AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लातूरच्या वृद्ध बळीराजानं स्वत:लाच जुंपलं औताला; Video पाहताच सोनू सूद धावला मदतीला

लातूरमधील एका वृद्ध शेतकरी दाम्पत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. शेत नांगरणीसाठी बैल किंवा इतर कोणतीच उपकरणं नसल्याने या वृद्ध शेतकऱ्याने स्वत:लाच औताला जुंपलंय. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सोनू सूदने मदतीचा हात पुढे केला.

लातूरच्या वृद्ध बळीराजानं स्वत:लाच जुंपलं औताला; Video पाहताच सोनू सूद धावला मदतीला
लातूरच्या शेतकऱ्याच्या मदतीला धावून गेला सोनू सूदImage Credit source: Instagram
| Updated on: Jul 03, 2025 | 11:48 AM
Share

एकीकडे सरकार शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवत असताना अजूनही राज्यातील असंख्य शेतकरी मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. याचंच ताजं उदाहरण महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातून समोर आलं आहे. शेत नांगरणीसाठी बैल नसल्याने एका वृद्ध शेतकऱ्याने स्वत:लाच औताला जुंपलंय. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. संबंधित शेतकऱ्याची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट असून नांगरणीसाठी त्यांच्याकडे बैलसुद्धा नाही. अशा परिस्थितीतही हार न मानता हा वृद्ध शेतकरी स्वत:ला औताला जुंपला आहे. शेतकरी दाम्पत्याचं हे कष्ट पाहून अखेर अभिनेता सोनू सूदने मदतीचा हात पुढे केला आहे. गरजूंची मदत करण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या सोनू सूदने पुन्हा एकदा चाहत्यांची मनं जिंकली आहेत.

शेतकऱ्याचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सोनू सूदने त्यांना मदत करण्याचं ठरवलं आहे. ‘तुम्ही नंबर पाठवा, मी बैल पाठवतो’, असं ट्विट त्याने केलंय. तर लातूर तालुक्याचे कृषी अधिकारी सचिन बावगे यांनी संबंधित शेतकऱ्याविषयीची माहिती दिली आहे. “त्यांचं नाव अंबादास पवार असून त्यांची 4 बिघा जमीन आहे. ही जमीन सिंचनासाठी पावसावर अवलंबून आहे. आमच्या अधिकाऱ्यांच्या पथकाने भेट दिली आणि त्यांना तिथे शेतीसाठी आवश्यक उपकरणांची कमतरता आढळली. म्हणून आम्ही त्यांना कृषी विभागात अनुदानित दरात उपलब्ध असलेल्या सर्व उपकरणांबद्दल सांगितलं”, असं ते म्हणाले.

संबंधित शेतकऱ्याकडे कृषी ओळखपत्र नव्हतं. त्यामुळे कृषी अधिकाऱ्यांनी ओळखपत्र बनवण्याची प्रक्रिया सुरू केली. त्याचप्रमाणे लवकरच त्यांना कृषी विभागाकडून ट्रॅक्टर आणि 1.25 लाख रुपये यांसह सर्व उपकरणे मिळतील, अशीही माहिती बावगे यांनी दिली. वृद्ध शेतकरी दाम्पत्याचं कुटुंब आर्थिक संकटाचा सामना करत आहे. त्यांच्याकडे शेत नांगरणीसाठीही पुरेसे पैसे नव्हते. अशा परिस्थितीत वृद्ध दाम्पत्याने स्वत:च नांगर ओढण्यास सुरुवात केली. याचा व्हिडीओ कोणीतरी शूट केला आणि तो सोशल मीडियावर पोस्ट केला. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यावर विविध क्षेत्रातून प्रतिक्रिया येऊ लागल्या. त्यानंतर कृषी अधिकारी त्यांच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचले.

Follow Us
साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे...
Devendra Fadnavis : साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे हात जोडत शेतकरी ढसा ढसा रडला
निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून...
Ram Kadam : निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून राम कदमांचा पलटवार
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी...
Shiv Sena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी झालीच नाही; आता पुढे...
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती, ChatGPT संदर्भांतील आरोपाचं काय होणार?
देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल
Kapil Sibal : देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल, नेमकी काय केली मागणी?
निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर..
Satej Patil : निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर थेट आरोप
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची अनोखी मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई, 80 मंडळांवर गुन्हे
भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
BJP : भाजपमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी