षचिन्ह-आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी संपली; कोर्टात नेमकं
शिवसेना पक्षचिन्ह-आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी संपली; कोर्टात नेमकं काय घडलं?
विधान परिषद निकाल; कोण विजयी? कोण पराभूत? A to Z माहिती
Maharashtra MLC Election Result 2026 : विधान परिषद निकाल; कोण विजयी? कोण पराभूत? A to Z माहिती
शिवसेना कुणाची? शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद, व्हीप आणि पक्षांतर्गत...
शिवसेना कुणाची? शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद, व्हीप आणि पक्षांतर्गत निवडणुकांवर उपस्थित केले सवाल
सह्याद्रीतील वृक्षतोडीवरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मोदींचा...
सह्याद्रीतील वृक्षतोडीवरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मोदींचा कार्यक्रम रद्द करण्याची मागणी!
संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश,
संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश, 17 नोव्हेंबरला प्रत्यक्ष हजर राहावे लागणार!
आज माझ्या भावाला जाऊन 9 महिने झाले अन् त्यासोबतच...
आज माझ्या भावाला जाऊन 9 महिने झाले अन् त्यासोबतच... सुप्रिया सुळेंचं भावनिक विधान
ठाण्याची अवस्था बीडपेक्षाही वाईट! अविनाश जाधवांचा सरकारला इशारा, लव
ठाण्याची अवस्था बीडपेक्षाही वाईट! अविनाश जाधवांचा सरकारला इशारा, लवकरच आंदोलनाचा इशारा