सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना मोठा दणका, थेट तूप आणि बटरच्या किंमती गगणाला, मोठी वाढ..
ऐन सणासुदीच्या तोंडावर ग्राहकांना मोठा धक्का अमूलने दिला. अमूलने आपल्या उत्पादनाच्या किंमतीमध्ये मोठी वाढ केली. तूप आणि बटरच्या किंमतीमध्ये अमूलने मोठी वाढ केली. ही वाढ करण्यामागे काही कारणेही असल्याचे अमूलने स्पष्ट केले.

दिवाळी सण तोंडावर असताना महागाईचा मोठा झटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. दिवाळीमध्ये गोडधोड तयार करण्यासाठी तूप आणि बटर जास्त लागते. शिवाय घरी पाहुणे मंडळी येतात, त्यांनीही चमचमीत खाऊ घालण्यासाठी तूप, बटर अशा गोष्टी मोठ्या प्रमाणात लागतात. त्यातच आता अमूलने सणावाराच्या पार्श्वभूमीवर थेट किंमतीमध्ये मोठी वाढ केली. अमूल तूप आणि बटर खरेदी करणाऱ्या ग्राहकांना कंपनीने मोठा दणका दिला. थेट 50 रूपयांनी त्यांनी वाढ केली. 500 ग्रॅम बटर पॅक थेट 15 रूपयांनी महाग केला. थेट 15 रूपयांनी याची किंमत वाढवली. जवळपास वस्तूंवरील किंमत अमूलने वाढवली. अमूलने तूप आणि बटरवरील किंमतीत वाढ केली. 1 किलोचा तूपाचा डब्बा आता 680 रूपयांना मिळेल. जो आधी 630 रूपयांना मिळायचा. आता हा पॅक खरेदी करण्यासाठी ग्राहकांना अधिकचे 50 रूपये मोजावी लागणार आहेत.
500 ग्रॅमच्या तूपाच्या पाकिटाची 325 हून 345 किंमत वाढवण्यात आली. बटरचे पॅकेट 63 हून 66 वाढवण्यात आले. 500 ग्रॅमचे पॅक 310 हून 325 करण्यात आले. हेच नाही तर अमूलने गायीचे तूप 740 प्रती लीटर हून 710 केला. म्हशीचे तूप 700 हून 720 करण्यात आले. गुजरात आणि राजस्थानमध्ये भेसळीखोरी विरोधात जोरदार कारवाई केली जात आहे.
त्याच पार्श्वभूमीवर हवे तेवढ्या प्रमाणात पुरवठा होत नाही. त्यामुळे कंपनीने किंमती वाढवल्याचे सांगितले जात आहे. राज्यातही तुकाराम मुंढे यांनी एफडीएचा कारभार आपल्या हातात घेतल्यापासून भेसळखोरांविरोधात मोठी कारवाई केली जात आहे. या कारवाईमुळे पुरवठा हवा तसा होत नसल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.
शिवाय सणाच्या तोंडावर तूप आणि बटरची मागणीही खूप जास्त असते. जवळपास गोड पदार्थ तयार करण्यासाठी तूपाची आवश्यकता असते. लोकांकडून मोठ्या प्रमाणात खरेदी केली जात आहे. त्यातच अमूलने ग्राहकांना धक्का दिला. अमूलचे बटर आणि तूपच्या किंमतीमध्ये मोठी वाढ केली. अमूलसोबतच इतरही कंपन्या किंमतीमध्ये वाढ करण्याची शक्यता आहे. मात्र, ऐन दिवाळीत हा ग्राहकांसाठी मोठा झटका म्हणावा लागेल.
