AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Odi Cricket : वर्ल्ड कपवर बहिष्कार टाकल्यानंतर बांगलादेश वनडे सीरिजसाठी सज्ज, टीम जाहीर, पहिला सामना कधी?

Bangldesh Squad For Odi Series : बांगलादेश क्रिकेट टीम आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेनंतर मायदेशात एकदिवसीय मालिका खेळणार आहे. यजमान संघासमोर कुणाचं आव्हान असणार? जाणून घ्या.

Odi Cricket : वर्ल्ड कपवर बहिष्कार टाकल्यानंतर बांगलादेश वनडे सीरिजसाठी सज्ज, टीम जाहीर, पहिला सामना कधी?
Jasprit Bumrah India vs BangladeshImage Credit source: PTI
| Updated on: Mar 07, 2026 | 2:17 AM
Share

बांगलादेश क्रिकेट बोर्डाला वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमान याच्या आयपीएलमधील केकेआर टीमकडून करण्यात आलेल्या हकालपट्टीनंतर अचानक भारतात त्यांचे खेळाडू सुरक्षित नसल्याचं जाणवलं. बांगलादेशने त्यानंतर सुरक्षेचं कारण देत त्यांचे सामने कोलंबोत खेळवण्यात यावेत, अशी मागणी आयसीसीकडे केली. मात्र आयसीसीने इथेच येऊन खेळावं लागेल, असं ठणकावलं. त्यानंतर बांगलादेशने बंडाचं हत्यार उपसलं आणि सुरक्षेचं थातुरमातूर कारण पुढे करत आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेवर बहिष्कार घातला. त्यामुळे आयसीसीने अचानक या स्पर्धेत बांगलादेशच्या जागी स्कॉटलँडचा समावेश केला. त्यानंतर आता टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धा अंतिम टप्प्यात आहे. टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात वर्ल्ड कप ट्रॉफीसाठी चुरस असणार आहे.

1 मालिका आणि 3 सामने

वर्ल्ड कप फायनलनंतर पुन्हा एकदा द्विपक्षीय आंतरराष्ट्रीय मालिकांचा थरार रंगणार आहे. सुपर 8 फेरीतून बाहेर झालेली पाकिस्तान क्रिकेट टीम वर्ल्ड कप स्पर्धा आटोपल्यानंतर बांगलादेश दौऱ्यावर जाणार आहे. पाकिस्तान या दौऱ्यात बांगलादेश विरुद्ध 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. शाहीन आफ्रिदी पाकिस्तानचं नेतृत्व करणार आहे. तर बाबर आझम याला मालिकेतून वगळलं आहे. त्यानंतर आता यजमान बांगलादेशनेही 5 मार्च रोजी या एकदिवसीय मालिकेसाठी 15 सदस्यीटय संघ जाहीर केला आहे. बांगलादेशेने सोशल मीडियाद्वारे पाकिस्तान विरूद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी संघ जाहीर केल्याची माहिती दिली आहे.

बांगलादेशच्या कर्णधारपदाची जबाबदारी कुणाकडे?

बीसीबी अर्थात बांगलादेश क्रिकेट बोर्डाने मायदेशातील या मालिकेसाठी मेहदी हसन मिराज याला कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच नजमुल हुसेन शांतो आणि लिटॉन दास या अनुभवी खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.

बांगलादेश-पाकिस्तान एकदिवसीय मालिकेचं वेळापत्रक

पहिला सामना, 11 मार्च, ढाका.

दुसरा सामना, 13 मार्च, ढाका.

तिसरा सामना, 15 मार्च, ढाका.

बांगलादेश पाकिस्तान विरुद्धच्या मालिकेसाठी सज्ज

पाकिस्तान विरूद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी बांगलादेश क्रिकेट टीम : मेहदी हसन मिराज (कर्णधार), सौम्या सरकार, सैफ हसन, तंझीद हसन, नजमुल हुसेन शांतो, तॉहीद हृदोय, लिटॉन दास, अफिफ हुसैन, माहिदुल इस्लाम भुईया, रिशाद हुसेन, तन्वीर इस्लाम, मुस्तफिजुर रहमान, तस्कीन अहमद, शरीफुल इस्लाम आणि नाहिद राणा.

Follow Us
मागण्या तात्काळ मान्य करा, नाहीतर...अंबादास दानवेंचा सरकारला थेट इशारा
Ambadas Danve | मागण्या तात्काळ मान्य करा, नाहीतर... जरांगे पाटलांच्या खालावलेल्या प्रकृतीवर अंबादास दानवेंचा सरकारला थेट इशारा
सरकारी कार्यालय की Reel शूटिंगचं ठिकाण? तहसीलदारांवर नियमभंगाचा आरोप
सरकारी कार्यालय की Reel शूटिंगचं ठिकाण? रिसोडच्या तहसीलदारांवर नियमभंगाचा आरोप, नेमकं काय घडलं?
पेपर फोडून अधिकारी पैसे खातात, पण विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय?
Rohit Pawar On MPSC Pepar Leak | पेपर फोडून अधिकारी पैसे खातात, पण विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय? रोहित पवारांचा MPSC व्यवस्थेवर संताप
डीजे बंदीवरून राऊत आक्रमक! मुख्यमंत्री कुंपणावर बसून तमाशा पाहत आहेत
Sanjay Raut | डीजे बंदीवरून संजय राऊत आक्रमक! मुख्यमंत्री कुंपणावर बसून तमाशा पाहत आहेत म्हणत सरकारला घेरलं
आपली मुलं शिक्षण सोडून रस्त्यावर येत आहेत, हे सरकारचं अपयश! सुप्रिया स
MPSC | आपली मुलं शिक्षण सोडून रस्त्यावर येत आहेत, हे सरकारचं अपयश! सुप्रिया सुळे MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आक्रमक
15 दिवसांत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो काढा! सदावर्तेंचं ठाकरेंना आव्हान
Gunratna Sadavarte | 15 दिवसांत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो काढा! गुणरत्न सदावर्तेंचं उद्धव-राज ठाकरेंना थेट आव्हान; नाहीतर...
सुशिक्षितांपेक्षा त्या भागातून 92% मतदान! नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य
Nitin Gadkari On Matdar | सुशिक्षितांपेक्षा त्या भागातून 92% मतदान! नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य; राजकीय वर्तुळात चर्चा
लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा
मोठी बातमी! लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा; महाराष्ट्राच्या राजकारणात ऑपरेशन टायगर पुन्हा सक्रिय
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?