12 फेब्रुवारी 2026
Created By: संजय पाटील
टीम इंडियाने टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेतील 18 व्या सामन्यात नामिबियावर 93 धावांनी मात केली.
टीम इंडियाने नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममधील या सामन्यात 4 खास विक्रम केले.
भारताचा वर्ल्ड कप स्पर्धेतील हा सलग 10 वा विजय ठरला. इंडिया वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक आणि सलग 10 सामने जिंकणारी पहिली टीम ठरली.
तसेच टीम इंडियाने नामिबियावर 93 धावांनी विजय मिळवला. भारताचा हा वर्ल्ड कपमधील धावांबाबत सर्वात मोठा विजय ठरला.
भारताने पावरप्लेमध्ये 86 धावा केल्या. भारत यासह या वर्ल्ड कप स्पर्धेत पावर प्लेमध्ये सर्वाधिक धावा करणारा संघ ठरला.
तसेच टीम इंडियाने या सामन्यात पहिल्या डावात बॅटिंग करताना वर्ल्ड रेकॉर्ड केला.
भारत टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेत वेगवान 100 धावा करणारा पहिला संघ ठरला. भारताने 41 चेंडूत 100 धावा पूर्ण केल्या.