Virender Sehwag : सामन्यादरम्यान पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब अख्तरने वीरेंद्र सेहवागला केलेली शिवीगाळ, क्रिकेटपटूनं दिलं सडेतोड उत्तर, म्हणाला, तेव्हाच मी…
Virender Sehwag On Shoaib Akhtar : वीरेंद्र सेहवाग आतापर्यंतच्या सर्वोत्कृष्ट खेळाडूंपैकी एक मानला जातो. सध्या तो 'राईज अँड फॉल' या शोचं सूत्रसंचालन करत आहे. या कार्यक्रमादरम्यान वीरेंद्रने त्याचा किस्सा सांगितला आहे.

‘राईज अँड फॉल’ या रिॲलिटी शोमध्ये टीव्ही स्टार्समध्ये जोरदार लढाई पाहायला मिळत आहे. ते त्यांच्या भांडणात आणि शाब्दिक शिवीगाळ करत सर्व मर्यादा ओलांडत आहेत. स्पर्धकांच्या गैरवर्तनामुळे वीरेंद्र सेहवाग इतका अस्वस्थ झाला की, त्यानं रागानं सर्व स्पर्धकांना खडसावलं. तसेच वीरेंद्रनं स्पर्धकांना स्वतःचं उदाहरणही सांगितलं.
सेहवागनं एक किस्सा सांगितला
त्यानंतर वीरेंद्र सेहवागनं स्पर्धकांना त्याच्या आयुष्यातील एक गोष्ट सांगितली, त्यामुळे सर्वांनी त्याचं कौतुक केलं. वीरेंद्रनं सांगितलं की, पाकिस्तानविरुद्धच्या क्रिकेट सामन्यादरम्यान, पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब अख्तरनं त्याला मैदानावर शिवीगाळ केली होती. पण शोएब अख्तरला शिवीगाळ करण्याऐवजी, वीरेंद्रनं आपल्या दमदार फलंदाजीनं पाकिस्तानी खेळाडूंना प्रत्युत्तर दिलं. आपला अनुभव सांगताना वीरेंद्र सेहवाग म्हणाला, ‘मी १९९९ मध्ये माझा पहिला सामना खेळत होतो. त्यावेळी मी २० वर्षांचा होतो. जेव्हा मी मैदानावर पाऊल ठेवलं, तेव्हा शोएब अख्तर मला शिवीगाळ करत क्रीजवर घेऊन गेला. मग मी त्याला विचारलं, ‘मी बॅटिंग करू का? चालता हो इथून…मग तो निघून गेला.’
शोएब अख्तरला दिलेलं सडेतोड उत्तर
सेहवाग पुढे म्हणाला, ‘त्यावेळी मी एक धाव काढली होती. मग मी काय केलं असतं? मी त्याच्याशी भांडलो असतो, त्याला शिव्या दिल्या असत्या किंवा त्याला मारलं असतं. तेव्हाच मी ठरवलं की, जर मी पाकिस्तानविरुद्ध पुन्हा त्याच्याविरुद्ध खेळलो, तर मी त्याला इतकं वाईट हरवेन की, मला त्याला शिव्या द्याव्या लागणार नाहीत आणि माझी बॅटच बोलेल. तेव्हा मी ३०९ धावा केल्या आणि माझ्या बॅटनं प्रत्युत्तर दिलं. मग पाकिस्तानी खेळाडूंनी ठरवलं, ‘सेहवागला शिव्या देऊ नका. तुम्ही त्याला शिव्या दिल्या, तर तो आमच्याविरुद्ध जास्त धावा करेल.’
वीरेंद्र सेहवागचे हे शब्द ऐकून सर्व सेलिब्रिटींनी टाळ्या वाजवायला सुरुवात केली. सेहवागचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि नेटकरी त्याचं भरभरून कौतुक करत आहेत.
