AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अखेर अमेरिकेचं गर्वहरण, भारताकडे पसरली झोळी… ऐन युद्धकाळात काय घडतंय?

इराण-इस्रायल युद्धामुळे जागतिक तेलाच्या किमती वाढल्या आहेत, ज्यामुळे इतर देशांनाही फटका बसत आहे. अशा परिस्थितीत अमेरिकेने तेल दर स्थिर करण्यासाठी थेट भारताकडे मदतीची याचना केली आहे. रशियन तेल खरेदी करून जागतिक बाजारातील दबाव कमी करण्याची अमेरिकेची अपेक्षा आहे, जे भारताच्या वाढत्या जागतिक महत्त्वावर प्रकाश टाकते आणि अमेरिकेच्या बदललेल्या भूमिकेला अधोरेखित करते.

अखेर अमेरिकेचं गर्वहरण, भारताकडे पसरली झोळी... ऐन युद्धकाळात काय घडतंय?
Chris WrightImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 07, 2026 | 12:22 AM
Share

इराण विरुद्ध इस्रायल आणि अमेरिकेने युद्ध पुकारलं आहे. या युद्धात तिन्ही देशाचं अतोनात नुकसान होत आहे. आठवडा होत आला तरी हे युद्ध सुरू असल्याने या युद्धामुळे बाकीचे देशही होरपळून निघताना दिसत आहे. या युद्धामुळे केवळ तेलच नव्हे तर जीवनावश्यक वस्तूंचे दरही गगनाला भिडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे जगभरातील लोक हवालदिल झाले आहेत. अशातच एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अमेरिकेने तेलाच्या किंमती कमी करण्यासाठी थेट भारताची मदत मागितली आहे. त्यामुळे आता भारत सरकार काय भूमिका घेतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

अमेरिकेचे ऊर्जा सचिव क्रिस राईट यांनी एका मुलाखतीत ही माहिती दिली आहे. “आम्ही भारतातील आमच्या मित्रांशी संपर्क साधला आहे की त्यांनी साठवलेले रशियन तेल खरेदी करावे. त्यामुळे तेल भारतीय रिफायनरीमध्ये येईल आणि जगातील इतर रिफायनरींवरील दबाव कमी होईल,” असे अमेरिकेचे ऊर्जा सचिव क्रिस राईट यांनी सांगितले. तसेच हाच एक प्रॅक्टिकल मार्ग असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

दादागिरीचं गर्वहरण

टॅरिफ लावून जगावर दादागिरी करून भारतासह जगातील अनेक देशांना अमेरिकेने त्रास दिला होता. त्यानंतर इराणवर हल्ला करून आम्ही काहीही करू शकतो, असं दाखवण्याचा प्रयत्न केला. पण इराणने जशास तसे प्रत्युत्तर दिल्यानंतर अमेरिकेची झोप उडाली आहे. त्यामुळेच अमेरिकेचं पुरतं गर्वहरण झालं असून अमेरिकेने भारताकडे मदतची झोळी पसरली. या सर्व पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या ऊर्जा सचिवांनी हे विधान केल्याने अमेरिका बॅकफूटवर आल्याचं दिसून येत आहे.

मध्यपूर्वेत सुरू असलेलं युद्ध आणि स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये तेलाचा पुरवठा थांबला आहे. त्यामुळे अमेरिकेवरील दबाव वाढला आहे. त्यामुळेच अमेरिकेला आपली जुनी धोरणं केराच्या टोपली टाकून भारताची ऑयल डिप्लोमसी स्विकारावी लागत आहे.

मागच्या वर्षी दबाव

मागच्यावर्षी अमेरिकेने रशियाकडून तेल खरेदी करू नये म्हणून भारतावर दबाव वाढवला होता. मात्र आता युद्धामुळे परिस्थिती बदलल्याने अमेरिकेला गुडघ्यावर यावं लागलं आहे. इराण आणि इस्रायलच्या युद्धामुळे तेलाच्या किमती दोन वर्षातील उच्चतम स्तरावर पोहोचल्या आहेत. होर्मुजचे आखात बंद झाल्याने जगभरातील रिफायनरींना तेल मिळणं बंद झालं आहे. जर भारताने समुद्रात उभ्या असलेल्या रशियन टँकरमधून तेल खरेदी करून आपल्या रिफायनरीत नेलं तर त्यामुळे ग्लोबल मार्केटमधील तेलाच्या अव्वाच्या सव्वा वाढलेल्या किमती कमी होतील. त्यामुळे इतर देशावरील तेलाचा ताण कमी होईल, असं अमेरिकेला वाटत आहेत.

मित्र म्हणून संबोधन

दरम्यान, क्रिस्ट यांनी भारताला मित्र म्हणून संबोधित केलं आहे. भारतच ग्लोबल मार्केटला स्थिरता देऊ शकतो, असं सांगत क्रिस्ट यांनी भारताची जागतिक ताकद मान्य केली आहे. यावरून जेव्हा संकट येतं तेव्हा जगातील महाशक्तींना भारताची आठवण येते, हे पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे.

Follow Us
लाडकी बहिणींची चिंताच मिटली, शिंदेंनी दिली Good News, योजनेबाबत मोठी
लाडकी बहिणींची चिंताच मिटली, शिंदेंनी दिली Good News, योजनेबाबत मोठी.
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरणी आणखी एकाची धरपकड, अटकेचं का
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरणी आणखी एकाची धरपकड, अटकेचं का.
धक्कादायक! सहा महिन्यात 34 आदिवासी मुली बेपत्ता, भाजप नेत्याचे खळबळजनक
धक्कादायक! सहा महिन्यात 34 आदिवासी मुली बेपत्ता, भाजप नेत्याचे खळबळजनक.
अक्षय तृतीयानिमित्त सिद्धिविनायकमध्ये बाप्पाच्या दागिन्यांच्या लिलाव,
अक्षय तृतीयानिमित्त सिद्धिविनायकमध्ये बाप्पाच्या दागिन्यांच्या लिलाव,.
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांचे डोळे आतुर,
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांचे डोळे आतुर,.
महिला आरक्षणावरुन दमानियांनी सत्ताधारी पक्षाला घेरलं, थेट फडवीसांना वि
महिला आरक्षणावरुन दमानियांनी सत्ताधारी पक्षाला घेरलं, थेट फडवीसांना वि.
राऊतांच्या वक्तव्यावर संजय शिरसाटांची जोरदार टीका; थेट म्हणाले, 'दुसऱ्
राऊतांच्या वक्तव्यावर संजय शिरसाटांची जोरदार टीका; थेट म्हणाले, 'दुसऱ्.
मोठी बातमी! भोंदू खरातचा मोबाईल डेटा रिकव्हर, नेमकं काय आलं समोर?
मोठी बातमी! भोंदू खरातचा मोबाईल डेटा रिकव्हर, नेमकं काय आलं समोर?.
महापौर रितू तावडेंकडून काँग्रेसचा निषेध, काळी साडी नेसून सभेत येणार
महापौर रितू तावडेंकडून काँग्रेसचा निषेध, काळी साडी नेसून सभेत येणार.
काँग्रेसशिवाय देशाला योग्य नेतृत्व कोणी करूच शकत नाही; संजय राऊतांनी भ
काँग्रेसशिवाय देशाला योग्य नेतृत्व कोणी करूच शकत नाही; संजय राऊतांनी भ.