IND vs NZ: अर्शदीपवर भारी पडला 25 वर्षांचा बॉलर, मैदानावर टाकला खतरनाक स्पेल, सगळे पाहतच राहिले
IND vs NZ ODI Match: भारत न्यूझीलंड यांच्यात वनडे मालिकेतील पहिला सामना सुरु आहे. या सामन्यात अर्शदीप सिंगने चांगली कामगिरी केली पण २५ वर्षीय गोलंदाजाने मैदान गाजवलं.

IND vs NZ ODI : भारत न्यूझीलंड वनडे सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला वनडे सामना सुरु असून याा सामन्यात भारतीय संघाने प्रथम गोलंदाजी केली. भारताकडून आज अर्शदीप सिंगने उल्लेखनीय कामगिरी केली. त्याने सर्वाधिक विकेट काढल्या. यानंचतर त्यानं एक सेलिब्रेशनही केलं जे गर्लफ्रेंडसाठी होते असे सांगितले. पण अर्शदीपवर २५ वर्षांचा पोरगा भारी पडला आहे.
टीम इंडियाचा २५ वर्षीय वेगवान गोलंदाज अंशुल कंबोजने न्यूझीलंडविरुद्ध ऑकलंड येथे झालेल्या एकदिवसीय सामन्यात शानदार कामगिरी केली. त्याने १० षटकांच्या स्पेलमध्ये केवळ २२ धावा देऊन दोन बळी घेतले. अंशुलच्या अचूक गोलंदाजीमुळे किवी संघ घरच्या मैदानावर २०० धावा सुद्धा करू शकला नाही. यासह, अंशुल गेल्या १० वर्षांतील एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताकडून टाकण्यात आलेला सर्वात किफायतशीर गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी टीम इंडियाचा महान खेळाडू जसप्रीत बुमराहने २०१६ मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध २.२ च्या इकॉनॉमी रेटने गोलंदाजी केली होती. अशाप्रकारे, १० वर्षांनंतर अंशुलने बुमराहच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.
Arshdeep Singh said, “The celebration was for my girlfriend, a little bit dance we do.”
#NZvIND https://t.co/td6ZPeshdj
— SportsGully Cricket 🏏 (@sportsgullycric) November 4, 2026
इतकेच नाही, तर अंशुल न्यूझीलंडच्या भूमीवर गोलंदाजी करणारा चौथा सर्वात किफायतशीर भारतीय गोलंदाज ठरला आहे. घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियासाठी सर्वोत्तम गोलंदाजीचा विक्रम माजी महान वेगवान गोलंदाज जवागल श्रीनाथ यांच्या नावावर आहे. श्रीनाथने २००३ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध केवळ १.३ च्या इकॉनॉमी रेटने गोलंदाजी केली. या यादीत १.६ च्या इकॉनॉमी रेटसह आशिष नेहरा दुसऱ्या क्रमांकावर आहे. १९९४ मध्ये १.८ च्या इकॉनॉमी रेटने गोलंदाजी करणारे कपिल देव तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
भारताविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडने ४०.२ षटकांत १८५ धावा केल्या. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या किवी संघाच्या नियमित अंतराने विकेट्स पडल्या. न्यूझीलंडकडून टीम सेफर्टने सर्वाधिक ३८ धावा केल्या. ब्लेअर टिकनरनेही ३४ धावांचे योगदान दिले, तर ग्लेन फिलिप्सनेही ३० धावा केल्या.
गोलंदाजीमध्ये, अर्शदीप सिंगने अंशुल कंबोजसोबत मिळून सर्वाधिक चार बळी घेतले. मात्र, त्याने खूप धावा देखील दिल्या. अर्शदीपने आपल्या चार बळींसाठी १० षटकांत ७० धावा दिल्या. गुरनूर ब्रारनेही ९.२ षटकांत ४४ धावा देऊन ३ बळी घेतले.
