tv9 Special Report | महत्वाच्या महामार्गावर 32 तास वाहतूक ठप्प; प्रशासन यंत्रणेवर सवाल
एका टँकर अपघातामुळे ठप्प झालेला मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग तब्बल 32 तासांनी पूर्ववत झाला. महाराष्ट्राच्या विकासात महत्वाची असणारी प्रमुख दोन शहरं ज्या रस्त्याने जोडली जातात त्याच महामार्गावर उपाययोजनांचं वास्तव समोर आल्यामुळे प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला. अपघातग्रस्त टँकर इंधनाचा असल्यामुळे इंधन दुसऱ्या टँकर मध्ये टाकलं गेलं. सुरक्षेसाठी हे करणं गरजेचं होतं, मात्र त्यासाठी तब्बल 32 तास लोकांचा खोळंबा झाल्यामुळे आपली यंत्रांना तयारच नसते हे पुन्हा एकदा अधोरेखित झालं.

मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी यावर थेट प्रतिक्रिया दिली आणि म्हटले, “मुंबई आणि पुणे ही महाराष्ट्राची इंजिनं आहेत. मात्र 32 तास या दोन शहरांतील वाहतूक ठप्प झाली, यावर शांत राहणं अशक्य आहे. आपली यंत्रणा अशा परिस्थितीसाठी अजूनही तयार नाही, हे अधोरेखित होतं.” ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवेंनीही यावर टीका करताना, “एक टँकर उलटतो आणि दोन महत्वाच्या शहरांचा संपर्क 24 तासासाठी तुटतो. व्हा! काय ही व्यवस्थेची अवस्था? उद्या आपत्कालीन परिस्थितीत असली शरम ओढवण्यापेक्षा यावर उपाययोजना करायला हवी. मात्र आता ह्या मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवरील कोंडीला नेहरू जबाबदार असं म्हणू नका.” दानवे यांनी या प्रसंगी सत्ताधारी पक्षावर निशाणा साधत, उपाययोजनेची आवश्यकता अधोरेखित केली आहे.
Published on: Feb 06, 2026 12:36 PM
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी