CSK vs MI Live Score Updates, IPL 2026 : चेन्नई सुपर किंग्सने 8 विकेट राखून मुंबईला नमवलं, प्लेऑफचं स्वप्न भंगलं?
Chennai Super Kings vs Mumbai Indians Indian Premier League 2026 Live Score Updates: चेपॉक स्टेडियममध्ये मुंबई इंडियन्सला विजयाने साथ दिली नाही. मुंबई इंडियन्सला सातव्या पराभवाला सामोरं जावं लागलं. चेन्नई सुपर किंग्सने 2 गडी गमवून दिलेलं आव्हान गाठलं.

आयपीएल 2026 स्पर्धेत मुंबई इंडियन्सची हाराकिरी सुरूच आहे. चेन्नई सुपर किंग्सने 2 मे रोजी मुंबई इंडिटन्सवर दणदणीत विजय मिळवला. चेन्नई सुपर किग्सने एमए चिदंबरम स्टेडियममध्ये पहिले बॅटिंग करणाऱ्या मुंबई इंडियन्सला 20 ओव्हरमध्ये 7 झटके देऊन 159 धावांवर रोखलं. त्यामुळे चेन्नईला 160 धावांचं आव्हान मिळालं. चेन्नईने हे विजयी आव्हान 18.1 षटकात 2 विकेट्स गमावून सहज पूर्ण केलं. चेन्नईचा हा एकूण चौथा तर मुंबई विरुद्धचा दुसरा विजय ठरला. तर दुसऱ्या बाजूला या पराभवामुळे मुंबई इंडियन्सचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे.
LIVE Cricket Score & Updates
-
CSK vs MI Live Score Updates, IPL 2026 : मुंबई इंडियन्सचा पुन्हा पराभव, चेन्नईने 8 गडी राखून जिंकला सामना
चेन्नई सुपर किंग्सने 8 गडी राखून मुंबई इंडियन्सला पराभवाचं पाणी पाजलं आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्सने 159 धावांंचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान चेन्नई सुपर किंग्सने 2 गडी गमवून पूर्ण केलं. या पराभवासह मुंबई इंडियन्सचं प्लेऑफचं स्वप्न जवळपास भंगलं आहे.
-
CSK vs MI Live Score Updates : कॅप्टन ऋतुराज गायकवाडचं अर्धशतक, चेन्नई विजयाच्या दिशेने
चेन्नईचा कॅप्टन ऋतुराज गायकवाड याने 160 धावांचा पाठलाग करताना अर्धशतत झळकावलं आहेे. ऋतुराजने 34 बॉलमध्ये अर्धशतक केलं. यासह चेन्नई विजयाच्या आणखी जवळ पोहचली आहे.
-
-
CSK vs MI Live Score Updates : अल्लाहकडून उर्विलचा गेम, चेन्नईला दुसरा धक्का
चेन्नईने संजू सॅमसन याच्या रुपात पहिली विकेट गमावली. त्यानंतर कॅप्टन ऋतुराज गायकवाड आणि उर्विल पटेल या जोडीने चेन्नईला मस्त सुरुवात करुन दिली आहे. या दोघांनी चेन्नईला 5.3 ओव्हरमध्ये 62 धावांपर्यंत पोहचवलं. मात्र अल्लाहने पुढील चेंडूवर उर्विलला बोल्ड केलं. उर्विलने 12 बॉलमध्ये 24 धावा केल्या.
-
CSK vs MI Live Score Updates : बुमराहकडून मोठी शिकार, संजू सॅमसन आऊट, चेन्नईला पहिला झटका
जसप्रीत बुमराह याने चेन्नईला पहिलाच आणि मोठा झटका दिला आहे. बुमराहने चेन्नईला त्यांच्या डावातील दुसऱ्या ओव्हरमध्ये संजू सॅमसन याला आऊट केलं. संजूने 11 धावा केल्या.
-
CSK vs MI Live Score Updates : चेन्नईच्या बॅटिंगला सुरुवात, संजू-ऋतुराज मैदानात, 160 धावांचं आव्हान, मुंबई रोखणार?
चेन्नई सुपर किंग्सच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. चेन्नईकडून संजू सॅमसन आणि कॅप्टन ऋतुराज मैदानात आली आहे. मुंबईने चेन्नईसमोर 160 धावांचं आव्हान ठेवलं आहे.
-
-
CSK vs MI Live Score Updates : चेन्नईसमोर 160 धावांचं आव्हान, मुंबई रोखणार?
मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्ससमोर 160 धावांचं आव्हान ठेवलं आहे. मुंबईने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 159 धावा केल्या. मुंबईसाठी नमन धीर याने सर्वाधिक 57 धावा केल्या. आता मुंबईचे गोलंदाज आता 159 धावांचा बचाव करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
-
CSK vs MI Live Score Updates : रॉबिन मिंझ बोल्ड, मुंबई अडचणीत
मुंबई इंडियन्सने रॉबिन मिंझ याच्या रुपात सहावी विकेट गमावली आहे. रॉबिनला मुंबई अडचणीत असताना निर्णायक खेळी करण्याची संधी होती. मात्र रॉबिनने 5 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला.
-
CSK vs MI Live Score Updates : नमन धीर आऊट, आता कॅप्टन हार्दिकवर मदार
चेन्नईने मुंबईला पाचवा झटका देत सेट बॅट्समन नमन धीर याला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला आहे. नमन धीर फटकेबाजी करत असल्याने मुंबईला मोठ्या धावसंख्येची आशा होती. मात्र चेन्नईने निर्णायक क्षणी नमनला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. जेमी ओव्हरटनने नमनला सर्फराज खान याच्या हाती कॅच आऊट केलं. नमनने 37 बॉलमध्ये 57 रन्स केल्या.
-
CSK vs MI Live Score Updates : तिलक वर्माही माघारी, पलटण अडचणीत
चेन्नईने मुंबईला चौथा झटका दिला आहे. चेन्नईने मुंबईच्या प्रमुख फलंदाजापैकी एक असलेल्या तिलक वर्मा याला आऊट केलं आहे. नूर अहमद याने कॅप्टन ऋतुराज गायकवाड याच्या हाती तिलक वर्मा याला कॅच आऊट केलं. तिलकने 5 धावा केल्या.
-
CSK vs MI Live Score Updates : सूर्यकुमार यादव आऊट, मुंबईला तिसरा धक्का
रामकृष्ण घोष याने सूर्यकुमार यादव याला डेवाल्ड ब्रेव्हीस याच्या हाती कॅच आऊट करत मुंबईला तिसरा झटका दिला आहे. सूर्याने बॉलमध्ये 12 बॉलमध्ये 21 रन्स केल्या. सूर्याला चांगली सुरुवात मिळाली होती. मात्र सूर्या मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला.
-
CSK vs MI Live Score Updates : मुंबईला दुसरा धक्का, रायन रिकेल्टन आऊट
चेन्नईने मुंबईला दुसरा झटका देत सेट नमन धीर आणि रायन रिकेल्टन ही जोडी फोडली आहे. नूर अहमद याने सातव्या ओव्हरमधील चौथ्या बॉलवर रायन रिकेल्टन याला उर्विल पटेल याच्या हाती कॅच आऊट केलं. रायनने 24 बॉलमध्ये 37 धावा केल्या.
-
CSK vs MI Live Score Updates : नमन धीर-रायन रिकेल्टनची फटकेबाजी, दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी
मुंबईने विल जॅक्स याच्या रुपात 1 धावेवर पहिली विकेट गमावली. त्यानंतर नमन धीर आणि रायन रिकेल्टन या जोडीने कमाल केली. रायन आणि नमनने फटकेबाजी करत दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली आहे. या दोघांनी 6 ओव्हरमध्ये मुंबईला 57 धावांपर्यंत पोहचवलं.
-
CSK vs MI Live Score Updates : मुंबईला पहिला झटका, विल जॅक्स आऊट
चेन्नईने मुंबईला आठव्या बॉलवरच पहिला झटका दिला आहे. अंशुल कंबोज याने मुंबईला डावातील दुसऱ्या ओव्हरमधील दुसऱ्या बॉलवर विल जॅक्स याला आऊट केलं. विलने 1 धाव करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला.
-
CSK vs MI Live Score Updates : सामन्याला सुरुवात, मुंबईची बॅटिंग, विल जॅक्स-रायन रिकेल्टन मैदानात
मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामन्याला सुरुवात झाली आहे. मुंबईने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईकडून विल जॅक्स-रायन रिकेल्टन सलामी जोडी मैदानात आली आहे.
-
CSK vs MI Live Updates : चेन्नई सुपर किंग्स प्लेइंग ईलेव्हन
चेन्नई सुपर किंग्स प्लेइंग ईलेव्हन : संजू सॅमसन (विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड (कॅप्टन), उर्विल पटेल, डेवाल्ड ब्रेव्हीस, शिवम दुबे, जेमी ओव्हरटन, रामकृष्ण घोष, प्रशांत वीर, नूर अहमद, अंशुल कंबोज आणि मुकेश चौधरी.
-
CSK vs MI Live Updates : मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन
मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन : विल जॅक्स, रायन रिकेल्टन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, नमन धीर, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कॅप्टन), रॉबिन मिंझ, ट्रेंट बोल्ट, क्रिश भगत आणि जसप्रीत बुमराह, अल्लाह गझनफर.
-
CSK vs MI Live Updates : मुंबईने टॉस जिंकला, चेन्नई विरुद्ध बॅटिंग
मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध टॉस जिंकला आहे. मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्या याने चेन्नई विरुद्ध बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबई आता किती धावा करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
-
CSK vs MI Live Updates : मुंबई इंडियन्स टीम
मुंबई इंडियन्स टीम : विल जॅक्स, रायन रिकेल्टन (विकेटीपर), सूर्यकुमार यादव, नमन धीर, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कॅप्टन), रॉबिन मिन्झ, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह, एएम गझनफर, अश्वनी कुमार, शार्दुल ठाकूर, मयंक रावत, रघु शर्मा, क्रिश भगत, राज बावा, रोहित शर्मा, दीपक चहर, क्विंटन डी कॉक, कॉर्बिन बॉश, केशव महाराज, शेरफेन रदरफोर्ड, मयंक मार्कंडे, दानिश मालेवार आणि मोहम्मद सलाहुद्दीन इझार.
-
CSK vs MI Live Updates : चेन्नई सुपर किंग्स टीम
चेन्नई सुपर किंग्स टीम : संजू सॅमसन(विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड(कर्णधार), उर्विल पटेल, सर्फराज खान, डेवाल्ड ब्रेव्हीस, शिवम दुबे, कार्तिक शर्मा, जेमी ओव्हरटन, अकेल होसेन, नूर अहमद, अंशुल कंबोज, गुरजपनीत सिंग, मुकेश चौधरी, प्रशांत वीर, रामकृष्ण घोष, मॅथ्यू शॉर्ट, महेंद्रसिंह धोनी, मॅट हेन्री, स्पेन्सर जॉन्सन, झकरी फॉल्केस, श्रेयस गोपाल, राहुल चहर, आकाश मधवाल आणि अमन खान.
-
CSK vs MI Live Updates : चेन्नई विरुद्ध मुंबई हायव्होल्टेज सामना, कोण जिंकणार?
चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स आमनेसामने आहेत. चेपॉक स्टेडियममध्ये उभयसंघातील सामन्याचा थरार रंगणार आहे. मुंबई आणि चेन्नई दोन्ही संघांचा नववा सामना आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 7 वाजता टॉस होणार आहे.
Published On - May 02,2026 6:30 PM
