AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tukaram Mundhe-Roshan Jacob : सेम तुकाराम मुंढेंसारखं काम, कोण आहे प्रशासनात वेगळी ओळख, धाक निर्माण करणाऱ्या IAS डॉ. रोशन जेकब?

Tukaram Mundhe-Roshan Jacob : देशभरात सध्या ज्या प्रमाणे तुकाराम मुंढेंची चर्चा आहे, तशीच अजून एका महिला IAS अधिकारी सुद्धा चर्चेत आहे, डॉ. रोशन जेकब. कोण आहेत या रोशन जेकब? त्यांनी काय काम केलय? जाणून घ्या.

Tukaram Mundhe-Roshan Jacob : सेम तुकाराम मुंढेंसारखं काम, कोण आहे प्रशासनात वेगळी ओळख, धाक निर्माण करणाऱ्या IAS डॉ. रोशन जेकब?
Roshan Jacob-Tukaram Mundhe
| Updated on: Aug 25, 2026 | 7:29 AM
Share

महाराष्ट्रात ज्या प्रमाणे तुकाराम मुंढेंनी आपली वेगळी ओळख निर्माण केलीय, त्याप्रमाणे उत्तर प्रदेशात डॉ. रोशन जेकब यांनी आपला धाक निर्माण केला आहे. त्या उत्तर प्रदेश कॅडरच्या 2004 बॅचच्या IAS अधिकारी आहेत. त्यांची प्रशासकीय कामकाजाची पद्धत एकदम वेगळी आहे. त्यामुळे जनसामान्यांमध्ये त्यांची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. इंग्रजीत उच्च शिक्षण घेणाऱ्या डॉ. रोशन जेकब यांच्याकडे Phd ची पदवी आहे. तुकाराम मुंढे ज्या प्रमाणे आपल्या कठोर निर्णयांसाठी ओळखले जातात, त्या प्रमाणे जेकब सुद्धा आपले प्रशासकीय निर्णय आणि जनहिताच्या मुद्यावर सक्रियपणे काम करण्यासाठी ओळखल्या जातात.

केरळच्या तिरुअनंतपूरममध्ये डॉ. रोशन जेकब यांचा जन्म झाला. तिथेचं त्यांचं सुरुवातीचं शिक्षण झालं. डॉ. जेकब यांनी इंग्रजीतून BA, MA आणि Phd ची पदवी मिळवली. केरळमध्ये त्यांचा जन्म झाला. पण उत्तर प्रदेशात एक IAS अधिकारी म्हणून काम करणं त्यांच्यासाठी आव्हानात्मक होतं. सुरुवातीला त्यांना इंग्रजी बोलण्यात अडचणी आल्या. सुरुवातीला खाणकाम विभागाच्या संचालिका म्हणून त्यांना जबाबदारी मिळाली होती. बेकायद खाणकाम रोखून कायदेशीर खाणकामाला प्रोत्साहन देण्याची त्यांच्यावर जबाबदारी होती.

त्यामुळे त्या जास्त प्रसिद्धीच्या झोतात आल्या

IAS अधिकारी बनल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग बरेलीमध्ये जॉइंट मॅजिस्ट्रेट म्हणून झालेली. त्यानंतर कानपूर नगर, मेरठ आणि अन्य जिल्ह्यात प्रशासकीय जबाबदाऱ्या सांभाळल्या. अनेक जिल्ह्यात त्यांनी डिस्ट्रीक्ट मॅजिस्ट्रेट म्हणूनही काम केलं. 2017 साली उत्तर प्रदेश खाणकाम विभागाच्या संचालिका बनणाऱ्या त्या पहिल्या महिला IAS ठरल्या. दीर्घकाळ त्यांनी लखनऊच्या डिवीजनल कमिशनर म्हणून काम केलं. मायनिंग विभागाच्या त्या संचालिका होत्याच. पण डिवीजनल कमिशनर म्हणून त्यांच्याकडे अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आली होती. सप्टेंबर 2025 पर्यत त्या या पदावर होत्या. नंतर त्यांची बदली फूड सेफ्टी अँड ड्रग एडमिनिस्ट्रेशन खात्यात कमिशनर म्हणून झाली. कोविड-19 च्या काळात प्रशासकीय अधिकारी म्हणून त्यांनी आपल्या कामाची एक वेगळी छाप उमटवली. त्यामुळे त्या जास्त प्रसिद्धीच्या झोतात आल्या.

वेगवेगळ्या कॅडरचे अधिकारी

तुकाराम मुढे आणि डॉ. रोशन जेकब वेगवेगळ्या कॅडरचे अधिकारी आहेत. पण दोघेही आपल्या प्रशासकीय कामकाजाच्या पद्धतीसाठी ओळखले जातात. दोघांच्या कामकाजाची जी पद्धत आहे, त्यामुळे UPSC च्या उमेदवारांसमोर दोघेही चांगले आदर्श आहेत. पारदर्शकतेला दोन्ही अधिकाऱ्यांचं पहिलं प्राधान्य आहे.

Follow Us
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाई...
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाईमुळे नातेवाईकांची तीव्र नाराजी