आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखर, गूळ यानंतर आता कांदा आणि लसणाच्या दरामध्ये देखील वाढ झाली. कांद्याच्या दरामध्ये गेल्या आठ दिवसात दुपटीने वाढ झालेली आहे. तर आठ दिवसांपूर्वी 21 ते 25 रुपये किलोने मिळणारा कांदा आता 50 रुपये प्रति किलोच्या घरात पोहोचलाय. 120 रुपये किलोने मिळणारा लसूण आता 200 रुपये किलोपर्यंत पोहोचलेला आहे. कांद्याचे दर हे 15 दिवसापूर्वी साधारणता 20 […]
साखर, गूळ यानंतर आता कांदा आणि लसणाच्या दरामध्ये देखील वाढ झाली. कांद्याच्या दरामध्ये गेल्या आठ दिवसात दुपटीने वाढ झालेली आहे. तर आठ दिवसांपूर्वी 21 ते 25 रुपये किलोने मिळणारा कांदा आता 50 रुपये प्रति किलोच्या घरात पोहोचलाय. 120 रुपये किलोने मिळणारा लसूण आता 200 रुपये किलोपर्यंत पोहोचलेला आहे. कांद्याचे दर हे 15 दिवसापूर्वी साधारणता 20 रुपये 22 रुपये 25 रुपये पर्यंत मार्केट यार्डात मिळत होते. आता चालू मध्ये आजच्या हिशोब प्रमाण 45, 50, 52 रुपये असं कांद्याचा दर झालाय. 15 दिवसापूर्वी 100 रुपयाला 4 किलो मिळणारे कांदे आता 50 रुपयाला 1 किलो कांदे झालेत. त्यामुळे गिराईक पण थोडं कमी आहे आणि मार्केटला कांद्याची आवक पण कमी असल्यामुळे बाजारात भाव वाढलाय. लसणाचे दर पण हे एक 15 दिवसापूर्वी 100 रुपये, 120 रुपये किलो होते ते आता लसणाची आवक पण कमी असल्यामुळे 200 रुपये, 180 रुपये किलोपर्यंत लसणाचे दर आहेत.
Published on: Aug 24, 2026 11:34 PM
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब

