AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एक डील झाली अन् या कंपनीचा शेअर थेट रॉकेट, किमतीत तब्बल 20 टक्क्यांनी वाढ; काय कमाल झाली?

सोमवारी शेअर बाजाराचे सत्र संपले तेव्हा ज्युपिटर वॅगन्स या कंपनीचा शेअर 185.45 रुपयांवर बंद झाला होता. बुधवारी बाजार सुरू होताच तो 192 रुपयांवर पोहोचला. त्यानंतर या शेअरची खरेदी अचानक वाढली आणि शेअरने 20 टक्क्यांचे अप्पर सर्किट गाठले.

एक डील झाली अन् या कंपनीचा शेअर थेट रॉकेट, किमतीत तब्बल 20 टक्क्यांनी वाढ; काय कमाल झाली?
share price hikeImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 25, 2026 | 9:29 PM
Share

Share Market : शेअर बाजारात बुधवारी तेजीचे वातावरण पाहायला मिळाले. सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही प्रमुख निर्देशांकांनी जोरदार वाढ नोंदवली. याच तेजीचा फायदा रेल्वे क्षेत्रातील ज्युपिटर वॅगन्स (Jupiter Wagons) या कंपनीच्या शेअरला झाला. गेल्या काही काळापासून घसरणीचा सामना करणाऱ्या या शेअरने मोठी उसळी घेत 20 टक्क्यांचे अप्पर सर्किट गाठले. कंपनीने दक्षिण कोरियातील एका कंपनीसोबत केलेल्या महत्त्वपूर्ण करारामुळे गुंतवणूकदारांचे लक्ष या शेअरकडे वेधले गेले.

एका डीलमुळे शेअरचा भाव थेट…

तसं पाहायचं झालं तर सोमवारी शेअर बाजाराचे सत्र संपले तेव्हा ज्युपिटर वॅगन्स या कंपनीचा शेअर 185.45 रुपयांवर बंद झाला होता. बुधवारी बाजार सुरू होताच तो 192 रुपयांवर पोहोचला. त्यानंतर या शेअरची खरेदी अचानक वाढली आणि शेअरने 20 टक्क्यांचे अप्पर सर्किट गाठले. याचाच परिणाम म्हणून शेअरचे मूल्य थेट 222.46 रुपयांपर्यंत पोहोचले. या तेजीमुळे कंपनीचे बाजार भांडवलदेखील वाढले. सध्या या कंपनीचे बाजार भांडवल 7,920 कोटी रुपये झाले आहे. या शेअरचा 52 आठवड्यांचा सार्वकालिक उच्चांक 358.25 रुपये आहे.

नेमकी डील काय झाली?

सध्या या कंपनीच्या शेअरचे मूल्य खूपच वाढले आहे. या तेजीमागे कंपनीने दक्षिण कोरियातील वूजिन इंडस्ट्रियल सिस्टम्स लिमिटेडसोबत झालेली एक डील आहे. या डीलनुसार Jupiter Wagons Share ही कंपनी दक्षिण कोरियाच्या व्हिजून इंडस्ट्रियल सिस्टम्स लिमिटेड या कंपनीसोबत संयुक्तपणे काम करणार आहे. या भागीदारीत ज्युपिटर वॅगन्सचा 80 टक्के हिस्सा असेल. या माध्यमातून भारतात मेट्रोचे संपूर्ण डबे तयार करण्यासोबतच प्रोपल्शन सिस्टम, ट्रेन कंट्रोल मॅनेजमेंट सिस्टम, ऑटोमॅटिक डोअर सिस्टम आणि बोगी यांसारख्या महत्त्वाच्या सुट्या भागांची निर्मिती केली जाणार आहे. त्यामुळेच या कंपनीच्या शेअरमध्ये सध्या तेजी आलेली आहे.

(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)

Follow Us
माटुंग्यात ज्वेलर्सवर अंदाधुंद गोळीबार! 5 ते 6 राऊंड फायरिंगने परिसरात
माटुंग्यात ज्वेलर्सवर अंदाधुंद गोळीबार! 5 ते 6 राऊंड फायरिंगने परिसरात खळबळ
पुण्यात कोर्टाबाहेर मंदार किवळेंवर गोळीबार अन् कोयत्याने वार; दौंड...
पुण्यात कोर्टाबाहेर मंदार किवळेंवर गोळीबार अन् कोयत्याने वार; दौंडमधून 5 आरोपी जेरबंद!
डोंबिवलीत रिक्षाचालकांची मनमानी? कोणतीही परवानगी न घेता 5 रुपयांची...
डोंबिवलीत रिक्षाचालकांची मनमानी? कोणतीही परवानगी न घेता 5 रुपयांची भाडेवाढ, प्रवासी संतप्त!
शक्तीपीठ प्रकल्पाच्या मोजणीला शेतकऱ्यांचा जोरदार विरोध; नेवरीत आंदोलन
शक्तीपीठ प्रकल्पाच्या मोजणीला शेतकऱ्यांचा जोरदार विरोध; नेवरीत आंदोलन, अनेकांना पोलिसांनी घेतले ताब्यात
पुणे कोर्ट हल्ला प्रकरणी बावनकुळे आक्रमक; म्हणाले, आरोपींना शोधून...
पुणे कोर्ट हल्ला प्रकरणी बावनकुळे आक्रमक; म्हणाले, आरोपींना शोधून काढणार, कोणालाही सोडणार नाही!'
नाना नानी पार्कच्या वृक्षतोडीविरोधात आदित्य ठाकरे मैदानात; आंदोलनाला..
नाना नानी पार्कच्या वृक्षतोडीविरोधात आदित्य ठाकरे मैदानात; आंदोलनाला दिला पाठिंबा!
परभणीच्या ब्राह्मणगावात पाण्यासाठी वणवण! 3,500 ग्रामस्थांची भिस्त...
परभणीच्या ब्राह्मणगावात पाण्यासाठी वणवण! 3,500 ग्रामस्थांची भिस्त एकाच विहिरीवर
शिवसेना शिंदे गटात मोठ्या हालचाली! आरोप-प्रत्यारोपांनंतर थेट...
शिवसेना शिंदे गटात मोठ्या हालचाली! आरोप-प्रत्यारोपांनंतर थेट तालुकाप्रमुखांची पक्षातून हलाकपट्टी, नेमकी भानगड काय?
पवार कुटुंबावर लक्ष्मण हाके बरसले; रोहित पवारांच्या शेतकरी मोर्चाला...
पवार कुटुंबावर लक्ष्मण हाके बरसले; रोहित पवारांच्या शेतकरी मोर्चाला म्हणाले 'ढोंगीपणा'!
50 लाखांच्या रोकडीनं राजकारणात खळबळ! शिंदे गटातील नेत्याचा व्हिडीओ...
50 लाखांच्या रोकडीनं राजकारणात खळबळ! शिंदे गटातील नेत्याच्या व्हिडिओमुळे मनसे आक्रमक, चार ठिकाणी तक्रार