Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
पुण्यातील छात्रोकी गुंज या कार्यक्रमादरम्यान एका विद्यार्थिनीने काँग्रेस नेते राहुल गांधींसमोर आदिवासी विद्यार्थ्यांच्या गंभीर समस्यांचा पाढा वाचला. मांजरी येथे सुरू असलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनासंदर्भात तिने राहुल गांधींना निवेदन दिले. या निवेदनामुळे आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले. विद्यार्थिनीने राहुल गांधींना सांगितले की, झोपेत असताना मन्यार सापाने दंश केल्याने तीन आदिवासी विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला […]
पुण्यातील छात्रोकी गुंज या कार्यक्रमादरम्यान एका विद्यार्थिनीने काँग्रेस नेते राहुल गांधींसमोर आदिवासी विद्यार्थ्यांच्या गंभीर समस्यांचा पाढा वाचला. मांजरी येथे सुरू असलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनासंदर्भात तिने राहुल गांधींना निवेदन दिले. या निवेदनामुळे आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले.
विद्यार्थिनीने राहुल गांधींना सांगितले की, झोपेत असताना मन्यार सापाने दंश केल्याने तीन आदिवासी विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, अन्य तीन विद्यार्थी अजूनही रुग्णालयात उपचार घेत आहेत. विद्यार्थिनीने मृत विद्यार्थ्यांच्या पालकांना किमान एक कोटी रुपयांची मदत देण्याची मागणी केली. तसेच, आदिवासी विद्यार्थ्यांना ३५ वर्षांपर्यंत वसतिगृहाची सोय उपलब्ध करून देण्याची विनंतीही तिने केली, जेणेकरून त्यांना शिक्षणाच्या संधी मिळतील. या गंभीर समस्या ऐकल्यानंतर राहुल गांधींनी विद्यार्थिनीला मदतीचे आश्वासन दिले.
Published on: Aug 24, 2026 10:40 PM
सोने-चांदीच्या आयातीवर तब्बल एवढे टक्के कर लागू होणार
मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाना यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं
कारगिल युद्ध आणि नाना पाटेकर; कारगिल युद्धावेळी 60 दिवस....
उद्धव ठाकरे-शिंदे वादावर सुप्रीम कोर्टात मोठी सुनावणी; शिंदे गटाच्या..

