पाचव्या कसोटीपूर्वी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने प्लेइंग 11 केली जाहीर, टेम्बा बावुमाकडे दिलं कर्णधारपद
Cricket Australia, Test XI 2025: क्रिकेट ऑस्ट्रेलियाने कसोटीची बेस्ट प्लेइंग इलेव्हन निवडली आहे. 2025 या वर्षातील कसोटी प्लेइंग इलेव्हन जाहीर केली आहे. कर्णधारपदासाठी पॅट कमिन्स आणि स्टीव्ह स्मिथला नाकारलं आहे. इतकंच काय तर संघातही त्यांना स्थान दिलेलं नाही. तीन भारतीय खेळाडूंचा समावेश केला आहे.

2025 हे वर्ष संपण्यासाठी आता अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक आहे. असं असताना मागच्या वर्षात काय केलं त्याचा लेखाजोखा मांडला जात आहे. वेगवेगळ्या पातळ्यांवर आकलन केलं जात आहे. मग ते सकारात्मक असो की नकारात्मक.. आतापर्यंत केलेल्या चुका पुन्हा या वर्षात घडू नये यासाठी प्रयत्न असणार आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने 2025 वर्षातील कसोटीतील बेस्ट प्लेइंग 11 निवडली आहे. पण या संघात पॅट कमिन्स आणि स्टीव्ह स्मिथला काही स्थान दिलेलं नाही. खरं तर हे दोन्ही खेळाडू ऑस्ट्रेलियन संघाचा कणा आहेत. मात्र असं असूनही 2025 बेस्ट प्लेइंग 11 मधून त्यांना डावललं आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने जाहीर केलेल्या कसोटी प्लेइंग सर्वाधिक भरणा हा ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा आहे. पण या प्लेइंग 11 मध्ये कमिन्स आणि स्मिथला काही जागा मिळाली नाही.
ऑस्ट्रेलियाने 2025 या वर्षातील कसोटीतील बेस्ट प्लेइंग 11 मध्ये 4 ऑस्ट्रेलियन खेळाडूंना स्थान दिलं आहे. यात मिचेल स्टार्क, ट्रेव्हिस हेड, एलेक्स कॅरी आणि स्कॉट बोलँड यांना जागा दिली आहे. ऑस्ट्रेलियाव्यतिरिक्त भारताच्या तीन खेळाडूंना या प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळालं आहे. यात केएल राहुल, शुबमन गिल आणि जसप्रीत बुमराह यांना पसंती दिली आहे. इतकंच काय तर रवींद्र जडेजाला प्राधान्य दिलं आहे. पण त्याची निवड 12वा खेळाडू म्हणून केली आहे.
Will you make any changes to our best Test XI of the year? 🤔
Full details: https://t.co/o8scL0bue7 pic.twitter.com/qNUItvARfF
— cricket.com.au (@cricketcomau) December 30, 2025
इंग्लंड आणि दक्षिण अफ्रिकेच्या प्रत्येकी 2 खेळाडूंची निवड या प्लेइंग 11 मध्ये केली आहे. इंग्लंडकडून जो रूट आणि बेन स्टोक्स यांना जागा मिळाली आहे. तर दक्षिण अफ्रिकेकडून कर्णधार टेम्बा बावुमा आणि फिरकीपटू सायमन हार्मर यांना जागा मिळाली आहे. टेम्बा बावुमाकडे बेस्ट प्लेइंग 11चं कर्णधारपद सोपवलं आहे. तर सलामीची जबाबदारी केएल राहुल आणि ट्रेव्हिस हेड यांच्याकडे दिली आहे. जो रूटला तिसऱ्या, शुबमन गिलला चौथ्या स्थानाची पसंती दिली आहे. वेगवान गोलंदाजीची धुरा स्टार्क, बुमराह आणि बोलँडच्या खांद्यावर आहे. तर एकाच फिरकीपटूला पसंती दिली आहे.
ऑस्ट्रेलियाने निवडलेली 2025 या वर्षातील बेस्ट कसोटी प्लेइंग 11
केएल राहुल, ट्रेव्हिस हेड, जो रूट, शुबमन गिल, टेम्बा बावुमा (कर्णधार), एलेक्स कॅरे (विकेटकीपर), बेन स्टोक्स, मिचेल स्टार्क, जसप्रीत बुमराह, स्कॉट बोलँड, सिमॉन हार्मर, रवींद्र जडेजा (12वा खेळाडू)
