Mumbai | मुंबई हादरली! बाप झाला हैवान, मुकबधीर मुलीवर अत्याचार, जन्मदात्या बापाचेच DNA जुळले
मुंबईत एका मुकबधीर तरुणीवर अत्याचार झाल्याची अत्यंत धक्कादायक घटना समोर आली असून या प्रकरणामुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. पीडित मुलगी गर्भवती राहिल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले असून, तपासादरम्यान करण्यात आलेल्या DNA चाचण्यांमधून अत्याचार करणारा व्यक्ती मुलीचा जन्मदाता पिता असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मुंबईत एका मुकबधीर तरुणीवर अत्याचार झाल्याची अत्यंत धक्कादायक घटना समोर आली असून या प्रकरणामुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. पीडित मुलगी गर्भवती राहिल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले असून, तपासादरम्यान करण्यात आलेल्या DNA चाचण्यांमधून अत्याचार करणारा व्यक्ती मुलीचा जन्मदाता पिता असल्याचे स्पष्ट झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण मुंबई परिसरात ही गंभीर घटना घडली आहे. या प्रकरणात पोलिसांनी तपासाचा भाग म्हणून तब्बल 16 जणांच्या DNA चाचण्या केल्या होत्या. या चाचण्यांचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर मुलीच्या जन्मदात्या पित्याचाच DNA जुळले आहे. या घटनेप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीविरोधात कठोर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सध्या आरोपीला ताब्यात घेऊन अधिक चौकशी सुरू असून, या अत्याचारामागील सर्व बाबींचा सखोल तपास केला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
Published on: Feb 06, 2026 11:23 AM
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट...
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM...

