मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार…
सरकारच्या शिष्टमंडळाचा उपोषण मोडीत काढण्याचा डाव असू शकतो असं जरांगेंनी म्हटलेलं आहे. अंतरवालीत भेटीला आलेल्या सरकारचा शिष्टमंडळावर जरांगेंनी हा आरोप केलेला आहे. मात्र मी सरकारच्या शिष्टमंडळाचा डाव उधळून लावला असं देखील जरांगेंनी म्हटलंय. 29 तारखेचं उपोषण निर्णायक होणार आहे आणि हे विजयी उपोषण असणार आहे असं देखील जरांगेंनी म्हटलंय. बऱ्याच वेळेस सगळी बैठक झाली, मात्र […]
सरकारच्या शिष्टमंडळाचा उपोषण मोडीत काढण्याचा डाव असू शकतो असं जरांगेंनी म्हटलेलं आहे. अंतरवालीत भेटीला आलेल्या सरकारचा शिष्टमंडळावर जरांगेंनी हा आरोप केलेला आहे. मात्र मी सरकारच्या शिष्टमंडळाचा डाव उधळून लावला असं देखील जरांगेंनी म्हटलंय. 29 तारखेचं उपोषण निर्णायक होणार आहे आणि हे विजयी उपोषण असणार आहे असं देखील जरांगेंनी म्हटलंय. बऱ्याच वेळेस सगळी बैठक झाली, मात्र असं असताना सुद्धा तुम्ही 29 तारखेच्या आंदोलनावर ठाम आहेत? नाही मग निर्णायक शब्दाचा अर्थ काय असतो? ज्यांनी नोंदी असून सुद्धा त्यांना प्रमाणपत्र दिलं नाही, त्यांनी अर्ज करा आणि एक झेरॉक्स इकडं पण अंतरवालीला 28 ऑगस्टला घेऊन या. ते त्याचं सरकारचं विषय. ते आलेत चर्चा केली, म्या पण केली. विषय संपला. आंदोलन होणार. सरकार देईल, नाही देईल, त्या आशेवर मी बसत नाही. यांना हीच डाव होता यांचा, एवढेच यांनी जेवढे दिलेत का 20 का 22 लाख का 14 लाख, एवढेच द्यायचे होते यांना आता. याच्या पुढचे 58 लाख द्यायचे नव्हते, हे डाव होता यांचा. पण उदय सामंत साहेबांच्या हातात पलीकडून आणखीन एक प्रोसिडिंग आली. त्यांनी पुढे केली. विखे पाटलांना बोलवतात तेही येतात. घुसायचं बघतेत. जुने चेतन, आमके चेतन, तमके चेतन. जुने दिलेले आहेत, दिलेल्याचं शोधायचा काय संबंध आहे त्याच्यात? नवीन नोंदी शोधल्यात त्यांच्या, ते वाटप करा. सरकारला काही साध्य झालं नाही. ते आले असते अन घुमून बघावं, सकारात्मक चर्चा करून बघावं, काहीतरी डोकं लावावं, हाताला काही लागलं नाही. आता हे निर्णायक आंदोलन हाताला लागून देत नसतो. मला मराठा समाजाची गरज आहे. या सगळ्या चर्चेतून उपोषण मोडीत काढण्याचा डाव होता का? असू शकतो. असा आरोप जरांगे पाटलांनी केलाय.
Published on: Aug 24, 2026 11:23 PM
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब

