AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Big Breaking | एकही खासदार कुठंही जाणार नाही, कारण... शिंदे सेनेतील नेत्याने सांगितलं गुपित

Big Breaking | एकही खासदार कुठंही जाणार नाही, कारण… शिंदे सेनेतील नेत्याने सांगितलं गुपित

| Updated on: Jun 20, 2026 | 4:05 PM
Share

शिवसेना शिंदे गटातील राजकीय हालचालींना पुन्हा वेग आला असून पक्षातील वरिष्ठ सूत्रांनी मोठा दावा केला आहे. ठाकरे गटातील काही खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चांना आता आणखी बळ मिळालं आहे.

शिवसेना शिंदे गटातील राजकीय हालचालींना पुन्हा वेग आला असून पक्षातील वरिष्ठ सूत्रांनी मोठा दावा केला आहे. ठाकरे गटातील काही खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चांना आता आणखी बळ मिळालं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, “एकही खासदार कुठंही जाणार नाही,” असा स्पष्ट संदेश शिंदे गटाकडून देण्यात आला आहे. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या राजकीय चर्चांमध्ये नवीन वळण आलं आहे.

याचबरोबर, “राजकारणात कमिटमेन्ट महत्त्वाची असते,” असंही वरिष्ठ नेत्यांनी सांगितल्याची माहिती समोर आली आहे. पक्षातील अंतर्गत चर्चा आणि आगामी रणनीती यावर गेल्या काही दिवसांपासून बैठका सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. सूत्रांनी दावा केला की, “सहा खासदार आमच्यासोबत असून उद्या या संदर्भात पूर्णपणे माहिती समोर येईल.” त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, “सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असून लवकरच निर्णय जाहीर केला जाणार,” अशी माहितीही सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष उद्याच्या घडामोडींवर लागले आहे.

Published on: Jun 20, 2026 04:05 PM

Follow Us