AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मी नकार दिला, रडले तरीही दिग्दर्शकाने मला बिकिनी घालायला भाग पाडलं, या अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव

इंडस्ट्रीमधील अशी एक अभिनेत्री जिने बिकिनी परिधान करण्यासाठी दिलेला नकार, अभिनेत्री रडली तरीही दिग्दर्शकाने बळजबरीने परिधान करायला लावलेली बिकिनी. कोण आहे ती अभिनेत्री?

मी नकार दिला, रडले तरीही दिग्दर्शकाने मला बिकिनी घालायला भाग पाडलं, या अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
| Updated on: May 02, 2026 | 5:55 PM
Share

90 च्या दशकात आपल्या सौंदर्याने आणि दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी साऊथ अभिनेत्री मोहिनी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नडसह हिंदी चित्रपटांमध्येही काम करत मोहिनीने आपल्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट दिले.

त्या काळात तिची लोकप्रियता प्रचंड होती आणि ती ग्लॅमर तसेच अभिनयासाठी ओळखली जात होती. मात्र, नुकत्याच समोर आलेल्या एका मुलाखतीत मोहिनीने चित्रपटसृष्टीतील आपला एक अत्यंत त्रासदायक अनुभव उघड केला आहे. या खुलाशामुळे पुन्हा एकदा मनोरंजन विश्वातील पडद्यामागील वास्तव समोर आले आहे.

‘त्या’ सीनसाठी जबरदस्ती

मोहिनीने कण्मणि या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा अनुभव सांगितला. या चित्रपटाचे दिग्दर्शक आरके सेल्वामणी यांनी एका सीनसाठी तिला स्विमसूट परिधान करण्यास सांगितले होते. मात्र, त्या सीनबद्दल ती अत्यंत अस्वस्थ होती.

मोहिनीने सांगितले, त्या सीनसाठी मला हाफ ड्रेसमध्ये शूट करायला सांगितलं गेलं. मी खूप रडले आणि तो सीन करण्यास स्पष्ट नकार दिला होता. त्या काळात महिला प्रशिक्षकही नव्हत्या. त्यामुळे अशा प्रकारचा सीन करणं मला अजिबात सोयीचं वाटत नव्हतं.

दबावाखाली घेतलेला निर्णय

तिने पुढे सांगितले की, दिग्दर्शकांकडून सतत दबाव आणला जात होता. मला असं वाटत होतं की मला जबरदस्तीने तो सीन करायला लावला जात आहे. शेवटी मी दीड दिवस शूटिंग केलं आणि त्यांनी सांगितलेला सीन पूर्ण केला असे ती म्हणाली.

मात्र, त्यानंतर आणखी एका ठिकाणी ऊटी असाच सीन शूट करण्याची मागणी झाली तेव्हा मोहिनीने ठामपणे नकार दिला. मी त्यांना स्पष्ट सांगितलं की हे तुमचं प्रॉब्लेम आहे. मी आधीच दबावाखाली तो सीन केला होता असेही तिने नमूद केले.

वादांमुळे चर्चेत राहिलेला चित्रपट

1994 साली प्रदर्शित झालेला ‘कन्मानी’ हा चित्रपट त्यावेळी चांगलाच गाजला होता. या चित्रपटात मोहिनीची भूमिका आव्हानात्मक होती. मात्र तिच्या अभिनयापेक्षा चित्रपटातील वादग्रस्त सीनमुळेच तो अधिक चर्चेत राहिला.

त्या काळात चित्रपटसृष्टीत आजच्या तुलनेत सुरक्षितता आणि स्पष्ट नियमांची कमतरता होती. अनेक अभिनेत्रीना त्यांच्या इच्छेविरुद्ध काही प्रसंग करावे लागत असल्याच्या घटना अधूनमधून समोर येत असतात. मोहिनीच्या या खुलाशामुळे त्या काळातील वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे.

Follow Us
शिंदेंच्या शिवसेनेत जाणार? ओमराजेंचं मोठं विधान, 2 दिवसांत अंतिम...
Omraje Nimbalkar | शिंदेंच्या शिवसेनेत जाणार? ओमराजेंचं मोठं विधान, 2 दिवसांत अंतिम निर्णय घेणार!
शिंदेंच्या सेनेतील बडा नेता ओमराजेंच्या भेटीला; पुण्याच्या निवासस्थानी
शिंदेंच्या सेनेतील बडा नेता ओमराजेंच्या भेटीला; पुण्याच्या निवासस्थानी... राजकारणातील घडामोडींना वेग
हे सगळं पैशासाठी असेल तर...; पवनराजे निकालावर अंजली दमानियांचा संताप
Anjali Damania | हे सगळं पैशासाठी असेल तर...; पवनराजे निकालावर अंजली दमानियांचा संताप अनावर
एकही खासदार कुठंही जाणार नाही, कारण... शिंदे सेनेतील नेत्याने सांगितलं
Big Breaking | एकही खासदार कुठंही जाणार नाही, कारण... शिंदे सेनेतील नेत्याने सांगितलं गुपित
पवनराजे निंबाळकर प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिय
पवनराजे निंबाळकर प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; थेट अमित शाह...
निंबाळकरांचा निर्णय आता उद्धव ठाकरेंच्या कोर्टात!
Omraje Nimbalkar | निंबाळकरांचा निर्णय आता उद्धव ठाकरेंच्या कोर्टात! अनिल देसाईंच्या त्या विधानाने महाराष्ट्रात खळबळ
ओमराजेंचे कट्टर समर्थक कैलास पाटील मातोश्रीवर, राजकारणात मोठं घडणार?
Omraje Nimbalkar | ओमराजेंचे कट्टर समर्थक कैलास पाटील अचानक 'मातोश्री'वर, राजकारणात मोठं घडणार?
मी शिंदे गटात... ओमराजेंचा निर्णय बदलला? त्या एका विधानानं खळबळ
Omraje Nimbakakar | मी शिंदे गटात... ओमराजेंचा निर्णय बदलला? त्या एका विधानानं खळबळ
दुर्दैव! हायकोर्टात जाणार... निंबाळकर निकालावर ओमराजेंची प्रतिक्रिया
दुर्दैव! हायकोर्टात जाणार...पवनराजे निंबाळकर निकालावर ओमराजेंची पहिली प्रतिक्रिया समोर
मोठी बातमी! आरोपींची निर्दोष मुक्तता, मात्र खोट्या साक्षीदारामुळे खटला
मोठी बातमी! आरोपींची निर्दोष मुक्तता, मात्र खोट्या साक्षीदारामुळे खटला... पवनराजे निंबाळकर प्रकरणात कायदेतज्ज्ञ काय म्हणाले?