AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026 : सरकार 11 जणांच्या मृत्यूनंतर अलर्ट, KSCA ला अटींसह मंजूरी, आरसीबी चाहत्यांना दिलासा

Ipl 2026 RCB M Chinnaswamy Stadium Bengaluru : आरसीबी रजत पाटीदार याच्या नेतृत्वात 18 व्या मोसमात (IPL 2025) पंजाबला पराभूत करत आयपीएल चॅम्पियन ठरली होती. मात्र त्यानंतर बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये झालेल्या जल्लोषात आरसीबीच्या विजयाला गाळबोट लागलं होतं. स्टेडियम परिसरात झालेल्या चेंगराचेंगरीत काही चाहत्यांचा मृत्यू झाला होता. तर अनेकांना दुखापत झाली होती.

| Updated on: Feb 13, 2026 | 8:02 PM
Share
कर्नाटक सरकारच्या एका निर्णयामुळे गतविजेत्या आरसीबी टीमला मोठा दिलासा मिळाला आहे. कर्नाटक सरकारने बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय सामने खेळवण्यास परवानगी दिली आहे. कर्नाटक सरकारच्या मंत्रिमंडळाने   बैठकीत सामन्यांच्या आयोजनसाठी हिरवा कंदील दिला.  सरकारने गेल्या वर्षी आयपीएल विजयाच्या जल्लोषानंतर झालेल्या चेंगराचेंगरीमुळे या स्टेडियममध्ये सामन्याच्या आयोजनावर बंदी घातली होती. (Photo Credit : PTI)

1 / 5
मंत्रिमंडळाने कुन्हा समितीच्या रिपोर्टमधील काही अटी-शर्थींसह सहमती दर्शवल्याचं मंत्री रामलिंग रेड्डी यांनी सांगितलं. त्यामुळे आता आरसीबीला त्या अटी-शर्थी मान्य असल्यास चिन्नास्वामी स्टेडियममध्ये सामने खेळवण्यात येऊ शकतात. इतकंच नाही तर ओपनिंग सेरेमनीचं (रंगारंग कार्यक्रम) आयोजन केलं जाऊ शकतं.  (Photo Credit : PTI)

2 / 5
कुन्हा समितीच्या अहवालानुसार, एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये 35 हजार क्रिकेट चाहत्यांनाच प्रवेश देता येणार आहे. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने एआय कॅमेरे, अद्ययावत गेट सिस्टम, पोलीस यंत्रणा आणि नियमांचं पालन करावं लागेल. क्रिकेट असोसिएशनकडून या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाते की नाही? याकडे गृहमंत्रालयाची बारीक नजर असणार आहे. (Photo Credit : PTI)

3 / 5
कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन अर्थात केएसीए आणि आरसीबीकडून राज्य सरकारकडे या मैदानात सामन्यांच्या आयोजनासाठी परवानगी मागण्यात आली होती. आता राज्य सरकारने अटी शर्थींसह परवानगी दिली आहे. त्यामुळे आता केएसीए या अटी शर्थींची पूर्तता करण्यात यशस्वी ठरणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. (Photo Credit : PTI)

4 / 5
दरम्यान आयपीएलच्या 19 व्या मोसमााठी (IPL 2026) आता काहीच आठवडे बाकी आहेत. मात्र अद्याप वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं नाही. त्यामुळे आता क्रिकेट चाहत्यांना या आगामी मोसमाच्या वेळापत्रकाचे वेध लागले आहेत. (Photo Credit : PTI)

5 / 5
Follow Us
मनोज जरांगे पाटील यांची २९ ऑगस्टपासून पुन्हा आमरण उपोषणाची घोषणा

तर तुमच्या मागे रेडा लावणार', गिरीश महाजनांबाबत राऊतांचं विधान...
तर तुमच्या मागे रेडा लावणार', गिरीश महाजनांबाबत राऊतांचं अगदी जिव्हारी लागणारं वक्तव्य
राज्याच्या विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली पंतप्रधानांची भेट
मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली पंतप्रधानांची भेट: राज्याच्या विकासासाठी मागितले सहकार्य
रायगडला नवा पालकमंत्री. गोगावलेंच्या निवडीने माणगावात आनंदोत्सव...
रायगडला नवा पालकमंत्री. गोगावलेंच्या निवडीने माणगावात आनंदोत्सव
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गणेशोत्सवासाठी रस्ते दुरुस्तीचा घेणार आढावा

पालकमंत्रीपदाचा तिढा सुटला,पालकमंत्रीपदी गोगावले, महाजन यांची नियुक्ती
रायगडच्या पालकमंत्रीपदी भरत गोगावले, नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन
राहुल गांधींकडे उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता? सुप्रीम कोर्टाची थेट...
राहुल गांधींकडे उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता? सुप्रीम कोर्टाची थेट याचिकाकर्त्यांनाच नोटीस; ED, CBI...
दिमागी नक्षलवाद: सोशल मीडियावर नवीन ट्रेंड, लाखोंनी केले फॉलो
दिमागी नक्षल पार्टीचा सोशल मीडियावर धुमाकूळ: पंतप्रधानांच्या शब्दातून झालेली ऑनलाईन चळवळ
मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांना दिले तातडीचे निर्देश... झारखंड विद्यार्थी
मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांना दिले तातडीचे निर्देश... झारखंड विद्यार्थी आंदोलनावर अखेर राहुल गांधींनी सोडलं मौन
दिल्लीत राजकीय हालचालींना वेग! CM फडणवीस आणि पंतप्रधानांच्या भेटीत...
दिल्लीत राजकीय हालचालींना वेग! CM फडणवीस आणि पंतप्रधानांच्या भेटीत नेमकं काय घडलं? मोठी अपडेट समोर