AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ravi Kishan : हा कुटुंबाचं नाव खराब करेल, याला मारूनच…प्रसिद्ध अभिनेत्याचा वडिलांबद्दल धक्कादायक खुलासा

Ravi Kishan : अभिनेता रवी किशन आज प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहे. मात्र, अभिनेत्यानं नोकरी करावी अशी त्याच्या वडिलांची इच्छा होती. याबद्दल अभिनेत्यानं नुकत्याच एका कार्यक्रमात सांगितलं आहे.

Ravi Kishan : हा कुटुंबाचं नाव खराब करेल, याला मारूनच...प्रसिद्ध अभिनेत्याचा वडिलांबद्दल धक्कादायक खुलासा
| Updated on: Nov 25, 2026 | 9:17 PM
Share

भोजपुरी आणि हिंदी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेते रवी किशन यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. आपल्या दमदार अभिनयानं त्यांनी चित्रपटसृष्टीत स्वतःची ओळख निर्माण केली. मात्र, इथपर्यंत पोहोचण्याचा त्यांचा प्रवास अजिबात सोपा नव्हता. अभिनय आणि नृत्याची आवड जोपासत असताना त्यांना स्वतःच्या कुटुंबाचाच विरोध सहन करावा लागला होता. नुकत्याच ‘कॉफी विथ करण’ या लोकप्रिय टॉक शोच्या नव्या सीझनमध्ये रवी किशन यांनी त्यांच्या आयुष्यातील एका धक्कादायक प्रसंगाचा खुलासा केला.

करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ सीझन 9 मध्ये अभिनेता अक्षय कुमार आणि रवी किशन यांनी हजेरी लावली होती. यावेळी गप्पा मारताना रवी किशन यांनी त्यांच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. अभिनय क्षेत्रात येण्याच्या त्यांच्या निर्णयाला वडिलांचा तीव्र विरोध होता. इतकंच नव्हे तर एकदा वडिलांनी त्यांना बेदम मारहाण केल्याचंही त्यांनी सांगितलं.

रवी किशन यांचे वडील पुजारी होते. याशिवाय त्यांचा दुधाचा व्यवसायही होता. त्यामुळे रवी यांनीही हाच व्यवसाय पुढे चालवावा किंवा सरकारी नोकरी करावी, अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. मात्र, रवी यांना अभिनय आणि नृत्याची आवड होती. या आवडीपोटी त्यांनी घरच्यांच्या इच्छेविरुद्ध थिएटरमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती. एकदा तर ते रामलीलेमध्ये साडी नेसून अभिनय करण्यासाठी गेले होते. ही गोष्ट समजल्यानंतर त्यांच्या वडिलांचा राग अनावर झाला आणि त्यांनी रवी यांना खूप मारहाण केली. ‘माझे वडील माझ्या अभिनय आणि नृत्य करण्याच्या पूर्णपणे विरोधात होते. मी रामलीलेत साडी नेसून गेलो होतो, तेव्हा त्यांनी मला बेदम मारलं होतं’, अशी आठवण रवी यांनी सांगितली.

यावेळी रवी किशन यांनी वडिलांनी रागाच्या भरात केलेल्या एका वक्तव्याचाही उल्लेख केला. त्या काळात चित्रपटसृष्टीत काम करणं त्यांच्या कुटुंबात चांगलं मानलं जात नव्हतं. त्यामुळे त्यांच्या वडिलांना रवी यांचा अभिनय क्षेत्रातील निर्णय अजिबात पसंत नव्हता. रवी यांनी सांगितलं की, त्यांचे वडील रागाच्या भरात म्हणायचे, ‘हा मुलगा कुटुंबाचं नाव खराब करेल, याला मारूनच टाकूया.’ वडिलांच्या या विरोधामुळे त्यांच्यासाठी परिस्थिती अधिकच कठीण झाली होती.

आईने दिली साथ, घर सोडून मुंबई गाठली

वडिलांचा सततचा विरोध आणि मारहाण यामुळे रवी किशन यांनी अखेर घर सोडण्याचा निर्णय घेतला. या कठीण काळात त्यांच्या आईनं त्यांना साथ दिली. घर सोडण्यासाठी आईनेच त्यांना मदत केली होती. त्यानंतर अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी रवी किशन मुंबईत आले. आपल्या संघर्षमय प्रवासाबद्दल बोलताना रवी किशन भावुक झाले. ‘लोक आयुष्यात चालत पुढे जातात, पण मी रांगत रांगत इथपर्यंत पोहोचलो आहे’, असं त्यांनी म्हटलं.

Follow Us
पुण्यात कोर्टाबाहेर मंदार किवळेंवर गोळीबार अन् कोयत्याने वार; दौंड...
पुण्यात कोर्टाबाहेर मंदार किवळेंवर गोळीबार अन् कोयत्याने वार; दौंडमधून 5 आरोपी जेरबंद!
डोंबिवलीत रिक्षाचालकांची मनमानी? कोणतीही परवानगी न घेता 5 रुपयांची...
डोंबिवलीत रिक्षाचालकांची मनमानी? कोणतीही परवानगी न घेता 5 रुपयांची भाडेवाढ, प्रवासी संतप्त!
शक्तीपीठ प्रकल्पाच्या मोजणीला शेतकऱ्यांचा जोरदार विरोध; नेवरीत आंदोलन
शक्तीपीठ प्रकल्पाच्या मोजणीला शेतकऱ्यांचा जोरदार विरोध; नेवरीत आंदोलन, अनेकांना पोलिसांनी घेतले ताब्यात
पुणे कोर्ट हल्ला प्रकरणी बावनकुळे आक्रमक; म्हणाले, आरोपींना शोधून...
पुणे कोर्ट हल्ला प्रकरणी बावनकुळे आक्रमक; म्हणाले, आरोपींना शोधून काढणार, कोणालाही सोडणार नाही!'
नाना नानी पार्कच्या वृक्षतोडीविरोधात आदित्य ठाकरे मैदानात; आंदोलनाला..
नाना नानी पार्कच्या वृक्षतोडीविरोधात आदित्य ठाकरे मैदानात; आंदोलनाला दिला पाठिंबा!
परभणीच्या ब्राह्मणगावात पाण्यासाठी वणवण! 3,500 ग्रामस्थांची भिस्त...
परभणीच्या ब्राह्मणगावात पाण्यासाठी वणवण! 3,500 ग्रामस्थांची भिस्त एकाच विहिरीवर
शिवसेना शिंदे गटात मोठ्या हालचाली! आरोप-प्रत्यारोपांनंतर थेट...
शिवसेना शिंदे गटात मोठ्या हालचाली! आरोप-प्रत्यारोपांनंतर थेट तालुकाप्रमुखांची पक्षातून हलाकपट्टी, नेमकी भानगड काय?
पवार कुटुंबावर लक्ष्मण हाके बरसले; रोहित पवारांच्या शेतकरी मोर्चाला...
पवार कुटुंबावर लक्ष्मण हाके बरसले; रोहित पवारांच्या शेतकरी मोर्चाला म्हणाले 'ढोंगीपणा'!
50 लाखांच्या रोकडीनं राजकारणात खळबळ! शिंदे गटातील नेत्याचा व्हिडीओ...
50 लाखांच्या रोकडीनं राजकारणात खळबळ! शिंदे गटातील नेत्याच्या व्हिडिओमुळे मनसे आक्रमक, चार ठिकाणी तक्रार
शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला बदलला असता? सिब्बल यांचा युक्तिवाद काय
शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला बदलला असता? कपिल सिब्बल यांचा कोर्टात मोठा युक्तिवाद!