कर्जत-भीमाशंकर वृक्षतोडीवरुन राज ठाकरेंचा संताप, देवेंद्र फडणवीसांचा थेट 10 प्रश्न, म्हणाले, उत्तरं द्या
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कर्जतमध्ये सभा सभा घेतली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांना १० प्रश्नही विचारले,

कर्जत- भीमाशंकर अभयारण्यातील टोरेंट कंपनीच्या वृक्षतोडीवरुन विरोधक संतापले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर राज ठाकरेंची कर्जतमध्ये सभा पार पडली. कर्जतमधील वृक्षतोडीविरोधात त्यांनी एल्गार पुकारला आहे. यावेळी मला मुख्यमंत्र्यांना दहा प्रश्न विचारायचे आहेत, असं म्हणत राज ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे. यावेळी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एकूण दहा प्रश्न विचारले. सोबतच त्यांनी वृक्षतोडीला विरोध करत महाराष्ट्राच्या राजकारणावरही भाष्य केलं. त्यांनी 50 खोक्यांवरही महत्त्वाचं भाष्य केलं. त्यांनी थेट 2000 कोटी रुपयांचा हिशोब मांडला आहे.
सह्याद्रीकडे बघून शिवरायांना काय वाटत असेल?
महाराष्ट्रातले आमदार खासदार काय करत आहेत.
महाराष्ट्रातले आमदार खासदार आमदार एवढे लाचार कसे झाले?
आज जंगलांवर वेळ उद्या शहरांवर येणार.
गडचिरोली जंगल तोडून खाणीला परवानगी दिली.
प्रकल्पाला विरोध झाल्यास वीज बंद केली जाईल.
थंड बसणार असाल तर तुमचं नेतृत्व करणार नाही.
सर्बियात तरुणांनीच सत्ता बदलली.
ग्रामीण महाराष्ट्रातील जेन-झी कधी जागे होणार?
सह्याद्रीच्या कुशीमध्ये २३ प्रकल्प येत आहेत.
२३ पैकी ३ प्रकल्प हे केंद्राचे बाकी सर्व खासगी.
दरम्यान, पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले की, “वृक्षतोडीचा विषय मी हातात घेतला आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांची शिवसेनाही आली आहे. शेतकरी कामगार पक्ष आलेला आहे. बाकीचे पक्ष कुठे आहेत. 50 खोके एकदम ओके असं म्हटलं जातं. पण 50 खोके बोलताना त्याचा अर्थ काय होतो, हेही माहिती असणे गरजेचे आहे. 50 खोके म्हणजे 50 कोटी रुपये होतात. म्हणजेच शिवसेनेचे 40 आमदार फोडले असतील तर 2000 कोटी रुपये असा त्याचा अर्थ होतो. एवढे पैसे आले कुठून? महाराष्ट्रात नेमकं काय चाललंय?
आपण सगळ्या गोष्टी हसण्यावर नेतो. पण मी तुम्हाला सांगतो की तुमची पोरंच उद्या तुमची लाज काढतील. माझा बाप बेसावध निघाला, असं तुमची पोरं म्हणतील. तुमचीच पोरं तुम्हाला शिव्या घालतील. जेव्हा महाराष्ट्राकडे लक्ष द्यायचं होतं, तेव्हा दिलं नाही, असं पोरं म्हणतील. पुढे काय होणार याचा अंदाज तुम्ही बांधला नाही, तर उद्या तुमचंच जीणं खराब होईल.
