क्रिकेट विश्वात 2025 या वर्षाचा लेखाजोखा मांडताना बऱ्याच कडू गोड आठवणी आहे. काही जणांना हे वर्ष चांगलं गेलं. तर काही जणांसाठी हे वर्ष खूपच वाईट गेलं. या वर्षात कोणत्या खेळाडूने सर्वाधिक शतकं ठोकली. त्याची चर्चा होत आहे. यात काही खेळाडू असे आहेत की त्यांनी षटकार कमी मारले आणि जास्त शतकं केली. (Photo- PTI)
1 / 6
इंग्लंडचा दिग्गज फलंदाज जो रूटने 2025 या वर्षात सर्वाधिक शतके झळकावली. त्याने 33 डावांमध्ये 7 शतकं ठोकली. त्याने 53 पेक्षा जास्त सरासरीने 1613 धावा केल्या. इतकंच काय तर रूटने पाच अर्धशतके देखील झळकावली. रूटने या वर्षात सात शतके झळकावली पण फक्त पाच षटकार मारले.(Photo: Getty Images)
2 / 6
टीम इंडियाचा कर्णधार शुबमन गिलला हे वर्ष चांगलं गेलं. पण मागचे दोन महिने काही खास गेले नाहीत. शुबमन गिलने 2025 या वर्षात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 7 शतके झळकावली. 42 डावात ही कामगिरी केल्याने तो रूटपेक्षा मागे आहे. गिलने 49 च्या सरासरीने 1764 धावा केल्या. त्याने तीन अर्धशतके देखील झळकावली आहे.(Photo- PTI)
3 / 6
2025 मध्ये सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या खेळाडूंच्या यादीत वेस्ट इंडिजचा फलंदाज शाई होप तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 50 डावांमध्ये 1760 धावा केल्या आणि पाच शतके केली. होपने नऊ अर्धशतकेही झळकावली आहेत. (फोटो- PTI)
4 / 6
2025 या वर्षात सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या खेळाडूंच्या यादीत वेस्ट इंडिजचा फलंदाज शाई होप तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 50 डावांमध्ये 1760 धावा केल्या आणि पाच शतके केली. होपने नऊ अर्धशतकेही झळकावली. (Photo: PTI)
5 / 6
यशस्वी जयस्वालनेही 2025 मध्ये चांगली कामगिरी केली. त्याने 23 डावांमध्ये चार शतके झळकावली आणि 41.63 च्या सरासरीने एकूण 916 धावा केल्या. यशस्वी जयस्वाल कसोटी आणि वनडे संघात खेळतो. पण त्याला टी20 संघात काही स्थान मिळताना दिसत नाही. (Photo-Stu Forster/Getty Images)