अभिषेक शर्मा पाकिस्तान विरुद्ध कमबॅक करणार! 

13 फेब्रुवारी  2026

Created By:  संजय पाटील

टीम इंडिया 15 फेब्रुवारीला टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तान विरुद्ध खेळणार आहे.

पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात टीम इंडियाचा मॅचविनर फलंदाज अभिषेक शर्मा खेळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

अभिषेक शर्मा याला पोटाच्या आजारामुळे नामिबिया विरूद्धच्या सामन्याला मुकावं लागलं होतं.

अभिषेक शर्मा याला यूएसए विरूद्धच्या सामन्यानंतर पोटाच्या आजारामुळे रुग्णालयात दाखल केलं गेलं होतं.

अभिषेकला काही तासांनंतर रुग्णालयातून सोडण्यात आलं. मात्र अभिषेकला 2 सामन्यांना मुकावं लागू शकतं असं कॅप्टन सूर्यकुमार म्हणाला होता.  

त्यामुळे भारतीय चाहत्यांनी चिंता वाढली होती. मात्र आता रिपोर्ट्सनुसार, अभिषेक पाकिस्तान विरुद्ध खेळणार असल्याचं म्हटलं जात आहे. 

अभिषेकच्या कमबॅकमुळे संजू सॅमसन याला प्लेइंग ईलेव्हनमधून बाहेर व्हावं लागू शकतं.