AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video Viral : उलट्या लटकवलेल्या बाईकवर 10 मिनिटं बसा अन् बाईक जिंका! दुकानदाराची भन्नाट आयडिया व्हायरल

उलट्या लटकलेल्या बाईकवर बसा आणि 'फ्रि' मध्ये बाईक घरी घेऊन जा.दुकानदाराची ही भन्नाट आयडिया सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

Video Viral :  उलट्या लटकवलेल्या बाईकवर 10 मिनिटं बसा अन् बाईक जिंका! दुकानदाराची भन्नाट आयडिया व्हायरल
bike viral video
| Updated on: Oct 28, 2026 | 9:20 PM
Share

दिवाळीत कुठे मिठाईवर ऑफर मिळते, तर कुठे कपड्यांवर सूट पाहायला मिळते. पण एखाद्या दुकानात गेल्यावर दुकानदार म्हणाला की, ‘ही बाईक मी तुम्हाला भेट देतो, बास फक्त त्या उलट्या लटकलेल्या बाईकवर बसून दाखवा. असाच एक भन्नाट प्रकार एका दुकानादाराने केला आहे आणि सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार हा प्रकार ब्राझीलमधील पेड्रो सेंगुडो येथील एका मोठ्या शोरूमच्या उद्घाटनासाशी संबंधित आहे. दुकानाकडे लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी मालकाने ही भन्नाट कल्पना राबवली. दुकानाच्या प्रवेशद्वाराजवळ एक निळ्या रंगाची बाईक छताला उलटी लटकवली आणि बोर्ड लावला की,’बाईक फ्रि मध्ये हवी असेल तर या उलट्या लटकलेल्या बाईकवर बसून दाखवा.

यासोबतच अट अशी होती की, या उलट्या लटकवलेल्या बाईकवर हात पायांच्या मदतीने स्वत:ला सावरत 10 मिनिटे टिकून दाखवायचं.जो हे आव्हान पूर्ण करेल त्याला ती बाईक बक्षीस म्हणून फ्रिमध्ये दिली जाईल. अगदी एकही पैसा न देता. व्हायरल व्हिडिओमध्ये काही लोक हे आव्हान स्वीकारताना दिसतात. मात्र त्यांचे अनेक प्रयत्न असफल ठरतात.

दुकानदाराची ही आयडिया सोशल मीडियावर गाजली

हा व्हिडिओ सोशल मिडिया प्लॅटफॉर्म शेअर करण्यात आला आहे. दुकानाच्या उद्घाटनासाठी आखलेली ही युक्ती पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. काहींनी दुकानदाराच्या मार्केटिंगच्या कल्पनेचं कौतुक केलं आहे. तर काहींनी उलट्या बाईकवर 10 मिनिटे टिकून राहणे अशक्य असल्याचे म्हटले

मात्र, या व्हिडिओमध्ये आव्हान पूर्ण करून कुणी बाईक जिंकल्याचं दिसत नाही. त्यामुळे सध्या तरी ही भन्नाट मार्केटिंग आयडिया चर्चेत आहे. बाईक नेमकी कुणाला मिळाली? याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

मात्र, या व्हिडीओमध्ये आव्हान पूर्ण करून कुणी बाईक जिंकल्याचं दिसत नाही. त्यामुळे सध्या तरी ही भन्नाट मार्केटिंग आयडिया चर्चेत आहे; बाईक नेमकी कुणाला मिळाली का, याची पुष्टी उपलब्ध वृत्तातून झालेली नाही.

Follow Us
राज ठाकरेंचा महाराष्ट्राला गंभीर इशारा: 50 खोके एकदम ok घोषणेवर सडकून
राज ठाकरेंचा महाराष्ट्राला गंभीर इशारा: 50 खोके एकदम ok घोषणेवर सडकून टीका
तुम्ही Gen Z कधी उठणार? वृक्षतोडीवर राज ठाकरेंचं तरुणांना आवाहन
Raj Thackeray : तुम्ही Gen Z कधी उठणार? वृक्षतोडीवर राज ठाकरेंचं तरुणांना मोठं आवाहन
राज्यातील शिक्षक, पदवीधरच्या निकालावरून काँग्रेसला डिवचलं; PM मोदी...
राज्यातील शिक्षक, पदवीधरच्या निकालावरून काँग्रेसला डिवचलं; PM मोदींची पोस्ट चर्चेत!
भाजपच्या बंडखोरांना धक्का देत किरण सरनाईक यांचा विजय; कुटुंबीयांनी...
भाजपच्या बंडखोरांना धक्का देत किरण सरनाईक यांचा विजय; कुटुंबीयांनी व्यक्त केला आनंद, म्हणाले…
शिवसेना पक्षचिन्ह-आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी संपली; कोर्टात नेमकं
शिवसेना पक्षचिन्ह-आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी संपली; कोर्टात नेमकं काय घडलं?
विधान परिषद निकाल; कोण विजयी? कोण पराभूत? A to Z माहिती
Maharashtra MLC Election Result 2026 : विधान परिषद निकाल; कोण विजयी? कोण पराभूत? A to Z माहिती
शिवसेना कुणाची? शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद, व्हीप आणि पक्षांतर्गत...
शिवसेना कुणाची? शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद, व्हीप आणि पक्षांतर्गत निवडणुकांवर उपस्थित केले सवाल
सह्याद्रीतील वृक्षतोडीवरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मोदींचा...
सह्याद्रीतील वृक्षतोडीवरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मोदींचा कार्यक्रम रद्द करण्याची मागणी!
संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश,
संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश, 17 नोव्हेंबरला प्रत्यक्ष हजर राहावे लागणार!
आज माझ्या भावाला जाऊन 9 महिने झाले अन् त्यासोबतच...
आज माझ्या भावाला जाऊन 9 महिने झाले अन् त्यासोबतच... सुप्रिया सुळेंचं भावनिक विधान