Year Ender 2025
2025 हे वर्ष असंख्य घटना घडामोडींचं राहिलेलं आहे. आता या वर्षाच्या शेवटच्या महिन्यात आपण आलो आहोत. 1 जानेवारी 2026 पासून नव्या वर्षाला सुरुवात होणार आहे. प्रत्येकाच्या आयुष्यातील नव्या पर्वाला सुरुवात होणार आहे. असंख्य राष्ट्रांसाठी हे वर्ष आर्थिक संकट आणि आर्थिक प्रगतीचं असणार आहे. जुन्या वर्षातील कटू घटना घडामोडींना मागे टाकून पुढे जाण्याचं हे वर्ष आहे. गेल्या वर्षी 2025मध्ये देश, राज्य आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर असंख्य घटना घडल्या. भारतात एकीकडे अर्ध्याहून अधिक नक्षलवादी चळवळीचा बिमोड झाला तर दुसरीकडे दहशतवाद्यांनी डोकं वर काढलं. दिल्लीत झालेल्या स्फोटात असंख्य निष्पापांना प्राण गमवावे लागले. आर्थिक स्तरावर भारताची प्रगती उंचावलेली राहिली. तर बॉलिवूडसाठी 2025 वर्ष जसं चांगलं गेलं, तसं दु:खाचंही ठरलं. प्रसिद्ध ही-मॅन अभिनेता धर्मेंद्र, पंकज धीर, असरानी, प्रसिद्ध अभिनेत्री संध्या यांच्या दु:खद निधनाच्या बातमीने बॉलिवूड हेलावून गेले. याशिवाय आणखीही राजकीय घटनांनी सरतं वर्ष भरलेलं होतं. त्याची माहितीही तुम्हाला देणार आहोत. मनोरंजन विश्वात 2025मध्ये काय घडलं? कुठला सिनेमा सर्वाधिक चालला? कुठल्या अभिनेत्याचा बोलबाला होता? कुठला सिनेमा फ्लॉप झाला? ओटीटीच्या जगतात, टीव्ही-सीरिअलच्या जगतात आणि मराठी सिनेसृष्टीत काय घडलं याची बित्तंबामतीही तुम्हाला पुन्हा एकदा सांगणार आहोत. 2025 हे वर्ष क्रीडा क्षेत्रासाठीही महत्त्वाचं ठरलं. क्रीडा क्षेत्राशी संबंधित बातम्याही तुम्हाला सांगणार आहोत. तसेच सरत्या वर्षात कोणते फोन लॉन्च झाले, कोणत्या नव्या गाड्या बाजारात आल्या या सर्वांचा वर्षभराचा लेखाजोखाच तुम्हाला पुन्हा वाचायला मिळणार आहे.
धर्मेंद्र यांच्याबद्दल ‘ही’ एक गोष्ट Google वर सर्वाधिक होतेय सर्च, जाणून तुम्हीही व्हाल थक्क!
गुगलवर वर्षभर सर्वाधिक काय सर्च करण्यात आलं, याची यादी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. 2025 या वर्षांत धर्मेंद्र यांच्याविषयीची एक गोष्ट गुगलवर नेटकऱ्यांनी सर्वाधिक सर्च केली. ही कोणती गोष्ट, ते जाणून घ्या..
- स्वाती वेमूल
- Updated on: Dec 4, 2025
- 3:56 pm
Year Ender 2025 : विकी-कतरिना ते राघव-परिणीती, 2025 मध्ये कोणकोणत्या सेलिब्रिटींच्या घरी आला चिमुकला पाहुणा ?
2025 हे वर्ष आता संपायला आलं आहे, बॉलिवूड आणि हॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी गुड न्यूज दिली. कोणी लग्न केलं तर कोणाच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन झालं. कतरिना कैफ-विकी कौशलपासून ते राजकुमार राव, अथिया शेट्टीपर्यंत अनेक सेलिब्रिटींची चिमुकल्या पाहुण्याचं स्वागत केलं.
- manasi mande
- Updated on: Dec 3, 2025
- 9:32 pm
Celebs Divorce Year Ender 2025: प्रसिद्ध सेलिब्रिटींचा मोडला संसार, ‘या’ अभिनेत्रीच्या पतीचा घटस्फोटानंतर लगेच मृत्यू
Celebs Divorce Year Ender 2025: 2025 मध्ये अनेक सेलिब्रिटींनी नवा संसार थाटला, पण अनेकांचा संसार मोडला देखील... काहीचा तर लग्नाच्या काही महिन्यांनंतर घटस्फोट झाला. तर एक अभिनेत्रीच्या नवऱ्याचं तर घटस्फोटानंतर निधन झालं.. यंदाच्या वर्षी या 5 सेलिब्रिटींचे घटस्फोट चर्चेत राहिले....
- shweta Walanj
- Updated on: Dec 3, 2025
- 1:25 pm