AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

योगदिनानिमित्त करा ‘हे’ 5 सर्वोत्तम योगासने, वजन कमी होण्यास होईल मदत

केवळ आहारच नाही, तर नियमित योगाभ्यास देखील वजन कमी करण्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतो. काही विशिष्ट योगासने कॅलरी बर्न करण्यास आणि चयापचय सुधारण्यास मदत करतात, ज्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. चला तर मग कोणती योगासने केली पाहिजे ते जाणून घेऊयात.

योगदिनानिमित्त करा 'हे' 5 सर्वोत्तम योगासने, वजन कमी होण्यास होईल मदत
| Edited By: | Updated on: Jun 20, 2026 | 4:28 PM
Share

आजकाल बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकांना वाढत्या वजनाच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यात वजन वाढणे ही केवळ दिसण्यापुरती समस्या राहिलेली नाही. तर त्यामुळे अनेक आरोग्य समस्याही निर्माण होऊ लागल्या आहेत. जास्तवेळ एकाच जागी बसून काम करणे, अनियमित खाण्याच्या सवयी आणि शारीरिक हालचालींचा अभाव यामुळे लठ्ठपणा झपाट्याने वाढत आहे. वजन कमी करण्यासाठी अनेक लोक जिम, डाएट आणि इतर पद्धतींचा अवलंब करतात. तथापि तुम्ही जर शरीर आणि मन या दोन्हींसाठी फायदेशीर ठरेल अशा पद्धतीच्या शोधात असाल, तर योगा करणे हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो.

योगामुळे केवळ लवचिकताच सुधारत नाही, तर स्नायू मजबूत होण्यास, तणाव कमी होण्यास आणि शरीरातील ऊर्जेचा समतोल राखण्यासही मदत होते. दररोज योगाभ्यास आणि संतुलित आहार वजन कमी करण्यास मदत करू शकतात. वजन कमी करण्यासाठी सर्वोत्तम योगासने कोणती आहेत आणि कोणत्या योगासनांचा सराव करावा हे जाणून घेऊयात.

1. सूर्य नमस्कार

वजन कमी करण्यासाठी सूर्यनमस्कार हे सर्वात उत्तम योगासन आहे. कारण सूर्यनमस्कार करताना यामध्ये अनेक आसनांचा समावेश असतो, ज्यामुळे संपूर्ण शरीर सक्रिय होते. नियमितपणे सूर्यनमस्कार केल्याने कॅलरी बर्न होण्यास आणि शरीर सुडौल होण्यास मदत होते.

2. नौकासन

नौकासनामुळे पोटाचे आणि कमरेचे स्नायू बळकट होतात. या आसनामध्ये शरीर होडीसारखी स्थिती तयार होते. हे आसन पोटाचे स्नायू मजबूत करते आणि पोटावरील फॅट कमी करण्यास मदत करू शकते.

3. भुजंगासन

भुजंगासन पाठीचा कणा मजबूत करते आणि पोट व कंबरेच्या भागांना सक्रिय करते. हे आसन लवचिकता वाढवण्यासाठी फायदेशीर मानले जाते आणि तुमच्या नियमित योगाभ्यासात याचा समावेश करणे चांगले आहे.

4. धनुरासन धनुरासन (Dhanurasana) मध्ये शरीर धनुष्यासारखे स्थित केले जाते. या आसनामुळे पोटाचे, मांड्यांचे आणि पाठीचे स्नायू बळकट होतात. तुमच्या व्यायामाच्या नित्यक्रमात याचा समावेश केल्यास तुम्हाला अधिक उत्साही वाटण्यास मदत होऊ शकते.

5. उत्कटासन

उत्कटासन, ज्याला चेअर पोझ असेही म्हणतात, पाय, मांड्या आणि पोटाचे स्नायू मजबूत करण्यास मदत करते. नियमित सरावाने शारीरिक ताकद आणि संतुलन सुधारू शकते.

तुम्हाला जर वजन कमी करायचे असेल, तर संतुलित आहार, पुरेशी झोप आणि दररोजच्या काही शारीरिक हालचालींसोबतच योगा करणे आवश्यक आहे. केवळ योगामुळे लगेच परिणाम दिसणार नाहीत, परंतु नियमित सरावाने काही आठवड्यांतच तुम्हाला परिणाम दिसू शकतात.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा