4 डिसेंबर 2025
Created By: संजय पाटील
विराटने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात शतक झळकावलं. विराटने रायपूरमध्ये 102 धावा केल्या.
विराटचं हे एकदिवसीय कारकीर्दीतील सलग दुसरं शतक ठरलं. विराटने याआधी रांचीत 135 धावा केल्या होत्या.
विराटने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सलग 3 सामन्यात शतकं झळकावली आहेत. विराटने रांचीआधी 2023 वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत शतक केलं होतं.
विराटने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आतापर्यंत एकूण 7 एकदिवसीय शतक झळकावले आहेत.
विराट एका स्थानी सर्वाधिक 46 शतकं करणारा पहिला फलंदाज ठरलाय. विराटने याबाबतीत सचिनचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक केला.
तसेच विराटची एकदिवसीय क्रिकेटमध्ये सलग दुसऱ्यांदा शतक करण्याची ही 11 वी वेळ ठरली आहे.
तसेच विराटने सचिनच्या एका विक्रमाची बरोबरी केलीय. विराट 34 वेगवेगळ्या मैदानात शतक करणारा संयुक्तरित्या पहिला फलंदाज ठरला.