AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WPL Auction 2027: खिसा हलका, पण डाव पक्का! मुंबई इंडियन्सचा लिलावात ‘स्मार्ट गेम’; 4 खेळाडूंसाठी आखली ‘ती’ खास रणनीती

WPL Auction 2027: महागड्या खेळाडूंच्या मागे धावण्यापेक्षा मुंबई इंडियन्सने वेगळा मार्ग निवडला आहे. कमी बजेटमध्ये जास्तीत जास्त स्लॉट भरण्यासाठी खास चाल आखली आहे.

WPL Auction 2027: खिसा हलका, पण डाव पक्का! मुंबई इंडियन्सचा लिलावात 'स्मार्ट गेम'; 4 खेळाडूंसाठी आखली ‘ती’ खास रणनीती
| Updated on: Oct 28, 2026 | 7:51 PM
Share

दोन वेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्स संघ 2027 मध्ये आपले तिसरे महिला प्रीमियर लीग विजेतेपद पटकावण्यासाठी कोणतीही कसर सोडणार नाही. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील हा संघ पूर्ण तयारीने लिलावात उतरेल. मात्र उपलब्ध असलेली रक्कम उपलब्ध जागांच्या संख्येपेक्षा कमी आहे. यामुळे मोठ्या बोलींच्या शर्यतीत मुंबईने वेगळाच मार्ग शोधला आहे. संघाने 4 खेळाडूंसाठी खास डाव आखला आहे.

मुंबईने गेल्या हंगामातील 11 खेळाडूंना कायम ठेवले आहे. सहा खेळाडूंना करारमुक्त केले आहे. मुंबईने पहिला आणि तिसरा हंगाम जिंकला होता. यावेळी त्यांचे लक्ष्य तिसरे विजेतेपद असेल, ज्यासाठी त्यांनी आपल्या प्रमुख खेळाडूंना कायम ठेवले आहे. मुंबई इंडियन्सकडे सहा रिक्त जागा भरण्यासाठी 90 लाख रुपयांचा निधी आहे. परंतु परदेशी खेळाडूंची यादी आधीच पूर्ण भरलेली असल्याने त्यांना सर्व भारतीय खेळाडूच घ्यावे लागतील.

याचा अर्थ, मुंबईला लिलावात परदेशी खेळाडूंवर बोली लावता येणार नाही. यासाठी संघाने काटकसरीचा फॉम्युला वापरला आहे. मुंबई इंडियन्स संघाने दिशा कासटला मूळ किंम्मतीत खरेदी केले आहे. तिची मूळ किंमत ₹10 लाख आहे. मुंबई इंडियन्सने तिला सर्वात आधी निवडले. मुंबईला इतर कोणत्याही फ्रँचायझीकडून स्पर्धा नव्हती. दिशा कास्ट ₹10 लाखांमध्ये मुंबई इंडियन्स संघात सामील झाली.

यानंतर लतिका इनामदार नाव समोर आले. तिची मूळ किंमत ₹10 लाख होती. मुंबई इंडियन्सने हा प्रस्ताव स्वीकारला. इतर कोणत्याही फ्रँचायझीने असा प्रस्ताव दिला नाही. लतिका इनामदार ₹10 लाखांमध्ये मुंबई इंडियन्स संघात सामील झाली. भारती रावलचे नाव समोर आले. तिची मूळ किंमत ₹10 लाख आहे. मुंबई इंडियन्स ही एकमेव फ्रँचायझी होती जिने तिला संघात घेतले. अशाप्रकारे भारती रावल तिच्या ₹10 लाख या मूळ किमतीत मुंबई इंडियन्स संघात सामील झाली.

मुंबईने 10 लाख रुपयांना आपला चौथा खेळाडूही विकत घेतला. संघाने सानिका चाळकेला 10 लाख रुपयांच्या मूळ किमतीत संघात सामील केले आहे. आता मुंबईकडे 50 लाख रुपये शिल्लक आहेत. तर अनकॅप्ड अष्टपैलू खेळाडूंच्या श्रेणीत चार्ली नॉट, प्रगती सिंग, टेस फ्लिंटॉफ, आनंदीता किशोर, पूनम खेमनार आणि सुजाता डे यांच्यावर पैज लावण्यात आली नाही. या श्रेणीतील कोणत्याही खेळाडूंवर पैज लावण्यात आली नाही.

Follow Us
तुम्ही Gen Z कधी उठणार? वृक्षतोडीवर राज ठाकरेंचं तरुणांना आवाहन
Raj Thackeray : तुम्ही Gen Z कधी उठणार? वृक्षतोडीवर राज ठाकरेंचं तरुणांना मोठं आवाहन
राज्यातील शिक्षक, पदवीधरच्या निकालावरून काँग्रेसला डिवचलं; PM मोदी...
राज्यातील शिक्षक, पदवीधरच्या निकालावरून काँग्रेसला डिवचलं; PM मोदींची पोस्ट चर्चेत!
भाजपच्या बंडखोरांना धक्का देत किरण सरनाईक यांचा विजय; कुटुंबीयांनी...
भाजपच्या बंडखोरांना धक्का देत किरण सरनाईक यांचा विजय; कुटुंबीयांनी व्यक्त केला आनंद, म्हणाले…
शिवसेना पक्षचिन्ह-आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी संपली; कोर्टात नेमकं
शिवसेना पक्षचिन्ह-आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी संपली; कोर्टात नेमकं काय घडलं?
विधान परिषद निकाल; कोण विजयी? कोण पराभूत? A to Z माहिती
Maharashtra MLC Election Result 2026 : विधान परिषद निकाल; कोण विजयी? कोण पराभूत? A to Z माहिती
शिवसेना कुणाची? शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद, व्हीप आणि पक्षांतर्गत...
शिवसेना कुणाची? शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद, व्हीप आणि पक्षांतर्गत निवडणुकांवर उपस्थित केले सवाल
सह्याद्रीतील वृक्षतोडीवरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मोदींचा...
सह्याद्रीतील वृक्षतोडीवरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मोदींचा कार्यक्रम रद्द करण्याची मागणी!
संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश,
संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश, 17 नोव्हेंबरला प्रत्यक्ष हजर राहावे लागणार!
आज माझ्या भावाला जाऊन 9 महिने झाले अन् त्यासोबतच...
आज माझ्या भावाला जाऊन 9 महिने झाले अन् त्यासोबतच... सुप्रिया सुळेंचं भावनिक विधान
ठाण्याची अवस्था बीडपेक्षाही वाईट! अविनाश जाधवांचा सरकारला इशारा, लव
ठाण्याची अवस्था बीडपेक्षाही वाईट! अविनाश जाधवांचा सरकारला इशारा, लवकरच आंदोलनाचा इशारा